भू-राजकीय संतुलन: मॉस्कोमध्ये भारत, पाकिस्तान, चीन यांचा लष्करी सराव

0

मॉस्कोची लष्करी भागीदारांना एकत्र आणणारी अनपेक्षित भूमिका अधोरेखित करणाऱ्या एका उपक्रमाखाली आयोजित, ‘ZAPAD 2025’ या लष्करी सरावामध्ये, ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदल एकाच प्रशिक्षण मैदानावर उतरले आहे.

1 ते 17 सप्टेंबर दरम्यान पश्चिम रशियात होत असलेल्या या सरावात, चीनसह 20 देशांचे सैन्यदल सहभागी झाले आहे. ज्यामुळे हे युद्धसराव भू-राजकीय संतुलनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

रशियाचे संतुलनाचे धोरण

रशियासाठी, प्रतिस्पर्धी देशांना एकाच व्यासपीठावर आणणे दुहेरी उद्दिष्ट साधते: जागतिक सुरक्षा व्यवहारात स्वतःला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून पुन्हा स्थापित करणे आणि जुन्या संरक्षण भागीदारींचा उपयोग करणे. भारत, पाकिस्तान आणि चीन एकाच सरावाच्या ठिकाणी एकत्र आणून, त्यांना काळजीपूर्वक वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवले असले तरी, मॉस्कोने हे दाखवून दिले आहे की ते प्रादेशिक प्रतिस्पर्धकांना एकत्र आणू शकतात, त्यांच्यातील वादामुळे कार्यक्रमात कोणतीही अडचण येत नाही.

भारताची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तियानजिन येथे आयोजित SCO शिखर परिषदेत अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर, भारताने 70 सैनिकांचे एक पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्लीसाठी, ही सहभागिता भारत-रशिया संरक्षण सहकार्याची निरंतरता दर्शवते, जरी भारत पाश्चात्त्य भागीदारी आणि मॉस्कोसोबतच्या जुन्या संबंधांमध्ये नाजूक संतुलन राखत आहे.

या सरावामध्ये पाकिस्तान आणि चीनची उपस्थिती परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करते. पाकिस्तानला बीजिंगसोबत एकत्र ठेवले असताना, भारत स्वतंत्रपणे कार्य करत आहे, जे मॉस्कोच्या जवळिकीचे आणि सक्तीच्या परस्परसंवादाशिवायचे व्यवस्थापन दर्शवते.

‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण

हा सराव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, म्हणजे सीमेपलीकडील धोक्यांना भारताने दिलेल्या उच्च-स्तराच्या लष्करी प्रतिसादामुळे, भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यांची पहिली दृश्यमान समांतर तैनाती (visible parallel deployment) आहे. एकाच ठिकाणी त्यांची उपस्थिती, जरी त्यांच्यात थेट संवाद नसला तरी, प्रतीकात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दोन शत्रुत्व असलेल्या शेजाऱ्यांच्या सैनिकांचे एकाच ठिकाणी असणे, प्रतिस्पर्धकांना सामान्य बहुपक्षीय चौकटीत (multilateral frameworks) कसे आणले जाऊ शकते याची एक दुर्मिळ, क्षणिक झलक देते. हे आत्मविश्वास वाढवण्याच्या प्रयोगाचे संकेत आहे की हे केवळ रशियाच्या एकत्र आणण्याच्या क्षमतेचा परिणाम आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

परिणामांपेक्षा बाह्य स्वरूप महत्त्वाचे

संरक्षण तज्ञ, लष्करी महत्त्वावर जास्त जोर न देण्याचा सल्ला देतात. खरा संदेश बाह्य स्वरूपात आहे: अशावेळी जेव्हा इतरत्र मोठ्या सत्तांमध्ये स्पर्धा तीव्र होत आहे, तेव्हा भारत, पाकिस्तान आणि चीन तिन्ही रशियन भूमीवर सैन्य उतरवत आहेत.

एका दक्षिण आशिया तज्ज्ञाने निरीक्षण नोंदवले, “रशियाने प्रतिस्पर्धकांना एकाच तंबूत आणले आहे, हे जगाला आठवण करून देत आहे की बहुध्रुवीय जगात (multipolarity) मॉस्को अजूनही स्वतःची पटकथा लिहितो.”

ZAPAD सरावानंतर, भारत ऑक्टोबरमध्ये रशियासोबत वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव ‘इंद्रा’ (INDRA) आयोजित करणार आहे. 2003 मध्ये सुरू झालेला आणि नंतर तिन्ही सशस्त्र दलांचा समावेश करण्यासाठी विस्तारित झालेला हा सराव आता आधुनिक युद्ध, दहशतवादविरोधी कारवाई, सायबर संरक्षण आणि मानवतावादी मोहिमांवर लक्ष केंद्रित करतो. या सरावाच्या ताज्या आवृत्तीसाठी पुढील महिन्यात रशियन सैन्य भारतात येणार आहे, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होतील.

मूळ लेखिका- हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleहमासने ओलिसांचे फुटेजचे प्रसारण केल्यानंतर गाझा शहरावर जोरदार हल्ला
Next articleव्हेनेझुएलातील सत्तेत बदल होण्याची शक्यता ट्रम्प यांनी फेटाळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here