स्वदेशी धोरणांतर्गत 10 अतिरिक्त Airbus C-295 खरेदीचा भारताचा विचार

0
10

भारत आपल्या जुन्या स्वदेशी ताफ्याचे आधुनिकीकरण करण्याच्या हेतूने, देशांतर्गत असेंबल केलेली 10 अतिरिक्त Airbus C-295 लष्करी वाहतूक विमाने खरेदी करण्यासाठी चर्चा करत असून, प्रारंभिक 71 विमानांच्या खरेदी ऑर्डरचा विस्तार करत भारताने 10 अतिरिक्त एअरबस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रॉयटर्सच्या सूत्रांकडून मिळाली गेल्यावर्षी गुजरातमध्ये C-295 असेंब्ली लाईनच्या उद्घाटनानंतर टाकले गेलेले हे नवे पाऊल, स्वदेशी संरक्षण उत्पादनासाठी भारताचे प्रयत्न अधोरेखित करते तसेच टाटा समूहासोबत एअरबसची भागीदारी मजबूत करते.

भारत सरकारने 2021 मध्ये, IAF साठी 56 C-295 विमानांच्या खरेदीचा करार केला होता, ज्याचे मूल्य $2.52 अब्ज डॉलर इतके होते, तर गेल्यावर्षी Indian Navy आणि तटरक्षक दलांसाठी आणखी 15 विमाने खरेदी करण्याकरता प्रारंभिक होकार कळवला होता. त्यापाठोपाठ आता, 2024 च्या एअरबस C-295 च्या ऑर्डरमध्ये 10 अतिरिक्त विमानांचा समावेश करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, ही अतिरिक्त विमाने भारतीय हवाई दलासाची ताकद वाढवण्याचे काम करतील.

“भारतीय हवाई दलाला (IAF) वाहतूक क्षमता अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे; त्यांना या आधुनिक विमानांची खूप गरज आहे,” असे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संरक्षण तज्ज्ञ लक्ष्मण बेहरा म्हणाले.

दरम्यान, या प्रकल्पावर काम करत असलेल्या एअरबस आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्सने, या व्यवहाराविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देखील, याबाबतच्या टिप्पणीसाठी रॉयटर्सने केलेल्या विनंतीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

2021 मधील 56 विमानांच्या खरेदी करार मूल्यानुसार, 25 C-295 च्या विस्तारित ऑर्डरची किंमत $1.1 अब्ज डॉलर्स इतकी असू शकते.

भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश असला, तरी देशांतर्गत उत्पादन आणि स्वावलंबनाला चालना देण्यावर त्याचा भर आहे, कारण शेजारी राष्ट्र चीनच्या वेगाने वाढणाऱ्या सैन्याला टक्कर देण्यासाठी सध्या भारत शर्थीचे प्रयत्न आहे.

C-295 हे एक बहु-कार्यात्मक वाहतूक विमान आहे, जे एकावेळी 70 सैनिक किंवा आठ टन माल वाहून नेऊ शकते. तसेच एअरबोर्न वॉर्निंग, सर्वेक्षण आणि गुप्तचर मिशन्स सारख्या कार्यात मोलाचे योगदान देऊ शकते.

एअरबस कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘भारतात C-295 या विमानाचे सर्व संरचनात्मक घटक स्थानिक पातळीवर बनवले जात आहेत. भारतीय हवाई दल लवकरच याचा सर्वात मोठा ऑपरेटर बनेल.’

हवाई दलाच्या वाढत्या गरजा

ही विस्तारित ऑर्डर हवाई दलाच्या सक्षमीकरणासाठी असल्याचे ज्या सूत्रांनी सांगितले, त्यांनी असेही सांगितले की, ‘भारत सरकार C-295 साठी भविष्यात आणखी मोठी ऑर्डर देण्याची शक्यता आहे’, तर संरक्षण मंत्रालयाच्या विचारांशी सहमत असलेल्या एका स्वतंत्र उद्योग स्रोताने सांगितले की, ‘नवी दिल्लीत 2021 मध्ये ऑर्डर केलेल्या 56 विमानांपेक्षा, 75 नव्या सी-295 विमानांना अधिक मागणी आहे.

2021 च्या ऑर्डरमधील 16 C-295 विमाने स्पेनमधील एअरबसच्या साइटवरून येणार आहेत, तर उर्वरित 2031 पर्यंत भारतातील एअरबस-टाटा निर्मिती केंद्रात असेंबल केली जातील अशी अपेक्षा आहे.

‘नवीन खरेदी केलेली C-295 विमानं फक्त गुजरात असेंब्ली लाइनमधून येऊ शकतात, परंतु जर नवी दिल्लीला जलद वितरण हवं असेल तर काही विमानं स्पेनहून आणावी लागतील,’ असे पहिल्या स्त्रोताने सांगितले.

C-295 ने भारताच्या 56 Avro HS-748 च्या लेगसी फ्लीटची जागा घेतली, जी पहिल्यांदा 1961 मध्ये सादर करण्यात आली होती आणि हवाई दलाच्या वाहतूक ताफ्याचा कणा बनली होती.

भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी यावर्षी, सरकारी युद्धविमान निर्मात्या- हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून (HAL) लढाऊ विमानांच्या संथ वितरणावर टीका केली आणि उत्पादनाची गती वाढविण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच स्पर्धा वाढवण्यासाठी खाजगी युद्धविमान निर्मित्या कंपन्यांनानाही यामध्ये सहभागी होण्याचे खुले आवाहन केले.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleCDS Gen Anil Chauhan Visits Australia To Boost Defence Ties
Next articleDefence Procurement Overhaul: MoD Aims To Cut Delays, Faster Acquisitions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here