पाकिस्तान आण्विक चाचणी घेत असल्याचा ट्रम्प यांचा दावा, भारत सतर्क

0

आपल्या धाडसी आणि धक्कादायक विधानाद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान सक्रियपणे भूमिगत अणुचाचण्या करत असल्याचा आरोप केला आहे. वाढत्या जागतिक लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याच्या आपल्या आग्रहाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत असताना हे विधान केले गेले आहे.

 

 

सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे सर्व देश चाचण्या करत असल्याचे प्रतिपादन केले आणि आता अमेरिका अणुचाचण्यांपासून दूर राहणारी एकमेव मोठी शक्ती राहू शकत नाही असा दावाही केला.

तीस वर्षांहून अधिक काळानंतर अमेरिकेने अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याबाबत ट्रम्प यांनी अलिकडेच धरलेल्या आग्रहावरून  जोरदार टीका केली जात आहे. मात्र अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना, ट्रम्प म्हणाले की रशियाने अलिकडेच प्रगत अणुप्रणालींच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन शस्त्रांची विश्वासार्हता पडताळून पाहण्यासाठी आम्ही असे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अर्थात अलिकडच्या काळात पाकिस्तानने अणुस्फोट चाचण्या केल्याच्या वृत्ताची पडताळणी झालेली आलेली नाही. याशिवाय पाकिस्ताननेही अशा हालचाली झाल्याचे जाहीरपणे मान्य केलेले नाही.

ट्रम्प यांचा दावा आहे की अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. “150 वेळा संपूर्ण जगाला उडवून लावता येईल इतकी अण्वस्त्रे आहेत”, असे ते म्हणाले.

अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांनी या चाचणीला ‘नॉन-क्रिटिकल टेस्टिंग’ असे संबोधत ही  ‘पूर्ण अण्वस्त्रांचा स्फोट’ घडवून आणणारी चाचणी नाही असे स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले की त्यांनी युद्ध विभागाला “समानतेच्या आधारावर” अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून याबाबतचे हे पहिले स्पष्टीकरण आले.

चीनवर भाष्य करताना ते म्हणाले: “ते (अण्वस्त्रे) वेगाने तयार करत आहेत आणि मला वाटते की आपण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबद्दल काहीतरी केले पाहिजे.” दुर्मिळ खनिजांवरील चीनचे वर्चस्व मान्य करताना ट्रम्प म्हणाले: “आपल्याला परत लढावे लागेल.” त्यांनी चीन आणि रशिया दोघांसोबत अण्वस्त्र निःशस्त्रीकरणावर चर्चा केल्याचे मान्य केले.

डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या 32 व्या APEC परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. गेल्या सहा वर्षांहून अधिक काळातील या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान अनिश्चित धोरणात्मक स्थितीत आहे आणि इस्लामाबादच्या अघोषित अणु कारवायांबद्दल भारतात शंका निर्माण झाल्या आहेत.

अनुकृती

+ posts
Previous articleअफगाणिस्तानात पुन्हा तीव्र भूकंप , 20 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
Next articleA Decade of Credibility, Conviction And Commitment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here