लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौथ्या जनरल बिपिन रावत स्मृति व्याख्यानात, चीनच्या उदयामुळे जागतिक भूराजकारणातील वाढत्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकला. “चीनचा वाढता आर्थिक आणि सामरिक प्रभाव, ग्लोबल साऊथचा नैसर्गिक नेता म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेला आव्हान देत आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
“एक प्रमुख आर्थिक आणि सामरिक शक्ती म्हणून, चीनचा नव्याने उदय झाल्यामुळे जटिलतेचा स्तर वाढला आहे, स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले आहे आणि ‘ग्लोबल साऊथच्या नैतिक नेत्याच्या रूपात’ नावारुपाला येणाच्या भारताच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे,” असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.
बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताची वाढती भूमिका ओळखून, भविष्यातील शक्ती केंद्र म्हणून त्याने आफ्रिकेकडे पाहण्याची असलेली गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, “भारताचे लोकसंख्याशास्त्रीय आणि भौगोलिक फायदे असूनही, त्याची जागतिक स्थिती तुलनेने सामान्य आहे.”
“सतत होणाऱ्या भू-राजनैतिक बदलांमुळे आणि संसाधनांच्या नियंत्रणासाठी चाललेल्या स्पर्धेमुळे, आफ्रिका भविष्यातील सामर्थ्य केंद्र म्हणून उभा ठाकला आहे. मात्र भारताची स्थिती त्याच्या भौगोलिक, लोकसांख्यिक, लोकशाही, समृद्धी स्तर, सॉफ्ट पॉवर आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे येणाऱ्या काळात महत्त्वाची राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धोरणात्मक आव्हाने आणि दोन्ही आघाड्यांवरील धोका
जनरल द्विवेदी यांनी आपल्या भाषणादरम्यान, भारताला आंतरराष्ट्रीय धोरणे आकारण्यात येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि एक महत्त्वाचा भू-राजनीतिक खेळाडू म्हणून भारताची ओळख असूनही, भारताला अधिक प्रभाव निर्माण करण्यात अडचणी उद्भवत आहेत.”
“भारताला वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागल्यामुळे, महत्त्वपूर्ण जागतिक निर्णय थेट आकारण्यामध्ये देशाची क्षमता मर्यादित झाली आहे. ब्रिक्सला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, विशेषतः अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाच्या आव्हानात, ज्याला ट्रम्प प्रशासनाकडून मोठा विरोध झाला आहे. यासंदर्भात, आपल्याला शांघाय सहकार्य संघटनेतील (SCO) घटनाक्रमावर जवळून लक्ष ठेवणे आवश्यक आहे,” अशी चेतावनी त्यांनी दिली.
लष्करप्रमुखांनी चीन आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सामरिक समन्वयाचा संदर्भ देताना, त्यांनी याचा उल्लेख “जवळजवळ पूर्ण संगनमत” असा केला.
“माझ्या दृषटिकोनातून, Two-Front धोका आता वास्तविकता बनला आहे,” असे जनरल द्विवेदी यांनी ठामपणे सांगितले.
दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे शब्द पुन्हा एकदा उद्धृत करत, त्यांनी भारताच्या अनिश्चित सीमांवर निर्माण होणाऱ्या धोक्यांची चेतावनी दिली.
“जेव्हा तुमच्याकडे उत्तर आणि पश्चिमेकडील अनिश्चित सीमावाद असतो, तेव्हा तुम्हाला कधी आणि कुठे लढाई सुरू होईल किंवा संपेल हे माहीत नसते. म्हणून, तुम्हाला दोन्ही फ्रंटसाठी तयार रहावे लागते. आज आपल्या शत्रूंमध्ये जवळजवळ पूर्ण संगनमत झाल्यामुळे धोका अधिक वाढला आहे,” असे त्यांनी सांगितले.
जागतिक संघर्ष आणि पुनर्रचना
जागतिक व्यवस्थेत होणाऱ्या बदलांवर भाष्य करताना, जनरल द्विवेदी म्हणाले की, “युक्रेन आणि गाझामधील अलीकडील संघर्षांमुळे जागतिक युती पुन्हा आकार घेऊ लागल्या आहेत.”
“2025 मध्ये, जग दोन मोठ्या संघर्षांमधून, युक्रेन आणि गाझा – नुकतेच सावरत आहे, जिथे राष्ट्रांनी प्रत्यक्षवाद, आदर्शवाद किंवा अगदी धार्मिक विचारांच्या आधारावर बाजू सावरल्या आहेत,” असे ते म्हणाले.
त्यांनी चीनच्या विद्यमान नियम-आधारित व्यवस्थेला दिलेल्या आव्हानाचा उल्लेख केला, विशेषतः त्याच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाचा, ज्यामुळे त्यांचा प्रभाव आशिया, आफ्रिका, आणि युरोपमध्ये विस्तारला आहे.
“अमेरिका, AUKUS आणि क्वॉडसारख्या गटांमध्ये आपली गटबद्धता मजबूत करत आहे आणि एक मुक्त Indo-Pacific प्रदेशासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे युरोप एक नाजूक मार्ग अवलंबत आहे, मानवाधिकारांच्या तत्त्वांशी संतुलन राखत, चीन आणि अमेरिकेशी संवाद साधत आहे, मात्र तरीही रशियाशी आपल्या दृष्टिकोनाबद्दल युरोप अनिश्चित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “आफ्रिका नव्याने उदयाला येत आहे आणि ग्लोबल साऊथ अधिकाधिक बहु-ध्रुवीय जगाची मागणी करत आहे, जे विविध स्वारस्यांना प्रतिबिंबित करते.”
बदलत्या जगात सुरक्षेचा पुनर्विचार
जनरल द्विवेदी यांनी, बदलत्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीचा आढावा घेत, भारताला सुरक्षा धोरणांचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
“अधिक करणे आणि चांगले करणे हे आता पुरेसे नाही. आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, ज्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करणेही आवश्यक आहे. आजच्या काळात सुरक्षा धोरणाक बदल करणे किंवा वाढ करणे म्हणजे आपल्या संपूर्ण दृष्टिकोनाचीच पुर्नकल्पना आणि पुर्नरचना करण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी भारताच्या पारंपरिक निष्कलंक धोरणाकडून, एक अधिक गतिशील आणि ठाम “बहु-संलग्नता” असलेल्या धोरणाकडे झालेल्या संक्रमणावर प्रकाश टाकला.
“सुरक्षा म्हणजे व्यापक क्षमता… तयारी युद्ध करण्याची आणि युद्ध टाळण्याची. एक मजबूत लष्करी-नागरी एकत्रीकरण, आत्मनिर्भर संरक्षण औद्योगिक आधार, द्विहस्तांतरणीय राष्ट्रीय संसाधने, DIME (परराष्ट्र, माहिती, लष्करी, आर्थिक) फ्रेमवर्कमधील माहितीपूर्ण निर्णय घेणार, आणि नागरिक योद्ध्यांसाठी समावेशक दृष्टिकोन हे सर्वच महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाचा आणि अवकाश युद्धाचा रोल
जनरल द्विवेदी यांनी भाषणादरम्यान, प्रतिबंधात तंत्रज्ञानाची वाढती भूमिका अधोरेखित केली.
“तंत्रज्ञानातील नवनवीन पराक्रम हे प्रतिबंधाचे नवीन चलन बनले आहेत. डेटा हा व्यापार आणि सुरक्षेची नवीन राजधानी म्हणून उदयास आला आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी चीनच्या अवकाशातील वाढत्या लष्करीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि यामुळे तणाव आणि कक्षीय धोक्यांचे प्रमाण वाढते आहे, अशी चेतावनी दिली.
जागतिक प्रभाव आणि प्रशासनातील सुधारणा
जनरल द्विवेदी यांनी, भारताची जागतिक स्थिती मजबूत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसारख्या आंतरराष्ट्रीय प्रशासन संरचनांमध्ये सुधारणा करण्याची मागणी यावेळी केली.
“ग्लोबल साऊथमधील प्रतिनिधींचा समावेश करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे आवश्यक आहे. भारताने वाटाघाटी करणारा किंवा मध्यस्थ म्हणून संघर्ष निराकरणात सक्रियपणे सहभागी व्हावे, मानवतावादी कारणांसाठी आपल्या डायस्पोराचा फायदा घ्यावा आणि जागतिक व्यापारासाठी एक सामान्य व्यासपीठ मिळवावे,” असे त्यांनी आवाहन केले.
त्यांनी भारताच्या शांतता राखण्याच्या आणि दहशतवादविरोधी कार्यांमध्ये भाग घेण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, आणि लष्कराचे राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
“जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाविरुद्ध लढण्याचा आमचा प्रत्यक्ष अनुभव पाहता, भारताने शांतता राखण्याच्या कारवायांचे नेतृत्व करावे, अण्वस्त्रांना राजकीय प्रतिबंधक म्हणून समर्थन द्यावे आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक युद्धात निर्णायक भूमिका बजावावी,” असे त्यांनी सांगितले.
पुढील मार्गाचा आढावा
जनरल द्विवेदी यांनी त्यांच्या भाषणात, भारताच्या भू-राजकीय आव्हानांचे एक गुंतागुंतीचे चित्र रेखाटले. चीनचा उदय आणि चीन-पाकिस्तान संबंध मजबूत होत असताना, उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी भारताने आपल्या राजनैतिक, तांत्रिक आणि लष्करी क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
भारत जागतिक स्तरावर स्वतःला रिप्रेझेंट करत असताना, पुढील मार्गाचा आढावा घेऊन त्यादृष्टीने नेव्हिगेट करण्यासाठी युतींचा फायदा घेणे, प्रतिबंधकतेची पुनर्कल्पना करणे आणि साऊथ ग्लोबल हितांचे समर्थन करणे, या गोष्टींचे काळजीपूर्वक संतुलन राखणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
टीम भारतशक्ती