नौदलाने पाकिस्तानला त्याच्या किनाऱ्याजवळच रोखले – राजनाथ सिंह

0
“ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्तीचे आणि क्षमतेचे प्रतीक होते आणि जगाला दिलेला संदेश होता की आम्ही प्रत्येक आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी नेहमीच तयार आहोत,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीत नौदल कमांडर परिषदेला संबोधित करताना म्हणाले. भारतीय नौदलाने घेतलेल्या प्रतिबंधात्मक पवित्र्यामुळे पाकिस्तानला बंदरात किंवा आपल्या किनाऱ्याजवळ राहणे भाग पडले, असे म्हणत संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले.

ते म्हणाले की, या मोहिमेदरम्यान जगाने नौदलाची परिचालन सज्जता, व्यावसायिक क्षमता आणि सामर्थ्य पाहिले. त्यांनी हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) भारतीय नौदलाच्या उपस्थितीला “मित्र राष्ट्रांसाठी दिलासादायक” आणि “प्रदेशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी अस्वस्थता” निर्माण करणारी बाब म्हटले.

“हिंद महासागर क्षेत्र हे समकालीन भू-राजकारणाचे केंद्र बनले आहे. ते आता निष्क्रिय राहिलेले नाही; ते स्पर्धा आणि सहकार्याचे क्षेत्र बनले आहे. भारतीय नौदलाने आपल्या बहु-आयामी क्षमतांद्वारे या प्रदेशात नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या सहा महिन्यांत, आपली जहाजे, पाणबुड्या आणि नौदल विमाने अभूतपूर्व प्रमाणात तैनात करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, आपल्या नौदलाने अंदाजे 335 व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग प्रदान केला आहे, ज्यामुळे 5.6 अब्ज डॉलर्सचा अंदाजे 1.2 दशलक्ष मेट्रिक टन मालाची सुरक्षित वाहतूक झाली.

संरक्षणमंत्र्यांनी आत्मनिर्भर नौदलाला आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि सामर्थ्यवान राष्ट्राचे अधिष्ठान संबोधत ते म्हणाले की, “गेल्या 10 वर्षांमध्ये नौदलाच्या भांडवली खरेदी करारांपैकी सुमारे 67 टक्के करार भारतीय उद्योगांसोबत झाले आहेत. ज्यामुळे हेच सिद्ध होते की आपण आता आयातीवर पूर्णपणे अवलंबून नाही. सध्या भारतीय नौदल 194 नवकल्पना आणि स्वदेशीकरण प्रकल्पांवर काम करत आहे, जे आयडीईएक्स, टीडीएफ, स्प्रिंट आणि मेक-इन-इंडिया यांसारख्या उपक्रमांतर्गत  समाविष्ट आहेत.

नौदल कमांडर परिषद 2025 ही दुसरी आवृत्ती 22 ऑक्टोबर रोजी सुरू झाली, ज्यामध्ये नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान दलाच्या ऑपरेशनल उत्कृष्टतेची आणि लढाऊ तयारीची प्रशंसा केली.

अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी नौदलासाठी सात प्राधान्य क्षेत्रे कोणती याचा आढावा घेतला. त्यानुसार – लढाऊ तयारी, क्षमता बांधणी, देखभाल आणि रसद, तंत्रज्ञानाचा वापर, मानव संसाधन विकास, संघटनात्मक प्रतिसाद आणि आंतर-एजन्सी समन्वय यांचा समावेश आहे. भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी सैन्याने “भविष्यात सज्ज” राहावे यासाठी सातत्याने गतीशीलता वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दलांसोबत लढाऊ क्षमता, आंतरकार्यक्षमता आणि संयुक्त ऑपरेशन्स वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, तसेच इंडो-पॅसिफिक आणि आयओआरमध्ये सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ऑपरेशनल पॅराडाइम्स, प्रशिक्षण आणि एआय, बिग डेटा आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब यांचा आढावा घेतला जाईल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleसंरक्षण संपादन परिषदेची (DAC) 79 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी
Next articleसंरक्षणमंत्र्यांच्या हस्ते संरक्षण खरेदी नियमावली 2025 चे प्रकाशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here