Indonesia: दंगलीनंतर आंदोलकांनी मोर्चे पुढे ढकलले, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

0

इंडोनेशियन विद्यार्थी संघटना आणि नागरी समाज गटांनी, सोमवारी जकार्तामधील नियोजित निदर्शने मागे घेतली. मागील आठवड्याभरात, खासदारांच्या पगारावरून आणि पोलिसांच्या आक्रमक कारवाईवरून जनतेचा रोष वाढला होता. आठवड्याच्या, अखेरीस देशभर उसळलेल्या हिंसक दंगलींनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली, ज्यामुळे मोर्चे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला.

ही निदर्शने, एका आठवड्यापूर्वी सुरू झाली आणि ती देशभर पसरत गेली. गुरुवारी रात्री, पोलिसांच्या वाहनाने एका मोटारसायकल टॅक्सी चालकाला धडक दिल्याने, या आंदोलनाची तीव्रता आणि स्वरुप वाढत गेले. या निदर्शनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, असे मुख्य आर्थिक मंत्री एअरलांगा हार्टार्टो यांनी सांगितले.

आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न

रविवारी, राष्ट्रपती प्रबोवो सुबियाँतो यांनी सांगितले की, “राजकीय पक्षांनी खासदारांचे भत्ते कमी करण्यास सहमती दर्शवली आहे,” जेणेकरून आंदोलने शांत होतील. तसेच त्यांनी लुटारू आणि दंगलखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश लष्कर आणि पोलिसांना दिले. काही राजकीय पक्ष सदस्यांच्या घरांवर आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्यात आला किंवा त्यांना पेटवण्यात आले.

‘अलायन्स ऑफ इंडोनेशियन वुमन’ या महिला नेतृत्वाखालील नागरी समाज गटाने, सरकारी दडपशाहीचा धोका जाणवत असल्यामुळे, संसदेसमोरचे मोर्चे पुढे ढकलल्याचे सांगितले.

“ही विलंबित घोषणा, अधिक हिंसक कारवाईपासून टाळण्यासाठी आहे… परिस्थिती शांत होईपर्यंत हा निर्णय कायम राहील,” असे त्यांनी रविवारी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले.

विद्यार्थी संघटनांनीही सोमवारचे मोर्चे पुढे ढकलले. एका समन्वयक गटाने सांगितले की, “अत्यंत असहनीय परिस्थितीमुळे” हा निर्णय घेण्यात आला आहे.

बनावट निदर्शनांच्या अफवा

पश्चिम जावा येथील पुरवाकार्ता आणि योग्याकार्ता शहरात विद्यार्थी गटांनी, सोमवारी निदर्शनांची योजना असल्याचे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगितले. मात्र, रॉयटर्स या निदर्शनांची तत्काळ पुष्टी करू शकले नाहीत.

काही सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे बनावट निदर्शनांच्या अफवांची माहिती देण्यात आली असून, लोकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्थमंत्री इंद्रावती यांचे घर लुटले

अर्थमंत्री श्री मल्यानी इंद्रावती, यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले की- “त्या लुटारूंच्या निशाण्यावर आल्या होत्या. त्यांनी लोकांना लूटमार न करण्याचे आवाहन केले आणि सरकारच्या त्रुटींबद्दल माफी मागितली.”

या निदर्शनांचा आणि हिंसाचाराचा आर्थिक बाजारावर परिणाम झाला आहे. सोमवारी शेअर बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात 3% पेक्षा जास्त घसरण झाली.

एअरलांगा हार्तार्तो यांनी सांगितले की, “अर्थव्यवस्था मूलभूतदृष्ट्या मजबूत आहे आणि लवकरच जाहीर होणाऱ्या प्रोत्साहनात्मक पॅकेजमुळे तिला अधिका चालना मिळेल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारताच्या तेल आयातीमुळे रशियन युद्धाला चालना? ही मोठीच थट्टा: पंकज सरन
Next articleरशियाने युक्रेनच्या वीज सुविधांना केले लक्ष्य, झेलेन्स्की यांनी दिला सूडाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here