भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांच्यात भागीदारी; ‘ULTRA UAV‘ भारतात येणार

0

भारत फोर्ज लिमिटेड (BFL)– भारतातील सर्वात मोठी फोर्जिंग आणि युकेची अ‍ॅडव्हान्स्ड इंजिनिअरिंग कंपनी- विंडरेसर्स लिमिटेड, यांच्यात नुकतीच महत्वपूर्ण संरक्षण भागीदारी झाली, ज्यामध्ये ‘ULTRA UAV‘ (मानवविरहित हवाई वाहन) भारतात आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. लंडनमध्ये भरवण्यात आलेल्या Defence and Security Equipment International (DSEI) प्रदर्शनामध्ये, सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करून ही भागीदारी जाहीर करण्यात आली.

कंपनीनुसार, या सहकार्याचा उद्देश पुढील दोन वर्षांच्या कालावधीत स्थानिक उत्पादन, संयुक्त चाचण्या आणि ULTRA UAV चे भारतात ऑपरेशनल वापर विकसित करणे हा आहे. ही भागीदारी यूके-भारत मुक्त व्यापार करार (FTA) चर्चांच्या पार्श्वभूमीवर होत असून, India–UK Vision 2035 या दीर्घकालीन सामरिक सहकार्याच्या आराखड्याशी सुसंगत आहे.

ULTRA हेवी-लिफ्ट UAV, हे जास्त पेलोड वाहून नेण्याची क्षमता असलेले आणि सात तासांपर्यंत सलग उड्डाण करण्यास सक्षम वाहन आहे. हे UAV भारताच्या लष्करी आणि नागरी गरजांसाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. संभाव्य उपयोगांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: भारतीय नौदलासाठी जहाजावरून सामग्री पोहोचवणे (Carrier Onboard Delivery-COD), सेनेसाठी उंचावरील भागांमध्ये लॉजिस्टिक पुरवठा,  हवाई दलासाठी अतिजरूरी साहित्याची वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन, दुर्गम भागांतील कनेक्टिव्हिटी, आणि इतर द्वैतीय वापराचे (dual-use) ऑपरेशन्स.

“विंडरेसर्स ULTRA केवळ भारताच्या स्वदेशी UAV क्षमतेत भर घालत नाही, तर जगातील काही अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितींमध्येही विश्वासार्ह लॉजिस्टिक उपाय प्रदान करते,” असे भारत फोर्जचे सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले.

विंडरेसर्सचे CEO सायमन म्यूडरॅक यांनी सांगितले की, “ही भागीदारी ULTRA UAV च्या द्वैतीय उपयोगाच्या भूमिकेला विस्तारित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे UAV यापूर्वीही अंटार्क्टिक संशोधनासाठी कठीण हवामानात यशस्वीपणे वापरले गेले आहे.”

हा करार, भारत फोर्जच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील वाढत्या सहभागाचे उदाहरण आहे. भारतीय उद्योग UAV क्षेत्रात स्वदेशी उत्पादन क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चाचण्या यशस्वी झाल्यास, दोन्ही कंपन्या भारतामध्ये दीर्घकालीन उत्पादन आणि उपयोजनासाठी अधिकृत करार करण्याची शक्यता आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Weighs Russian Su-57 Fighters as Fifth-Gen Option Ahead of Putin Visit
Next articleभारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान संकटात राफेल आघाडीवर: विशेष पुष्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here