AUKUS पाणबुडी कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलिया देणार आणखी काही अब्ज डॉलर्स

0
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या अधिकृत भेटीपूर्वी अमेरिकेच्या अणु पाणबुड्या शिपयार्डना पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा काही अब्ज डॉलर्सची देयके देईल अशी घोषणा मंगळवारी संरक्षण उद्योग मंत्री पॅट कॉनरॉय यांनी वॉशिंग्टनमध्ये केली.

ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या हस्तांतरित करण्याच्या AUKUS कराराचा पेंटागॉनकडून आढावा घेतला जात आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वास व्यक्त केला आहे की हा करार पुढे जाईल, ज्यामध्ये ब्रिटनचाही समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात, ऑस्ट्रेलियाने अमेरिकन पाणबुडी उत्पादन दर वाढवण्यासाठी 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे, नंतर कॅनबेराला तीन व्हर्जिनिया पाणबुड्या विकण्याची परवानगी दिली आहे, पहिल्या 2 अब्ज डॉलर्ससाठी 2025 पर्यंतची अंतिम मुदत आहे.

“आम्ही एक अब्ज डॉलर्स दिले आहेत. लवकरच आणखी काही अब्ज डॉलर्स देण्याची योजना आहे,” असे कॉनरॉय यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांना सांगितले. ट्रम्प प्रशासन आणि संरक्षण उद्योग अधिकाऱ्यांच्या ते भेटी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्बानीज – ट्रम्प भेट

अल्बानीज पुढील आठवड्यात अधिकृत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनला येणार असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची औपचारिक भेट होईल, ज्यामध्ये AUKUS संरक्षण भागीदारी हा चर्चेचा केंद्रबिंदू असेल अशी अपेक्षा आहे.

संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी मंगळवारी कॅनबेरा येथे पत्रकारांना सांगितले की ऑस्ट्रेलिया AUKUS च्या पेंटागॉन पुनरावलोकनात योगदान देत आहे आणि “हे कधी पूर्ण होईल याची त्यांना कल्पना आहे,” असे सांगताना त्यांनी नक्की वेळ मात्र सांगितली नाही.

ऑस्ट्रेलिया अमेरिकेसोबत संरक्षण सह-विकास आणि सह-उत्पादनाच्या मॉडेलकडे वळत आहे, ज्यामध्ये मार्गदर्शित शस्त्रांच्या निर्मितीचा समावेश आहे आणि अल्बानीज ट्रम्प यांना हे अधोरेखित करून सांगतील, असे कॉनरॉय म्हणाले.

नवीन कारखान्यातून दरवर्षी 4 हजारांपर्यंत लॉकहीड मार्टिन मार्गदर्शित क्षेपणास्त्रे तयार करण्याची अपेक्षा असताना ऑस्ट्रेलिया या वर्षाच्या अखेरीस उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात अमेरिकेच्या संरक्षण गरजा पूर्ण करणे समाविष्ट आहे, असे त्यांनी स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाला दिलेल्या टेलिव्हिजन मुलाखतीत सांगितले.

अमेरिका आणि लॉकहीड मार्टिनसोबत ऑस्ट्रेलिया “एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त” अंतरावर मारा करणारे लांब पल्ल्याचे प्रिसिजन स्ट्राइक क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

“हे आम्ही सह-डिझाइन, सह-विकास, सह-उत्पादन, सह-नियंत्रण मॉडेलकडे वळत आहोत जिथे आम्ही अमेरिकेसोबत भागीदारीत काम करत असून दोन्ही देशांचा औद्योगिक पाया अधिक खोलवर वाढवत असल्याचे हे एक उदाहरण आहे,” असे त्यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसंयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलात योगदान देणाऱ्या, राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला प्रारंभ
Next articleUN Peacekeeping at a Crossroads: Troop Contributing Nations Call for Reform Amid Funding Cuts and Complex Threats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here