मेक्सिकोमध्ये पावसाचे थैमान; 64 जणांचा मृत्यू, 65 लोक अजूनही बेपत्ता

0

गेल्या आठवड्यात, मेक्सिकोमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे किमान 64 जणांचा मृत्यू झाला असून, 65 लोक अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती मेक्सिकन सरकारने सोमवारी दिली. उष्णकटिबंधीय दबाव क्षेत्र (tropical depression) हे या मुसळधार पावसामागील एक प्रमुख कारण असून, त्यामुळे गल्फ कोस्ट आणि मध्य मेक्सिकोच्या काही भागात भूस्खलन आणि भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली.

पावसाळी हंगामाच्या अखेरीस निर्माण झालेले, हे निनावी कमी दाबाचे क्षेत्र (Depression) होते. अनेक महिने पडलेल्या पावसामुळे आधीच भिजलेल्या जमिनीवर आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमध्ये यामुळे भर पडली आहे. यावेळी हवामान तज्ञांचे लक्ष पॅसिफिक किनाऱ्यावरील वादळे आणि दोन चक्रीवादळांवर केंद्रित होते.

अनपेक्षित जीवघेणा पाऊस

“या पावसाची तीव्रता एवढी जास्त असेल असे कुणालाच वाटले नव्हते,” अशी प्रतिक्रीया राष्ट्रपती क्लॉडिया शेनबाम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मेक्सिको नौदलाचे सचिव अ‍ॅडमिरल रायमुंडो मोरालेस यांनी सांगितले की, “अनेक महिन्यांच्या पावसामुळे आधीच भुसभुशीत झालेल्या डोंगराळ प्रदेशांमध्ये आणि काठोकाठ भरलेल्या नद्यांमध्ये उष्ण आणि थंड हवेचा एकत्रिक दबाव वाढल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली.”

‘या आपत्तीमुळे सुमारे 1 लाख घरे बाधित झाली आहेत,’ असे राष्ट्रपती शेनबाम यांनी सांगितले. नुकसानग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी त्या आज वित्त मंत्रालयासोबक बैठक घेणार आहेत आणि सर्वाधिक बाधित राज्यांना भेट देणार आहेत.

राष्ट्रीय नागरी संरक्षण समन्वयक लॉरा वेलाझकेझ यांनी सांगितले की, “व्हेराक्रूझमध्ये 29 लोक मरण पावले आणि 18 जण बेपत्ता आहेत, तर हिदाल्गोमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आणि 43 जण बेपत्ता आहेत. ही दोन राज्ये पूरामुळे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.”

पायाभूत सुविधा उद्ध्वस्त

अतिवृष्टीमुळे अनेक पूल आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, तर अनेक रस्त्यांवर चिखल साचला आहे. गेल्या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे की, अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी, बचाव पथकांना खोल पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे.

सरकारने, बचाव कार्यासाठी हजारो कर्मचारी तैनात केले असून ते लोकांचे स्थलांतर, आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत.

पावसाने प्रभावित नागरिकांना मदत करताना आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही,” असे ट्विट करत राष्ट्रपती शेनबाम यांनी स्वयंसेवकांचे आभार मानले.

पावसामुळे पाच राज्यांमध्ये खंडित झालेला वीज पुरवठा, आता मोठ्या प्रमाणावर पुन्हा सुरू झाला आहे. तसेच डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार रोखण्यावरही प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत–मंगोलिया संरक्षण, सुरक्षा संबंध आणि महत्त्वाचे खनिज सहकार्य वाढवणार
Next articleप्रतिबंध, मुत्सद्देगिरी आणि देवबंद: बदलत्या प्रदेशात भारताची अफगाण रणनीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here