किम जोंग यांची संयुक्त लष्करी सरावांवर टीका, जलद अणुविस्ताराची मागणी

0

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते, किम जोंग उन यांनी देशाच्या अण्वस्त्र साठ्यात जलद वाढ करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच अमेरिका–दक्षिण कोरियामधील संयुक्त लष्करी सरावांवर त्यांनी, “युद्धाच्या तयारीचा स्पष्ट पुरावा” असे म्हणत तीव्र टीका केली आहे, अशी माहिती उत्तर कोरियाच्या KCNA या सरकारी वृत्तसंस्थेने मंगळवारी दिली.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी, या आठवड्यात संयुक्त लष्करी सराव सुरू केले आहेत, ज्यामध्ये उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोक्यांवर सुधारित प्रतिसाद यंत्रणा तपासली जात आहे. किम यांनी सोमवारी, नौदलाच्या एका विध्वंसक जहाजाच्या भेटीदरम्यान हे वक्तव्य केल्याचे KCNA ने नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हा लष्करी सराव म्हणजे उत्तर कोरियाविरोधातील सर्वाधिक वैरभाव आणि संघर्षाची वृत्ती दर्शवणारा कृतीशील पुरावा आहे. त्यामुळे उत्तर कोरियाला जलदगतीने अण्वस्त्र शस्त्रसज्जतेत वाढ करावी लागेल.”

Ulchi Freedom Shield सराव

अमेरिका–दक्षिण कोरियामधील ‘Ulchi Freedom Shield’ नावाचा 11 दिवसीय वार्षिक सराव, यंदाही गेल्यावर्षी प्रमाणेच होणार आहे, मात्र त्यातील 40 पैकी 20 क्षेत्रीय सराव कार्यक्रम सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांनी, उत्तर कोरियासोबत तणाव कमी करण्याच्या भूमिकेचा उल्लेख केला असला, तरी विश्लेषक Pyongyang च्या प्रतिसादाबाबत साशंक आहेत.

‘शत्रुत्वपूर्ण आणि संघर्षपूर्ण’

केसीएनएच्या भाषणाच्या इंग्रजी भाषांतरानुसार, सोमवारी नौदलाच्या शक्तीशाली जहाजाला भेट देताना, किम जोंग म्हणाले की, “या संयुक्त लष्करी सरावातून, उत्तर कोरियाप्रती त्यांच्या शत्रुत्वपूर्ण आणि संघर्षपूर्ण हेतूची स्पष्ट अभिव्यक्ती” होते.

त्यांनी सांगितले की, सुरक्षा वातावरणामुळे उत्तर कोरियाने त्यांचा अण्वस्त्रसाठा “जलदपणे विस्तारित” करावा. अलीकडील अमेरिका-दक्षिण कोरिया सरावांमध्ये “अण्वस्त्र घटक” समाविष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या आगामी बैठकीत उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या विकासाला तोंड देण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

अण्वस्त्र आणि नौदल विस्तार

Federation of American Scientists च्या एका अहवालानुसार, उत्तर कोरियाकडे 90 अण्वस्त्र निर्मितीसाठी पुरेशी विखंडनक्षम सामग्री असू शकते, पण प्रत्यक्षात सुमारे 50 अण्वस्त्रे तयार झाली असावीत. याशिवाय, उत्तर कोरिया 5,000 टन क्षमतेच्या ‘Choe Hyon’ वर्गातील तिसऱ्या विध्वंसक जहाजाचे बांधकाम पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, आणि या जहाजांसाठी क्रूझ क्षेपणास्त्रे तसेच अँटी-एअर मिसाईल्सची चाचणीही सुरू आहे.

किम जोंग उन, यांचे अलीकडील वक्तव्य आणि उत्तर कोरियाच्या हालचाली, हे अणु क्षमतेच्या आक्रमक विस्ताराकडे आणि सामरिक संघर्षाच्या दिशेने एक स्पष्ट पाऊल मानले जात आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने आपल्या सरावांना संरक्षणात्मक म्हटले असले, तरी Pyongyang त्याकडे “आक्रमणाची पूर्वतयारी” म्हणून पाहत आहे आणि त्यावर तितकाच ठाम प्रतिसादही देत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत–बांगलादेश मैत्रीचा ‘सुवर्ण अध्याय’, पुन्हा लिहिला जाऊ शकतो का?
Next articleट्रम्प प्रशासनात 6 हजारांहून अधिक विद्यार्थी व्हिसा रद्द: परराष्ट्र विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here