”युरोप अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय एक प्रभावी संरक्षण धोरण टिकवून ठेवू शकणार नाही”, असा दावा, ‘NATO’ (North Atlantic Treaty Organization) चे प्रमुख मार्क रुटे यांनी केला. यावेळी त्यांनी ट्रान्सअटलांटिक सहकार्याच्या अपरिहार्य भूमिकेवरही जोर दिला. सोमवारी ब्रुसेल्समध्ये बोलताना, रुटे यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील व्यापार धोरणांबाबत युरोप आणि यूएस यांच्यातील तणावाविषयी चिंता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी ‘या मतभेदांमुळे नाटोचा सामूहिक प्रतिबंध कमकुवत होणार नाही’, असा दिलासाही त्यांनी दिला.
‘युरोपने स्वतंत्र संरक्षण धोरण स्वीकारण्याची कल्पना ही अव्यवहार्य असून, तो निव्वळ एक “मुर्ख विचार” आहे,’ असे रुटे यावेळी म्हणाले. ‘वॉशिंग्टनसोबत असलेली भागीदारी जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे’, याची त्यांनी पुन्हा एकदा अठवण करुन दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “भू-राजकीय ‘धोक्यांचा’ सामना करण्यासाठी, आपल्याला एकत्र राहावे लागेल, ज्यात रशिया देखील समाविष्ट आहे.”
“पश्चिमात्य देशांसाठी ‘एकत्र राहणे’ हाच सर्वोत्तम पर्याय आहे आणि मला खात्री आहे की व्हाइट हाऊससह, अमेरिकेत हीच विरारधारा अजूनही प्रचलित आहेत,” असेही ते म्हणाले.
रुटे यांनी ही टिप्पणी, ट्रम्प यांच्या त्या आरोपांनंतर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी वॉशिंग्टनच्या नाटो भागीदारांच्या संरक्षणावर पुरेसे खर्च न करण्याचा आरोप करत, हल्ला झाल्यास त्यांना संरक्षणही न करण्याची धमकी दिली होती.
ब्लॉकमधील अनेक युरोपियन सदस्यांनी अलीकडेच त्यांचा संरक्षण खर्च, त्यांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनांच्या (जीडीपी) 2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जी NATO ची सध्याची किमान शिफारस आहे. तथापि, ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या जीडीपीच्या 5 टक्के खर्च करण्याचे आवाहन करून प्रचंड वाढीची मागणी केली.
रुटे म्हणाले की, अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय युरोपियन संरक्षण “काम करण्यास असमर्थ आहे”. मात्र त्यांनी यावरही जोर दिला की, ट्रम्प-प्रेरित व्यापार तणाव “आपल्या प्रतिकार शक्तीला मजबूत ठेवण्याच्या आमच्या सामूहिक निर्धाराच्या मार्गात येणार नाही”.
“मित्र पक्षांमध्ये वेळोवेळी वाद होत असतात, सर्वकाही नेहमीच आलबेल नसते,” असेही रुटे यावेळी म्हणाले.
ट्रम्प यांनी वॉशिंग्टनच्या काही जवळच्या भागीदारांना नाटो सदस्य कॅनडाकडून आयातीवर 25 टक्के शुल्क जाहीर करून आणि युरोपियन युनियनलाही असे करण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेने गेल्यावर्षी संरक्षणावर सुमारे, $850 बिलियन डॉलर्स खर्च केले, हे नाटोमधील सर्वोच्च लष्करी सामर्थ्य आहे. संपूर्ण युरोपमध्ये सैन्य तैनात असलेल्या वॉशिंग्टनने युक्रेनला तेथे रशियन आक्रमण परतवून लावण्यासाठी लष्करी आणि आर्थिक मदत प्रदान करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
मात्र, ट्रम्प यांनी यापूर्वी नाटोच्या सामूहिक संरक्षण धोरणासाठी अमेरिकेच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘युतीच्या एका सदस्यावर हल्ला हा सर्व सदस्यांवर हल्ला आहे.’
20 जानेवारी रोजी, ट्रम्प यांनी त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर, लगेचच त्यांच्या “अमेरिका प्रथम” अजेंडाचा भाग म्हणून जवळपास सर्व परदेशी आर्थिक सहाय्य गोठवले, जागतिक निधी वाटपातील कोट्यवधी डॉलर्स रोखून धरले. युक्रेनला मिळत असलेल्या निधीवर विपरीत परिणाम होऊ शकेल, असे पाऊल उचलले.
ट्रम्प यांनी, व्यापाराविषयक धमक्या आणि सहाय्यता कपातीच्या अंतर्गत, नाटोचे सदस्य असलेल्या डेन्मार्कमधील ग्रीनलँड या स्वशासित डॅनिश प्रदेशाला ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.
सोमवारी, रुटे यांनी ट्रम्प यांच्या- ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या हेतूला कमी महत्व देत असे सुचवले की, ‘नाटोने वादग्रस्त आर्क्टिक प्रदेशातील संरक्षणास बळकट करण्यासाठी मोठी भूमिका बजावली पाहिजे.’
“अध्यक्ष ट्रम्प यांनी आम्हाला सावध केले आहे, की जेव्हा उच्च उत्तरीय क्षेत्राबद्दल विचार केला जातो, तेव्हा भू-राजकीय आणि रणनीतिक मुद्दा धोक्यात यतो,” असे रुटे म्हणाले.
“सामूहिकपणे एक संघ म्हणून, आम्ही नेहमीच सर्वोत्तम मार्ग शोधून काढू, ज्याद्वारे आपण त्या आव्हानांचा सामना करू शकू,” असेही ते म्हणाले.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)