
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, यांनी बुधवारी रशियाचे आक्रमण संपवण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि युक्रेन यांच्यात झालेल्या बैठकीचे कौतुक केले आणि सांगितले की, प्रस्तावित 30 दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाचा वापर व्यापक शांतता कराराचा मसुदा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांनी, रशियासोबत 30 दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शविल्यानंतर, अमेरिकेने मंगळवारी सांगितले की, ते युक्रेनसोबत लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती सामायिक करण्याचे कार्य पुन्हा सुरू करत आहेत.
“मी (युद्धबंदी विषयी) खूप गंभीर आहे आणि माझ्यासाठी युद्ध संपवणे महत्वाचे आहे,” असे झेलेन्स्की यांनी कीवमध्ये एका ब्रीफिंग दरम्यान सांगितले, जिथे त्यांनी अमेरिकन मदत आणि गुप्तचर सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार खूप सकारात्मक असल्याचे सांगितले.
“आम्ही अमेरिकच्या बाजूने आलेला 30 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव स्विकारत आहोत,” असे त्यांनी जाहीर केले
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, “मागील महिन्यात त्यांच्या आणि युएसचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या संघर्षानंतर, जेद्दाहमधील बैठकीमुळे अमेरिका आणि युक्रेनमधील तणाव ‘कमी’ होण्यास बरीच मदत झाली.”
बुधवारी क्रेमलिनने सांगितले की, ते 30 दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाचे तपशील वॉशिंग्टनकडून येण्याची वाट पाहत आहेत.
ट्रम्प-पुतिन बैठक
यूएसचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी गुरुवारी सांगितले की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील संभाव्य बैठक, युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रगतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.”
रुबियो यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांनी सौदी अरेबियामध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी संभाव्य बैठकीबद्दल चर्चा केली. त्यावेळी त्यांनी लावरोव्ह आणि रशियन अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की, “जोपर्यंत आम्हाला बैठक कशाबद्दल होणार आहे हे कळत नाही तोपर्यंत बैठक होणार नाही.”
“माझ्या मते, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पूतीन यांच्यातील बैठक केव्हा होईल, हे मुख्यतः यावर अवलंबून असेल की, आपण यूक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या दिशेने काही प्रगती करू शकतो का,” असे रुबिओ यांनी पत्रकार कॅथरीन हेरिज यांच्यासोबतच्या X वर प्रसारित करण्यात आलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)