भारत–मंगोलिया संरक्षण, सुरक्षा संबंध आणि महत्त्वाचे खनिज सहकार्य वाढवणार

0
भारत–मंगोलिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मंगोलियाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना यांच्याशी व्यापक चर्चा केली.

भारत–मंगोलिया आपल्या धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे आणि द्विपक्षीय संबंधांची 70 वर्षे साजरी करत असताना, आमची ही भेट अधिक विशेष आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी, मंगोलियाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना यांचे स्वागत केले.

राष्ट्राध्यक्ष उखना यांनी भेटीदरम्यान, आंतरराष्ट्रीय सौर भागीदारीतील आपल्या देशाच्या प्रवेशावर स्वाक्षरी केली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्यासाठी भारताच्या मोहिमेला पाठिंबा दर्शविला. दोन्ही नेत्यांनी, यावेळी एक टपाल तिकिट जारी केले तसेच संरक्षण, विकास, व्यापार, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, संस्कृतीक आणि आध्यात्मिक संबंधांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली.

‘दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध, Nomadic Elephant आणि Khan Quest यासारख्या संयुक्त सरावांमुळे अधिक मजबूत होण्यास मदत झाली आहे,’ असे वरिष्ठ राजदूत पी. ​​कुमारन यांनी चर्चेनंतरच्या ब्रीफिंगमध्ये सांगितले. “मंगोलिया या संबंधांना महत्त्व देतो आणि प्रशिक्षण तसेच क्षमता-निर्मिती कार्यक्रमांचा विस्तार करण्यास स्वारस्य दाखवतो,” असे ते म्हणाले.

संयुक्त संरक्षण प्रशिक्षण सुरू ठेवणे, एकमेकांना संरक्षण उपकरणे पुरवणे आणि सायबर सुरक्षेत सहकार्य वाढवणे, याबाबतीतील आपला पाठिंबा भारताने पुन्हा व्यक्त केला.

“आम्ही मंगोलियन सशस्त्र दलांसाठी भारताच्या मदतीने स्थापन करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे,” असेही कुमारन यांनी स्पष्ट केले.

भारत आपल्या दूतावासात उलानबातर येथे स्थायी संरक्षण व्यवहार सल्लागार नियुक्त करत आहे, ज्यामुळे मंगोलियाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीची पूर्तता होणार आहे.

ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज पदार्थ

मंगोलियामध्ये, भारताच्या सर्वात मोठ्या क्रेडिट लाईनद्वारे वित्तपुरवठा केलेल्या 1.7 अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण कारखान्याचे बांधकाम अजूनही सुरू आहे, जो द्विपक्षीय संबंधांतील एक प्रमुख प्रकल्प मानला जातो.

राष्ट्रपती उखना यांनी या प्रकल्पाला, “मंगोलियाच्या ऊर्जा स्वातंत्र्यासाठीचा धोरणात्मक टप्पा” असे म्हणत, भारतीय कंपन्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि मंगोलिया आता तेल आणि गॅस अन्वेषणासह शुद्धीकरण क्षेत्रातही संयुक्त सहकार्याचा शोध घेत आहेत.

कुमारन यांनी सांगितले की, “मंगोलिया अन्वेषण आणि संभाव्यता अभ्यासात सहकार्य करण्यास उत्सुक आहे. त्यांनी भारताला त्यांच्या प्रदेशात तेल अन्वेषणात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण दिले आहे.”

दुर्मिळ खनिजांविषयी बोलताना ते म्हणाले की, “मंगोलियाजवळ कोकिंग कोळसा, तांबे, सोने आणि युरेनियम यांसारखे महत्त्वाचे खनिजसाठे आहेत. आम्ही पुरवठा आणि लॉजिस्टिक्ससाठी विविध पर्यायांचा, विशेषतः रशियाच्या माध्यमातून ट्रान्स-सायबेरियन रेल्वे मार्गाचा शोध घेत आहोत, जेणेकरून पुरवठा साखळ्यांमध्ये वैविध्यता येऊ शकेल.”

मंगोलियाचे भौगोलिक स्थान आणि त्यांची खनिज संपदा, भारताच्या संसाधन सुरक्षेसाठी धोरणात्मक संधी प्रदान करते, विशेषतः जेव्हा दोन्ही राष्ट्र टिकाऊ पुरवठा साखळ्या प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा

राष्ट्रपती उखना यांनी, नवीन वाहतूक आणि लॉजिस्टिक्स मार्गांची गरज यावेळी अधोरेखित केली आणि दोन देशांमधील थेट उड्डाणांच्या योजनांवरही प्रकाश टाकला.

कुमारन यांनी ब्रिफिंग दरम्यान सांगितले की, “एक मंगोलियन हवाई वाहक या वर्षाअखेरीपर्यंत नवी दिल्ली आणि अमृतसरसाठी चार्टर उड्डाणे सुरू करण्याची तयारी करत आहे.”

“दोन्ही देश या मार्गांच्या आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यमापन करत आहेत आणि मंगोलियन नागरिकांना विनामूल्य ई-व्हिसा उपलब्ध करुन देण्याच्या अलीकडील व्हिसा सुलभता उपायांमुळेस, प्रवास आणि परस्पर नागरी संबंध सुधारतील अशी असल्याचेही,” ते म्हणाले.

कृषी आणि दुग्ध व्यवसाय

चर्चेदरम्यान, मोदी यांनी मंगोलियाच्या ग्रामीण विकासाला भारत देत असलेल्या पाठिंब्याची जबाबदारी अधोरेखित केली.

“मंगोलियाच्या विकासाचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन, आम्ही आधुनिक शेती तंत्रज्ञान, डिजिटल कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार आहोत,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

कुमारन यांनी स्पष्ट केले की, “मंगोलिया, त्याच्या विस्तृत गवताळ प्रदेशांमुळे आणि विरळ लोकसंख्येमुळे, मोठ्या प्रमाणावर शेती आणि दुग्ध व्यवसाय विकसित करण्याचा विचार करत आहे. भारत त्यांना प्रिसिजन फार्मिंग, लोकर निर्मिती आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांच्या वाढीमध्ये मदत करू शकतो.”

मंगोलियाने सोने आणि लोकर उद्योगांसाठीही भारताने सहाय्य करावे अशी विनंती केली आहे, जेणेकरून या क्षेत्रांनाही तिसऱ्या बाजारपेठेतील मूल्यवर्धित निर्यात क्षेत्रांमध्ये विकसित करता येईल.

सांस्कृतिक देवाणघेवाण

भारत पुढीलवर्षी, मंगोलियाला भगवान बुद्धांच्या शिष्यांच्या पवित्र अवशेषांची भेट देणार आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींना दिलेले आश्वासन अधिक महत्त्वाचे आहे.

“गंडन मठात बौद्ध ग्रंथांच्या सखोल अभ्यासासाठी आम्ही संस्कृत शिक्षक पाठवणार आहोत. नालंदा विद्यापीठाने मंगोलियातील बौद्ध धर्माच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आज आपण नालंदा आणि गंडन मठ यांना जोडून, हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक बळकट करण्यावर सहमती दर्शवली आहे,” असे मोदी यांनी स्पष्ट केले

ICCR (Indian Council for Cultural Relations) च्या ओरिएंटेशन कार्यक्रमांतर्गत, आठ मंगोलियन विद्यार्थी आणि शिक्षक भारतात येणार आहेत.

स्थलांतर, भूगर्भशास्त्र, योग आणि इतर क्षेत्रांशी संबंधीत एकूण 10 करारांवर (MoUs), दोन्ही देशांनी स्वाक्षरी केल्या आहेत. भारताकडून राबवण्यात येणाऱ्या जलद परिणामकारक प्रकल्पांचा हेतू, लहान समुदायांना एकत्र करुन, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि मंगोलियाच्या दुर्गम भागातील सामाजिक पायाभूत सुविधा सुधारणे हा आहे.

मंगोलियान नेत्यांच्या भेटीतील एक ठळक क्षण होता, जेव्हा “एक पेड़ माँ के नाम” मोहिमेअंतर्गत एका वृक्षाचे रोपण करणे, या मोहिमेचा उल्लेख करण्यात आला. हा उपक्रम राष्ट्रपती उखना यांच्या “वन बिलियन ट्रीज” या उपक्रमाशी सुसंगत आहे.

“ही भेट म्हणजे, दोन्ही देशातील प्रतीकात्मक आणि व्यावहारिक अशा दोन्ही प्रकारच्या महत्त्वपूर्ण परिणामांची सुरुवात आहे. आगामी काळात अधिक सखोल सहकार्याचा पाया मजबूत रचला जाईल,” असे कुमारन यावेळी म्हणाले.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleASCEND 2025: Southern Command’s Push for India’s Narrative Power
Next articleमेक्सिकोमध्ये पावसाचे थैमान; 64 जणांचा मृत्यू, 65 लोक अजूनही बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here