INVAR क्षेपणास्त्रांसाठी MoD आणि BDL यांच्यात 2,095.70 कोटींचा करार

0

संरक्षण मंत्रालयाने (MoD) गुरुवारी, INVAR (इन्व्हार) अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी, भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) कंपनीसोबत 2,095.70 कोटी रुपयांचा करार केला. ही क्षेपणास्त्रे भारतीय लष्कराच्या T-90 या मेन बॅटल टँक्समध्ये (मुख्य युद्ध रणगाड्यांमध्ये) सामाविष्ट केली जातील. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ‘बाय इंडियन’ श्रेणीअंतर्गत, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत गुरुवारी हा करार अंतिम करण्यात आला.

संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, या खरेदीमुळे T-90 रणगाड्यांच्या ताफ्याची मारक क्षमता आणि दूरच्या लक्ष्यांवरील प्रभावी मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. हे क्षेपणास्त्र, रणगाड्यावरील सैनिकांना विस्तारित पल्ल्यावरील आधुनिक चिलखती लक्ष्यांना भेदण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी अचूक, तोफेतून डागता येणारी क्षेपणास्त्र क्षमता प्रदान करेल. ही खरेदी सरकारच्या ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नाचा भाग असून, आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSUs) आणि देशांतर्गत उद्योगांचा उपयोग करून केली जात आहे.

INVAR क्षेपणास्त्राचे युद्धभूमीतील महत्व

INVAR, हे BDL द्वारे रशियन तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी बनावटीचे- तोफेतून डागले जाणारे, लेझर बीम-रायडिंग प्रकारचे रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. टँडम हाय-एक्सप्लोसिव्ह अँटी-टँक वॉरहेड आहे, जे शत्रूचे एक्सप्लोझिव्हली फॉर्मड पेनिट्रेटर आवरण भेदण्यासाठी खास डिझाईन केलेले आहे. टँडम म्हणजे दुहेरी स्फोटक क्षमता, जी आधुनिक संरक्षणाला भेदते. याशिवाय यामध्ये सेमी-ऑटोमॅटिक लेझर बीम-रायडिंग मार्गदर्शन प्रणाली आहे, जी इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला प्रतिरोधक असते. या क्षेपणास्त्राची रेंज 5 किलोमीटर पर्यंत आहे. यामुळे रणगाड्यांना त्यांच्या पारंपरिक तोफेच्या रेंजपलीकडील धोक्यांवर हल्ला करणे शक्य होते. BDL च्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राचे दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत: 5,000 मीटर पर्यंतची मारक रेंज आणि सुमारे 70 किमी/ताशी वेगाने हलत्या टार्गेट्सना लक्ष्य करण्याची क्षमता.

क्षेपणास्त्रातील मुख्य तपशील:

  • गाईडन्स: सेमी-ऑटोमॅटिक लेझर बीम-रायडिंग (जॅमिंग-प्रतिरोधक)
  • वारहेड: टँडेम HEAT, ERA कवच पाडण्यासाठी
  • रेंज: 5 किलोमीटरपर्यंत
  • प्लॅटफॉर्म: 125 मिमी टँक तोफेच्या बॅरलमधून प्रक्षेपण (मुख्यत्वे T-90 टँक्समध्ये)

हा करार, सुमारे 500 INVAR क्षेपणास्त्रांसाठी सक्रियपणे विचाराधीन होता, जेणेकरून सशस्त्र तुकड्यांमध्ये त्याचे जलद वितरण करता येईल. संरक्षण मंत्रालय/BDL ने जारी केलेल्या निवेदनात, क्षेपणास्त्रांचे वितरण वेळापत्रक किंवा नेमका उत्पादन कालावधी नमूद केलेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही खरेदी यांत्रिकी ऑपरेशन्स बळकट करेल आणि संभाव्य शत्रूविरुद्ध कार्यात्मक लाभ प्रदान करेल, तसेच महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानांचे देशांतर्गत उत्पादन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अधोरेखित करेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleAmphibious Landing Operations Mark Grand Finale of Tri-Service Exercise Trishul
Next articleप्रभावी उभयचर लँडिंग ऑपरेशन्ससह, त्रि-सेवा सराव ‘त्रिशूल’ची भव्य सांगता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here