मोदी आणि पुतिन यांच्या फोटोमुळे, चीनच्या Weibo वर चर्चांना उधाण

0
Weibo

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, लिंबोझिनी कारमध्ये एकत्र बसलेल्या फोटोला इंटरनेटवर व्हायरल होऊन दोन दिवस झालेत, पण या फोटोविषयीच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीयेत.

चीनच्या Weibo (X अर्थात ट्विटरच्या पर्यायी प्लॅटफॉर्म) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर- #Modi took Putin’s special car to the meeting हा हॅशटॅग व्हायरल होत असून, त्याला जवळपास तीन दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच Zhihu, WeChat, Netease आणि Weibo सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर यासंबंधी 200 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. थोडक्यात, या फोटोने चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चर्चांना पूर आला आहे.

एका चिनी पॉडकास्टरने (खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये) असा प्रश्न उपस्थित केला आहे की: “चीनच्या भूमीवर मोदी पुतिन यांच्या कारमधून गेले, जिथे दोघांनी जवळपास तासभर खासगी चर्चा केली, भिंतींनाही कान असतात अशी चिंता त्यांना होती का?”

वर उल्लेख केलेल्या एका चिनी पॉडकास्टच्या स्क्रीनशॉटवर असे प्रक्षोभक शीर्षक होते: “चीनच्या भूमीवर, मोदी पुतिन यांच्या गाडीत बसले, जिथे दोघांनी जवळजवळ एक तास खाजगी चर्चा केली, त्यांना भीती वाटली का की भिंतींना कान असतील?”

या सर्व चर्चा सूचित करतात की, कदाचित चिनी नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सरकारी पाळत ठेवणाऱ्या दडपशाही यंत्रणेमुळे हेरगिरी केली जाण्याची भीती वाटते. मोदी आणि पुतिन यांचा कारमधील एकत्र प्रवास 40 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालला आणि नंतर मोदींनी तो “अत्यंत माहितीपूर्ण” (insightful) असल्याचे म्हटले, ज्यामुळे Weibo वर चर्चा अधिकच वाढली.

चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झिहू (Zhihu) ने दावा केला की, ‘मोदींनी कोणत्याही पूर्व निमंत्रणाशिवाय हे कृत्य केले. ते सहजपणे पुतिन यांच्या गाडीत बसले आणि दोघे एकत्र त्यांच्या चर्चेसाठी गेले.’एका दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या अन्य एका सत्यापित Weibo अकाउंटने, मोदी आणि पुतिन यांच्या व्हायरल झालेल्या फोटोतून एक मीम (meme) बनवले. या पोस्टमध्ये एक काल्पनिक संभाषण दाखवले आहे, जिथे मोदी पुतिन यांना विचारतात की, “अलास्कामध्ये त्यांची चर्चा कशी झाली आणि युद्धविराम होईल का..” यावर पुतिन त्यांना “काळजी करू नका”, असे सांगतात आणि युद्धविरामाचे वचन देतात.याव्यतिरिक्त, मोदी भविष्यात तेलावर आणखी मोठी सूट (discount) मागत आहेत, ज्यामुळे पुतिन निःशब्द झाले आहेत… असे मिमही व्हायरल झाले.

फोटोवरील अनेक प्रतिक्रियांच्या गर्दीत, एक टिप्पणी लक्षवेधी ठरली, ती म्हणजे: “हे पाहून लाओ चुआनचा मूड कसा असेल?” लाओ चुआन म्हणजे ‘Old Trump’ या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी वापरले जाणारे टोपणनाव आहे.

झोलिशुओशी (Zhaolishuoshi) नावाच्या हँडलवर पोस्ट करणाऱ्या आणि अर्धा दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांद्वारे फॉलो केल्या जाणाऱ्या आणखी एका Weibo वेइबो ब्लॉगरने, एका अहवालाची कॅप्शन देत शेअर केले की: “पुतिन ट्रम्प यांच्या उदाहरणाचे अनुसरण करत, मोदींसोबत एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. रशिया-भारत मैत्री अभेद्य आहे, ज्यामुळे अमेरिका गोंधळून गेली आहे.”

या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या, 2019 मध्ये ह्युस्टन येथे झालेल्या “हाउडी, मोदी” कार्यक्रमातील आणि नंतर 2020 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या “नमस्ते ट्रम्प” भेटीदरम्यानची मोदींसोबतच्या प्रवासाची समांतर रेषा दर्शवली आहे.

त्याच Weibo हँडलवर- शेन्झेन सॅटेलाइट टीव्हीने पोस्ट केले की, नेत्यांमधील अशी ‘हिचहाइकिंग डिप्लोमसी’ (hitchhiking diplomacy) अत्यंत दुर्मिळ आहे, मात्र हा दावा वस्तुस्थितीनुसार चुकीचा ठरतो, कारण यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी, अलास्कातील अँकोरेज येथे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाडीत बसले होते आणि त्यांनी कोणत्याही दुभाषकाशिवाय वन-टू-वन चर्चा केली होती.

By- Resham

+ posts
Previous articleरशिया आणि भारतात अतिरिक्त S-400 Missile प्रणालीसाठी चर्चा सुरू- TASS
Next articleProject 75(I) Gains Momentum as India Seeks Full Tech Transfer, TKMS Seals New Indian Partnerships

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here