NATO अर्थात ‘North Atlantic Treaty Organization‘ ने, युनायटेड स्टेट्सकडून- युक्रेनला पाश्चात्य लष्करी मदत मिळवून देण्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली असल्याचं, एका सूत्राने मंगळवारी सांगितले. NATO विरोधक असलेले यूएस अध्यक्ष-डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून समर्थन प्रणालीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे व्यापक पाऊल उचचले गेले असल्याचे समजते.
अनेक महिन्यांच्या विलंबानंतर घेण्यात आलेला हा निर्णय, रशियाविरुद्धच्या युद्धांमध्ये ‘नाटो’ला अधिक थेट भूमिका देऊ करते.
मात्र दोन्हीकडील डिप्लोमॅट्स हे मान्य करतात की, ‘नाटो’ला हा अधिकार हस्तांतरित करण्याचा मर्यादित परिणाम होऊ शकतो. कारण ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका युक्रेनला देत असलेला पाठिंबा कमी करून, त्यांना धक्का देऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प येत्या जानेवारीमध्ये कामाचा पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या म्हणणण्यानुसार, ‘युक्रेनमधील युद्ध त्यांना त्वरीत संपवायचे आहे परंतु ते इतके सहजरित्या होणारे नाही. अमेरिकेकडून आजवर युक्रेनला देण्यात आलेल्या आर्थिक आणि लष्करी मदतीबाबत ट्रम्प दीर्घकाळापासून टीका करत आहेत.
NATO च्या नवीन युक्रेन मिशनचे मुख्यालय, ‘NATO Security Assistance and Training for Ukraine (NSATU)’ हे जर्मनीच्या ‘क्ले बॅरॅक्स’ येथे स्थापन करण्यात आले असून, हा जर्मनीतील एक US व्यापित प्रदेश आहे.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, NSATU हे कार्यालय आता पूर्णपणे कार्यकरत झाले असून त्याच्या विलंबासंदर्भात कोणतेही सार्वजनिक कारण देण्यात आलेले नाही.
पोलंडचे संरक्षण मंत्री व्लाडिस्लाव कोसिनियाक-कॅमिझ यांनी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, वॉशिंग्टनमधील नाटो शिखर परिषदेनंतर, युक्रेनच्या परकीय मदतीसाठी मुख्य ट्रान्झिट हब – पोलंडमधील जॅसिओन्का येथील हबची जबाबदारी युतीने घेतली.
कॅमिझ यांच्या म्हणण्यानुसार, “ नाटोच्या युतीने ठरवले आहे की ते युक्रेनचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करेल. जेव्हा युती जबाबदारी घेते तेव्हा ती संबंधित देशाला संरक्षणाची काळजी घेण्यासाठी नियुक्त करते. नोव्हेंबरमध्ये, जर्मनीने पोलंडमधील NATO हबचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशभक्त हवाई संरक्षण प्रणालीच्या पुनर्नियोजनाची ऑफर दिली होती.
दरम्यान, वॉशिंग्टनमधील आउटगोइंग बिडेन प्रशासन हे कीवला शक्य तितकी शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, या भीतीने ट्रम्प युक्रेनला होणारे लष्करी हार्डवेअरचे वितरण कमी करू शकतात, अशी भिती विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात NATO सोडण्याची धमकी दिली होती आणि सहकारी देशांना त्यांच्या राष्ट्रीय GDP च्या 3% रक्कम त्यांच्या लष्करी खर्चावर घालावी, अशी मागणी केली, जे नाटोच्या 2% च्या लक्ष्यापेक्षा जास्त होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या NSATU कार्यालयामध्ये एकूण 700 कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बेल्जियममधील NATO चे लष्करी मुख्यालय SHAPE आणि पोलंड व रोमानियामधील लॉजिस्टिक हबमध्ये तैनात असलेल्या सैन्याचा समावेश आहे.
दरम्यान, युक्रेनला मिळणाऱ्या पाश्चात्य लष्करी मदतीमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात रशियाने त्यांच्यावर टीका केली आहे. ज्यामुळे मोठा युद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)