पाकिस्तान वॉशिंग्टन मैत्रीच्या जोडीला खैबर पख्तूनख्वात नवे लष्कर कॅम्प

0
खैबर

पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वाच्या (केपीके) अंतर्गत भागात एक नवीन प्रशिक्षण आणि निवासी सुविधा बांधत असल्याचे गुप्तचर माहितीत उघड झाले आहे. हे पाऊल म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) आणि पंजाबमधील त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांपासून दूर जाणारा धोरणात्मक बदल दर्शवते, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जसे हल्ले झाले त्याप्रमाणे भविष्यातील भारतीय लष्करी हल्ले टाळण्यासाठी एक सुनियोजित प्रयत्न म्हणून देखील याकडे बघता येईल.

 

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेशी नव्याने राजनैतिक चर्चांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत तर दुसरीकडे मरकझ जिहाद-ए-अक्सा नावाच्या या लष्कर-ए-तैयबा प्रशिक्षण शिबिराचे बांधकाम सुरू झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीने विशेषतः धोरणात्मक अंतर्गत प्रवाह आणि इस्लामाबादकडे वॉशिंग्टनच्या सूरातील अलीकडील बदल लक्षात घेता नवी दिल्लीत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


केपीकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधाः धोरणात्मक पुनर्वसन

22 सप्टेंबर 2025 रोजी हाती आलेली दृश्ये आणि वर्गीकृत माहिती यातून या गोष्टीला दुजोरा मिळतो की LeT चे नवीन बांधकाम अफगाण सीमेपासून फक्त 47 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोअर दीरच्या कुंबन मैदानी भागात उभारले जात आहे. ही जागा 4 हजार 600 चौरस फुटांवर पसरलेली असून अलीकडेच पूर्ण झालेल्या जामिया अहले सुन्नाह मशिदीला लागून आहे. LeT शी संलग्न असलेली एक प्रसिद्ध धार्मिक संस्था असून तिच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या या बांधकामामुळे एक गोष्ट सूचित होते की धार्मिकतेच्या बुरख्याखाली दहशतवादी कारवाया लपवायच्या.

आणखी एका गोष्टीमुळे हे बांधकाम विशेष चिंतेची बाब ठरते ती म्हणजे त्यात सहभागी असलेल्या कमांडरांचा इतिहास. हे केंद्र 2006 च्या हैदराबाद बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाच्या PoK प्रशिक्षण शिबिराचा माजी प्रमुख नस्र जावेद याच्या अखत्यारीत आहे. नियोजित प्रशिक्षण कार्यक्रम-दौरा-ए-खास आणि दौरा-ए-लश्कर-हे प्रगत गुरिल्ला डावपेच आणि फिदायीन कारवायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जातात. हे ठिकाण भारतीय सैन्याने मे 2025 मध्ये हल्ला केलेल्या भीम्बर-बर्नाला येथील नष्ट झालेल्या मरकज अहले हदीस छावणीची जागा घेण्यासाठी तयार केले आहे.

याशिवाय त्याच प्रदेशातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवर झालेल्या (TTP) पाकिस्तानच्या लष्करी कारवाईनंतर अवघ्या काही आठवड्यांनी हे बांधकाम सुरू झाले. त्यामुळे राज्य समर्थित दहशतवादी पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा करण्यासाठी हे पाऊल उचललेले  गेले असे म्हणता येईल. लष्कराच्या या कारवाईत दोन डझनहून अधिक TTP कार्यकर्त्यांचा खात्मा करण्यात आला, ज्यामुळे LeT आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या (HM) राज्य समर्थक गटांना हातपाय पसरण्याचा मार्ग मोकळा झाला.

अमेरिका-पाकिस्तानची राजनैतिक पुनर्रचना

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये शरीफ आणि मुनीर दोघांचेही स्वागत केले, त्यांना “महान नेते” असे संबोधले आणि अमेरिका-पाकिस्तान संबंधांमधील तणाव निवळण्याचे संकेत दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “एकीकडे LeT अफगाण सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर एक नवीन प्रशिक्षण तळ बांधला असताना, अमेरिका-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न म्हणजे “आमचा दृष्टीकोन हरवलेला नाही तर असमान युद्धासाठी पुनर्निर्मित धोरणात्मक सखोलता तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहोत ”

ऐतिहासिकदृष्ट्या, शीतयुद्ध आणि दहशतवादविरोधी युद्धादरम्यान धोरणात्मक मित्र असलेल्या वॉशिंग्टनपासून अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेन सापडल्यानंतर दुटप्पीपणाचा आरोप असलेल्या राष्ट्रापर्यंत, वॉशिंग्टनने पाकिस्तानबद्दलचा आपला दृष्टिकोन सतत बदलता ठेवला आहे. ट्रम्प यांनी स्वतः 2018 मध्ये “खोटेपणा आणि फसवणुकीशिवाय काहीही न दिल्याबद्दल” पाकिस्तानची निंदा केली होती. त्यामुळे अलिकडच्या काळात त्यांच्यातील संबंधांमध्ये झालेला बदल आश्चर्यकारक आणि चिंताजनक आहे.

भारताचे सुरक्षाविषयक गणित

अमेरिका पाकिस्तान यांच्यातील बदलत्या संबंधांचा भारतावर होणारे परिणाम गंभीर आहेत. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि एचएम आता लोअर दिर आणि मानसेरा येथे कारवाया केंद्रित करत असल्याने, भारतीय लष्कराला सीमापार धोके पुन्हा उदयाला येत असल्याचे दिसत आहे, अर्थात नवीन तळ आता पाकिस्तानी हद्दीतून खूप आत हलवण्यात आले आहेत. उपग्रह आणि ड्रोन फुटेजवरून केपीकेमधील अनेक ठिकाणी समन्वयित पायाभूत सुविधांच्या विकासाची पुष्टी होते, कदाचित पाकिस्तानच्या आयएसआय स्पेशल ऑपरेशन्स डायरेक्टरेटच्या देखरेखीखाली ते होत असावे.

विशेषतः त्रासदायक गोष्ट म्हणजे प्रशिक्षण केंद्रे आणि धार्मिक स्थळे एकाच ठिकाणी असणे, जे एलईटीच्या मागील कारवायांमध्ये दिसून आले होते. याशिवाय फक्त 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन एलईटी आणि एचएम कॅम्पमधील जवळीकता संभाव्य संयुक्त ऑपरेशनल प्लॅनिंग सूचित करते.

अर्थात गुप्तचर संस्था भारतीय मालमत्तेला किंवा नागरिकांना थेट धोका आहे याला दुजोरा देत असतील तर अशा दूरच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची आमच्यात क्षमता आहे असा दावा भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.

‘निवडक दहशतवादविरोधी’ राज्य धोरण

अधिकृतपणे या प्रदेशाला दहशतवादमुक्त बनवण्याच्या उद्देशाने केपीकेमधील पाकिस्तानच्या अलीकडील “दहशतवादविरोधी” मोहिमांनी राज्य समर्थित गटांना विस्तार करण्यास सक्षम केले आहे. जूनपासून पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमध्ये 40 हून अधिक नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे, तर स्थानिक सूत्रांचा दावा आहे की ही कारवाई प्रामुख्याने एलईटी आणि एचएमसारख्या भारत-केंद्रित संघटनांना नव्हे तर राज्यविरोधी दहशतवाद्यांना लक्ष्य करणारी होती.

भारत आणि पाश्चात्य विश्लेषकांनी दीर्घकाळ टीका केलेल्या या “चांगल्या दहशतवादी, वाईट दहशतवादी” सिद्धांताला ऑगस्ट 2025 मध्ये खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी प्रभावीपणे मान्यता दिली होती, ज्यांनी “राष्ट्रविरोधी” घटकांना संपवण्यासाठी राज्य शक्तीचा वापर करण्याचे समर्थन केले होते तर भारताला लक्ष्य करणाऱ्या गटांबाबत सोयीस्कररित्या मौन बाळगले होते.

शिवाय, दहशतवादाचा सामना करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय निधीसाठी सार्वजनिकरित्या विनंत्या केल्या जात असूनही, राज्य संरक्षणाखाली दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वपूर्ण संसाधने वापरली जात असल्याचे वृत्त आहे.

डिसेंबर 2025 पर्यंत मरकझ जिहाद-ए-अक्सा कॅम्प पूर्ण होत येईल, त्यावेळी भारताला आपली गुप्तचर आणि सुरक्षाविषयक स्थितीत पुन्हा सुधारणा कराव्या लागतील. पाकिस्तानच्या अमेरिकेशी असलेल्या संबंधांना लोकप्रियता मिळत असल्याने आणि लष्कर-ए-तोयबा भारताच्या तात्काळ आवाक्याबाहेर आपली पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याने, प्रादेशिक सुरक्षाविषयक गतिशीलता अधिक गुंतागुंतीच्या आणि अंधुक टप्प्यात प्रवेश करत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleमोदी, पुतिन यांच्याबाबतचा NATO प्रमुखांचा दावा चुकीचा; भारताची प्रतिक्रिया
Next articleभारत-कतार एफटीए चर्चेला प्रारंभ, ओमानसोबत व्यापार करार अंतिम टप्प्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here