26 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ‘रक्षा कवच-बहु-क्षेत्रीय धोक्यांपासून बहुस्तरीय संरक्षण’ या संकल्पनेसह राष्ट्रीय सुरक्षेतील अभूतपूर्व प्रगतीवर प्रकाश टाकणारा चित्ररथ सादर करणार आहे.
संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक उत्कृष्टता आणि स्वावलंबनाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचे उदाहरण देत, डीआरडीओचा चित्ररथ अत्याधुनिक प्रणालींवर प्रकाश टाकणार आहे. यावेळी सादर केल्या जाणाऱ्या प्रमुख नवकल्पनांमध्ये Quick Reaction Surface-to-Air Missile, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम, 155 मिमी/52 कॅल प्रगत टॉव्ड आर्टिलरी गन सिस्टम आणि ड्रोन डिटेक्ट, डिटर आणि डिस्ट्रॉय तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. इतर ठळक वैशिष्ट्यांमध्ये उपग्रह-आधारित देखरेख प्रणाली, मध्यम शक्तीचा रडार-अरुध्रा, प्रगत हलके टॉरपीडो, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली-धाराशक्ती, लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र, अतिशय कमी-श्रेणीची हवाई संरक्षण प्रणाली, स्वदेशी मानवरहित हवाई प्रणाली, जमीन दलांसाठी व्ही/यूएचएफ मॅनपॅक सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ, स्वदेशी सुरक्षित उपग्रह फोन आणि यूजीआरएएम असॉल्ट रायफल यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात आणखी भर घालत, डीआरडीओ चित्ररथासह असलेल्या भित्तीपत्रकांद्वारे आपले 2024 चे टप्पे प्रदर्शित करेल. या कामगिरीमध्ये लाँग रेंज हायपरसॉनिक अँटी-शिप क्षेपणास्त्र, हलके बुलेटप्रूफ जॅकेट ‘अभेड’, दिव्यास्त्र मल्टीपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल, ‘झोरावर’ लाइट टँक आणि रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम, सॉफ्टवेअर-डिफाइंड रेडिओ आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक्स (‘शायेन’) असलेले डॉर्नियर मिड-लाइफ अपग्रेड यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात आणखी भर घालत, डीआरडीओ आपल्या चित्ररथाबरोबरच भित्तीपत्रकांद्वारे 2024 मधील उल्लेखनीय टप्पे प्रदर्शित करणार आहे. यामध्ये लाँग रेंज हायपरसॉनिक अँटी-शिप क्षेपणास्त्र, हलके बुलेटप्रूफ जॅकेट ‘अभेद’, दिव्यास्त्र मल्टीपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल, ‘झोरावर’ लाइट टँक आणि रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम, सॉफ्टवेअर-डिफाइंड रेडिओ आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक्स (‘शायेन’) असलेले डॉर्नियर मिड-लाइफ अपग्रेड यांचा समावेश आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेले जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे सामरिक क्षेपणास्त्र, प्रलयचे पहिले दर्शन हे यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनातील एक प्रमुख आकर्षण असेल. ही प्रणाली अचूकता आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यावर डीआरडीओचे असणारे लक्ष अधोरेखित करते. याशिवाय, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका, ब्रह्मोस, शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (10 मीटर) आणि आकाश शस्त्र प्रणाली यासह डीआरडीओने विकसित केलेल्या अनेक प्रणाली सशस्त्र दलांच्या तुकड्यांचा भाग म्हणून प्रदर्शित केल्या जातील.
आपल्या नाविन्यपूर्ण योगदानाच्या माध्यमातून, डीआरडीओ ‘आत्मनिर्भर भारत’ चे स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शैक्षणिक, उद्योग, स्टार्ट-अप्स आणि सशस्त्र दलांशी सहकार्य करून, डीआरडीओ राष्ट्रीय संरक्षण क्षमता बळकट करताना ‘मेक इन इंडिया अँड मेक फॉर द वर्ल्ड’ या ध्येयाला बळकटी देते.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर होणारा हा चित्ररथ म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, बहु-कार्यक्षेत्रातील मोहिमांमध्ये भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संरक्षण नवोन्मेषात जागतिक मान्यतेच्या दिशेने पुढे जाण्याच्या डीआरडीओच्या अतूट समर्पणाचा पुरावा आहे.
टीम भारतशक्ती