लष्कराकडून कामेंग हिमालयात 16,000 फूट उंचीवर, मोनो-रेल प्रणाली तैनात

0

देशातील सर्वात आव्हानात्मक लष्करी भागांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कामेंग हिमालयाच्या आव्हानात्मक प्रदेशात, भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक क्रांतिकारी लॉजिस्टिक (वस्तूंचा पुरवठा करणारी) प्रणाली तैनात केली आहे. जवळपास 16,000 फूट उंचीवरचील या प्रदेशात गंभीर हवामान, धोकादायक उतार आणि पुरवठा मार्गांमध्ये सातत्याने येणारे व्यत्यय यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अनेकदा येथील लष्करी तुकड्यांचा इतरांशी संपर्क पूर्णपणे तुटतो.

या दीर्घकालीन अडथळ्यांवर मात करण्यासाठी, गजराज कॉर्प्सने स्वदेशी बनावटीची आणि उंच प्रदेशासाठी उपयुक्त अशी मोनो-रेल प्रणाली विकसित करून ती कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली आता पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, या प्रदेशातील लॉजिस्टिकची रचना सुधारत आहे. संपूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली ही मोनो-रेल, एका फेरीमध्ये 300 किलोग्रॅमपेक्षा अधिक मालवाहतूक करू शकते. यामुळे, ज्या दुर्गम लष्करी चौक्यांमध्ये दळणवळण किंवा पुरवठ्याचे अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत, त्यांना एक विश्वसनीय जीवनरेखा मिळाली आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, ही मोनो-रेल प्रणाली दिवसा-रात्री, पहारा असो वा नसो, सतत कार्यरत राहू शकते आणि विशेष म्हणजे वादळ किंवा प्रचंड हिमवर्षावादरम्यानही ती कार्यान्वित राहते. दारुगोळा, राशन, इंधन, अभियांत्रिकी साहित्य आणि इतर जड आवश्यक वस्तू, उतारांनी भरलेल्या आणि अस्थिर भूभागातून वाहून नेण्याचे काम ती सक्षमपणे करते, ज्यामुळे अति-प्रतिकूल परिस्थितीत तैनात असलेल्या सैनिकांना आधार देण्याच्या दृष्टीने ही एक मोठी प्रगती मानली जात आहे.

केवळ लॉजिस्टिक क्षमतेपलीकडे, या नव्या प्रणालीच्या साहाय्याने जखमी सैनिकांच्या तातडीने स्थलांतरित केले जाऊ शकते. ज्या उंच सखल प्रदेशांत, प्रतिकूल हवामानामुळे बरेचदा पायदळाला तसेच हेलिकॉप्टर्सना मदत करण्यास अडथळे निर्माण होतात, तिथे ही मोनो-रेल प्रणाली जखमी जवानांचे स्थलांतर करण्यासाठी अधिक सुरक्षित आणि वेगवान पर्याय उपलब्ध करून देते.

हे यश, गजराज कॉर्प्सच्या कल्पकतेचे आणि अनुकूलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरते. तसेत, भारतीय लष्कराची त्यांच्या कठीण ऑपरेशनल आव्हानांसाठी व्यावहारिक आणि अभियान-केंद्रित उपाय विकसित करण्याबाबतची बांधिलकी दर्शवते. पुरवठा शृंखलेची लवचिकता अधिक मजबूत करून आणि आपत्कालीन प्रतिसाद कौशल्यांमध्ये सुधारणा करुन, या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे हिमालयातील एकाकी पडलेल्या तुकड्यांची सज्जता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDRDO Unveils New Man-Portable Autonomous Underwater Vehicles for Navy’s Mine Countermeasures
Next articleDRDO द्वारे नव्या मॅन-पोर्टेबल स्वयंचलित अंडरवॉटर वाहनांचे अनावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here