संरक्षण मंत्रालयाची सर्वात मोठी ऑर्डर; 97 Tejas Mk1A जेट्सचा समावेश

0

संरक्षण मंत्रालयाने (MoD) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत, 97 Tejas Mk1A लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) साठी 62,370 कोटी रुपयांचा (कर वगळून) करार केला आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी, संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया 2020 च्या ‘बाय (इंडिया-IDDM)’ श्रेणी अंतर्गत झालेल्या या करारामुळे, भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरली आहे. तसेच, सरकारच्या आत्मनिर्भरता अभियानासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या विमानांची डिलिव्हरी 2027-28 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 68 सिंगल-सीट फायटर आणि 29 ट्विन-सीट ट्रेनर विमानांचा समावेश असून, ही सर्व 97 विमाने सहा वर्षांच्या कालावधीत भारतीय हवाई दलात (IAF) सामील केली जातील.

HALने विकसित केलेले तेजस Mk1A, हे भारताच्या LCA मालिकेतील सर्वात आधुनिक व्हर्जन आहे. यात एव्हिऑनिक, शस्त्रे, रडार आणि टिकाऊपणा यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (MoD) निवेदनात म्हटल्यानुसार, मागील ऑर्डर्सच्या तुलनेत, या नवीन बॅचमध्ये 67 नवीन स्वदेशी घटक समाविष्ट आहेत, ज्यामुळे एकूण स्वदेशी सामग्री 64% पेक्षा जास्त झाली आहे.

भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील अलीकडील प्रगतीमध्ये, DRDO द्वारे UTTAM AESA रडार, स्वयं-रक्षा कवच इलेक्ट्रॉनिक सेल्फ-प्रोटेक्शन सूट, आणि स्थानिक पातळीवर विकसित केलेले कंट्रोल सरफेस अॅक्च्युएटर्स यांचा समावेश आहे. या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताची आयातीवरील निर्भरता लक्षणीयरीत्या कमी होईल आणि स्वदेशी संरक्षण क्षमता वाढेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 100 हून अधिक भारतीय विक्रेते सामील होणार आहेत, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 11,750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. एचएएलच्या बेंगळूरू आणि नाशिक येथील प्लांट्समध्ये हे काम पूर्ण क्षमतेने सुरू राहील, जे 2021 मध्ये 46,898 कोटी रुपयांना ऑर्डर केलेल्या 83 तेजस Mk1A जेट्सच्या उत्पादनासोबत समांतरपणे चालवले जाईल.

भारतीय हवाई दल (IAF) अजूनही 2021 च्या ऑर्डरमधील पहिल्या विमानांच्या डिलिव्हरीची वाट पाहत आहे, एचएएलला ऑक्टोबर 2025 पर्यंत दोन विमाने सोपवण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अस्त्र (Astra) बियॉन्ड-व्हिज्युअल-रेंज क्षेपणास्त्रे, प्रगत शॉर्ट-रेंज क्षेपणास्त्रे आणि लेझर-गाईडेड बॉम्ब यांच्यासह शस्त्रास्त्रांच्या एकत्रीकरणाच्या चाचण्या प्रमाणपत्रापूर्वी अंतिम टप्प्यात आहेत.

भारतीय हवाई दलातील फायटर विमानांची संख्या, मंजूर 29 स्क्वाड्रन्सच्या तुलनेत 42 पेक्षा कमी झाली आहे. जुन्या मिग-21 (MiG-21s) विमाने निवृत्त झाल्यामुळे ही कमतरता आणखी वाढली आहे. 97 विमानांची ही नवीन ऑर्डर भारतीय हवाई दलाला पाच अतिरिक्त स्क्वाड्रन्स तयार करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे सर्व प्रलंबित आणि नवीन डिलिव्हरी पूर्ण झाल्यावर तेजस विमानांचा ताफा 11 स्क्वाड्रन्सपर्यंत वाढेल.

तेजस Mk1A हे हवाई संरक्षण आणि हल्ल्याच्या दोन्ही भूमिकांमध्ये आघाडीवर राहतील. यामुळे तेजस Mk2 आणि अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) सारखी भविष्यातील विमाने सेवेत येईपर्यंतची महत्त्वाची पोकळी भरून काढली जाईल.

तेजस Mk1A मध्ये जीई (GE) च्या F404-IN20 इंजिनचा वापर सुरूच राहील. भारताने 2021 मध्ये, यापैकी 99 इंजिनचा करार केला होता, परंतु वाढलेल्या उत्पादन लाइनला सुरू ठेवण्यासाठी जीई कडून अतिरिक्त खरेदी अपेक्षित आहे. डिलिव्हरीचे वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी एचएएलची जीईसोबतची समन्वय क्षमता खूप महत्त्वाची असेल. 97 जेट्सच्या करारासाठी, एचएएल लवकरच जीईसोबत 113 आणखी इंजिनांसाठी एक नवीन करार करेल.

हा करार, प्रादेशिक सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर आला आहे. चीनने पाचव्या पिढीतील (5th gen) फायटर विमाने तैनात करणे आणि बीजिंगसोबत संयुक्त सरावाद्वारे पाकिस्तानच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करणे, यामुळे भारताच्या स्वदेशी लष्करी क्षमतेला चालना मिळाली आहे. तेजस विमानांचा ताफा वाढवून भारत आत्मनिर्भरतेवर जोर देत आहे आणि उशिरा का होईना, आपल्या शेजारील देशांमधील वाढत्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी तयारी करत आहे.

तेजस Mk2 वर सध्या काम सुरू असून, त्यात पेलोड, रेंज आणि सेन्सर्समध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात येत आहेत. ही पुढील पिढीतील (next-generation) LCA जुन्या जग्वार, मिराज 2000 आणि मिग-29 ची जागा घेईल, अशी अपेक्षा आहे. आगामी AMCA पाचव्या पिढीच्या फायटरसोबत, तेजस कुटुंब 2040 पर्यंत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताफ्याचा कणा बनेल.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleमालदीव: नवीन मीडिया कायदा सरकारच्या हेतूबद्दल शंका वाढवणारा…
Next articleNew Series Alert – Inside CIJWS Vairengte: India’s Elite Counter Insurgency and Jungle Warfare School. Promo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here