मंगळवारपासून Amazon कंपनीत 30,000 कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये कपात

0

मंगळवारपासून, Amazon कंपनीने सुमारे 30,000 कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करण्याची तयारी सुरू केली आहे. महामारीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे झालेली अतिरिक्त भरती कमी करण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनी हा कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित तीन व्यक्तींनी दिली आहे. 

हा आकडा, Amazon च्या एकूण 1.55 दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत, एक लहान टक्केवारी आहे, परंतु त्यांच्या अंदाजानुसार 3,50,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 10% इतकी आहे. 2022 च्या अखेरीस, Amazon ने अंदाजे 27,000 पदे कमी करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतरची Amazon ची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल.

Amazon च्या प्रवक्त्याने याविषयी कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

कपातीची प्रक्रिया सुरू

Amazon ने गेल्या दोन वर्षांपासून- उत्पादन, कम्युनिकेशन आणि पॉडकास्टिंग अशा विविध विभागांमध्ये लहान स्तरावर नोकऱ्या कमी करण्यास सुरूवात केली आहे आहे. या आठवड्यात सुरू होणारी कपात विविध विभागांना प्रभावित करू शकते, ज्यात मानवी संसाधन (human resources), ज्याला People Experience and Technology किंवा PXT म्हणून ओळखले जाते; ऑपरेशन्स (operations), उपकरणे आणि सेवा (devices and services); आणि Amazon Web Services या सर्व विभागांचा समावेश आहे, असे संबंधित व्यक्तींनी सांगितले.

मंगळवारी सकाळी, ईमेलद्वारे याविषयीच्या सूचना पाठवल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद कसा साधायचा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टीम्सच्या व्यवस्थापकांना, सोमवारी याबाबत प्रशिक्षण घेण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जस्सी यांनी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त भार कमी करण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये व्यवस्थापकांची संख्या कमी करणे याचाही समावेश आहे. त्यांनी अकार्यक्षमता ओळखण्यासाठी एक निनावी तक्रार लाईन सुरू केली आहे, ज्याद्वारे सुमारे 1,500 प्रतिसाद मिळाले आहेत आणि 450 हून अधिक प्रक्रिया बदल झाले आहेत, असे त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते.

जस्सी यांनी जूनमध्ये जाहीर केले होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या वाढत्या वापरामुळे, नोकऱ्यांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे, विशेषत: पुनरावृत्तीची (Repetitive) आणि नियमित (Routine) कामे स्वयंचलित झाल्यामुळे मानवी कपात होऊ शकते.

दबावाखाली घेतलेला निर्णय

“या निर्णयावरून असे सूचित होते की, Amazon कॉर्पोरेट टीम्समध्ये पुरेशा प्रमाणात AI-प्रेरित उत्पादकतेचा लाभ घेत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे,” असे ई-मार्केटर विश्लेषक स्काय कॅनेव्हस म्हणाले. “Amazon अल्पावधीत तिच्या AI पायाभूत सुविधांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीची भरपाई करण्यासाठी दबावाखाली आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कर्मचारी कपातीच्या या फेरीची संपूर्ण व्याप्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की, Amazon च्या आर्थिक प्राधान्यांमध्ये बदल झाल्यास ही संख्या कालांतराने बदलू शकते. फॉर्च्यूनने यापूर्वी असे वृत्त दिले होते की, ‘मानवी संसाधन विभागात अंदाजे 15% कपात केली जाऊ शकते.’

या वर्षाच्या सुरुवातीला, कर्मचाऱ्यांना पुन्हा आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात बोलवायला सुरूवात झाली होती, जो तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात कठोर नियमांमधील एक आहे, तो पुरेशी कर्मचारी कपात करण्यात अयशस्वी ठरला आहे, असे प्रकरणाशी संबंधित दोन जणांनी सांगितले, आणि हेच मोठ्या संख्येने पुन्हा रूजू करवलेले कर्मचारी, कपातीमागील आणखी एक कारण आहे. जे कर्मचारी कॉर्पोरेट कार्यालयांपासून दूर राहत आहेत, किंवा इतर कारणांमुळे दररोज कार्यालयात येऊ शकत नाहीयेत, त्यांना सांगितले जात आहे की, त्यांनी स्वेच्छेने Amazon सोडले आहे आणि त्यांना कोणत्याही ‘सेव्हरन्स’ (severance) म्हणजेच कोणत्याही भरपाई शिवाय काम सोडावे, ज्यामुळे कंपनीची बचत होईल.

Layoffs.fyi या तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी कपातीचा मागोवा घेणाऱ्या वेबसाईटच्या अंदाजानुसार, यावर्षी 216 कंपन्यांमधून, अंदाजे 98,000 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर, 2024 या संपूर्ण वर्षातील कपातीची संख्या 1,53,000 इतकी होती.

स्पर्धकांनी टाकले मागे

Amazon च्या सर्वात मोठ्या नफा केंद्रापैकी एक असलेल्या, क्लाउड कंप्युटिंग युनिट AWS ने दुसऱ्या तिमाहीत 30.9 अब्ज डॉलर्सची विक्री केली, जी 17.5% नी जास्त होती, परंतु मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft’s) Azure च्या 39% आणि अल्फाबेटच्या (Alphabet’s) Google Cloud च्या 32% वाढीपेक्षा खूपच कमी होती.

AWS ने तिसऱ्या तिमाहीतील विक्री सुमारे 18% ने वाढवून, 32 अब्ज डॉलर्स इतकी केली असावी, असा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या 19% वाढीपेक्षा थोडी कमी आहे. गेल्या आठवड्यात, सुमारे 15 तास झालेल्या इंटरनेट आउटेजमुळे AWS अजूनही सावरत आहे, ज्यामुळे स्नॅपचॅट आणि व्हेनमो सारख्या अनेक लोकप्रिय ऑनलाइन सेवा कोलमडल्या होत्या.

Amazon ला, आणखी एका ‘बिग हॉलिडे’ विक्री हंगामाची अपेक्षा असल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांप्रमाणेच, गोदामांमधील कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी 2,50,000 हंगामी नोकऱ्या देण्याची त्यांची योजना आहे.

रॉयटर्सने तपासलेल्या एका मेमोनुसार, Amazon ने शुक्रवारी, तिच्या PXT युनिटच्या विविधता उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका विभागाची पुनर्रचना देखील जाहीर केली. या बदलांमध्ये मुख्यतः लोकांना नवीन भूमिकांमध्ये पदोन्नती देणे समाविष्ट होते.

सोमवारी Amazon चे शेअर्स 1.2% वाढून 226.97 डॉलर्सवर पोहोचले. गुरुवारी, कंपनी तिच्या तिसऱ्या तिमाहीतील कमाईचा अहवाल देण्याची योजना आखत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजपानबरोबरच्या संरक्षण, व्यापार करारांवर ट्रम्प यांची स्वाक्षरी
Next articleDefending the Future: How Network Security is Shaping Tomorrow’s Warfare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here