60 व्या शहीद वर्धापनदिनानिमित्त, कॅप्टन सी.एन सिंग यांचा गौरवपूर्वक सन्मान

0
60
CINCAN लेफ्टनंट जनरल डी.एस. राणा यांनी, कॅप्टन सी.एन. सिंह, MVC यांच्या 60व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या भावाकडून पदके स्वीकारली.

मंगळवारी, धर्मशाळा येथे अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ आणि गढवाल रायफल्स व गढवाल स्काऊट्सचे कर्नल- लेफ्टनंट जनरल दिनेश सिंह राणा, यांच्या नेतृत्वाखाली एक लष्करी समारंभ पार पडला. कॅप्टन चंदर नारायण सिंह, महावीर चक्र (MVC) यांच्या हौतात्म्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कॅप्टन सी.एन. सिंह, हे गढवाल रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनचे एक शूर अधिकारी होते. 1965 च्या भारत-पाक युद्धादरम्यान 5 ऑगस्ट रोजी, पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारताचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

या समारंभात एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा कॅप्टन सिंह यांचे बंधू सुखदेव सिंह यांनी, त्यांचे महावीर चक्र आणि इतर सेवा पदके रेजिमेंटकडे सुपूर्द केली. लेफ्टनंट जनरल राणा यांनी ही पदके स्वीकारली. या कृतीतून रेजिमेंट आपल्या हुतात्मा झालेल्या सैनिकांचा किती आदर करते, हे दिसून आले.

लेफ्टनंट जनरल राणा यांनी, कॅप्टन सी.एन. सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “कॅप्टन सिंह हे “शौर्य, नेतृत्व आणि सर्वोच्च त्यागाचे ज्वलंत उदाहरण आहेत.” कॅप्टन सिंह यांची शौर्यगाथा पुढील पिढ्यांमधील भारतीय लष्कर आणि नागरिकांसाठी प्रेरणास्रोत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

या समारंभाला लेफ्टनंट जनरल राजन शरावत, जीओसी 9 कॉर्प्स; ब्रिगेडियर विनोद सिंह नेगी, गढवाल रायफल्स रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट; तसेच रेजिमेंटचे माजी सैनिक, सेवारत अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

ही पदके आता, उत्तराखंडमधील लॅन्सडाउन येथील गढवाल रायफल्स रेजिमेंट सेंटरच्या संग्रहालयात जतन करून ठेवली जातील. ही पदके रेजिमेंटच्या शौर्याची आणि तिच्या सैनिकांच्या निस्वार्थ सेवेची आठवण म्हणून कायम राहतील.

लेफ्टनंट जनरल राणा यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या वैयक्तिक सहभागामुळे, लष्कर आपल्या हुतात्म्यांचा आदर राखण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी जोडलेले राहण्यासाठी किती कटिबद्ध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यांनी सर्व सैनिकांना अशा वारशातून प्रेरणा घेऊन रेजिमेंटची सर्वोच्च परंपरा कायम राखण्याचे आवाहन केले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारताद्वारे आयोजित UN सैन्यदल परिषदेला, पाकिस्तान व चीनला निमंत्रण नाही
Next articleMDAVF च्या गुंतवणूकीमुळे, संरक्षण क्षेत्रातील इंधन पायाभूत सुविधांना बळकटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here