HAL करणार रशियाच्या SJ-100 प्रवासी विमानाची भारतात निर्मिती

0
भारताच्या नागरी विमान वाहतूक उत्पादन महत्त्वाकांक्षेला मोठी चालना देण्यासाठी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL)  रशियाच्या पब्लिक जॉइंट स्टॉक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (PJSC-UAC) सोबत भारतात SJ-100 नागरी प्रवासी विमानांचे उत्पादन करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. सोमवारी मॉस्कोमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

SJ-100 हे एक ट्विन-इंजिन, नॅरो-बॉडी जेट आहे जे कमी अंतराच्या मार्गांसाठी डिझाइन करण्यात आले आहे, जगभरातील 16 व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये 200 हून अधिक विमाने आधीच कार्यरत आहे. या सहकार्य करारांतर्गत, HAL ला भारतीय ग्राहकांसाठी विमान निर्मितीचे अधिकार मिळणार असून देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात स्वावलंबनाच्या प्रयत्नातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

HAL च्या मते, या उपक्रमामुळे SJ-100 हे सरकारच्या UDAN योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीचे प्रमुख सक्षमीकरण करेल, ज्याचा उद्देश लहान शहरांदरम्यान केला जाणारा हवाई प्रवास परवडणारा आणि सुलभ करणे आहे.

“भारतात पहिल्यांदाच प्रवासी विमान‌ पूर्णपणे तयार केले जाईल,” असे HAL ने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. या आधी असाच प्रयत्न 1961 ते 1988 दरम्यान AVRO HS-748 ची निर्मिती करून HAL ने केला होता.

या भागीदारीचे वर्णन करताना, HAL ने म्हटले आहे की, हा सामंजस्य करार म्हणजे सरकारच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनातून उचलण्यात आलेले एक मोठे पाऊल आहे. कंपनीचा अंदाज आहे की पुढील दशकात भारताला देशांतर्गत उड्डाणांसाठी 200 हून अधिक प्रादेशिक जेट्सची आवश्यकता असेल, तसेच हिंद महासागर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा देण्यासाठी 350 विमानांची आवश्यकता असेल.

“SJ-100 विमानांचे उत्पादन हे भारताच्या विमान वाहतूक उद्योगाच्या इतिहासातील एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या घडामोडीचे कौतुक केले.

“उडान योजनेअंतर्गत SJ-100 हे कमी अंतराच्या कनेक्टिव्हिटीसाठी गेम चेंजर ठरेल आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल,” असे ते म्हणाले. “AVRO युगानंतर देशात बनवले जाणारे हे पहिलेच पूर्ण प्रवासी विमान असेल. हा प्रकल्प खाजगी क्षेत्राला देखील बळकटी देईल आणि विमान वाहतूक उद्योगात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल. HAL आणि सर्व भागधारकांचे अभिनंद,” असेही ते पुढे म्हणाले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleयूएईच्या भूदल प्रमुखांचा भारत दौरा पूर्ण, संरक्षण संबंधांमध्ये वाढ
Next articlePresident Droupadi Murmu Becomes First Indian President to Fly in Rafale Jet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here