भारत–ब्राझीलच्या नौदल प्रमुखांद्वारे पाणबुडी समर्थन सामंजस्य करारावर स्वाक्षरी

0

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, यांच्या ब्राझील भेटीमुळे नवी दिल्ली आणि ब्राझीलिया सागरी सहकार्याला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. यानिमित्ताने दोन्ही देशांनी कार्यात्मक, औद्योगिक आणि धोरणात्मक सहकार्यात प्रगती साधली आहे. रिओ दि जनेरियो येथे झालेल्या उच्च-स्तरीय द्विपक्षीय चर्चांमध्ये, ॲडमिरल त्रिपाठी यांनी ब्राझीलियन नौदलाचे कमांडर ॲडमिरल मार्कोस सॅम्पायो ओल्सेन यांची भेट घेत, ऑपरेशन्स, प्रशिक्षण, जलसर्वेक्षण आणि सागरी क्षेत्र जागरूकता यांसारख्या क्षेत्रांमधील संयुक्त उपक्रमांचा विस्तार करण्याबाबत चर्चा केली.

भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, या भेटीमुळे दोन्ही देशांनी सागरी क्षेत्रात धोरणात्मक ऐक्य अधिक बळकट करण्याच्या आपल्या हेतूवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, जो ‘ग्लोबल साउथ’ आणि व्यापक सागरी क्षेत्रातील स्थिरतेसाठी अत्यावश्यक असल्याचे दोन्ही देश मानतात.

या भेटीचा एक महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे, बुधवारी भारतीय नौदल, ब्राझीलियन नौदल आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) झाला. हा करार स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या आणि इतर नौदल जहाजांच्या देखभालीसंदर्भात माहितीच्या देवाणघेवाणीशी संबंधित आहे, जो औद्योगिक आणि तांत्रिक सहकार्याच्या एका नवीन टप्प्याचे सूचक आहे.

हा सामंजस्य करार, पाणबुडी प्लॅटफॉर्मसाठी जीवनचक्र समर्थन वाढवेल, तसेच देखभाल, लॉजिस्टिक्स आणि प्रशिक्षणातील अनुभवांचे आदानप्रदान अधिक सखोल करेल आणि दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमधील तसेच सरकारी संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे. स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या आणि भविष्यातील नौदल प्लॅटफॉर्म टिकवून ठेवण्यासाठी, संयुक्त संशोधन आणि विकास तसेच तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची क्षमता या करारामध्ये आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

या करारावर ॲडमिरल त्रिपाठी, ॲडमिरल ओल्सेन आणि MDL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी अंतिम स्वाक्षरी केली.

ॲडमिरल त्रिपाठी यांच्या चार दिवसांच्या ब्राझील दौऱ्यादरम्यान, आग्नेय किनाऱ्यावरील नौदल तळ, ऑपरेशनल कमांड्स आणि प्रमुख जहाजबांधणी केंद्रांच्या भेटींचा यांचा समावेश आहे. या सर्व भेटींदरम्यान, भारतीय शिष्टमंडळाला ब्राझीलच्या पाणबुडी सेवा पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्याची आणि पृष्ठभागावरील जहाजांसाठी संयुक्त उत्पादन मार्गांच्या शक्यता तपासण्याची संधी मिळणार आहे.

जलसर्वेक्षण सेवा, सागरी क्षेत्र जागरूकतेसाठी माहितीची देवाणघेवाण, ऑपरेशनल प्रशिक्षण आणि हिंद महासागर क्षेत्र तसेच दक्षिण अटलांटिकमध्ये समन्वयित सहभाग वाढवण्यासाठी, सहकार्यांच्या नवीन मार्गांचा दोन्ही नौदले एकाच वेळी आढावा घेत आहेत.

भारत आणि ब्राझील यांच्यातील द्विपक्षीय लष्करी आदानप्रदान आणि IBSA चौकटीद्वारे (भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका) जरी, नियमितपणे संवाद साधला जात असला तरी, या भेटीला अतिरिक्त राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, हे 2026 च्या सुरुवातीला भारत दौरा करणार असल्याची अपेक्षा आहे, त्यामुळे मोदी आणि लुला यांच्या शिखर परिषदेपूर्वी अनेक संरक्षण करारांना मूर्त रूप दिले जाईल, अशी नवी दिल्लीला आशा आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ॲडमिरल त्रिपाठी यांच्या दौऱ्याचा उद्देश, शोधक संवादातून – प्रत्यक्ष कृतीयोग्य परिणामांकडे जाणे हा आहे. विशेषतः पाणबुडीची देखभाल आणि जहाजबांधणीच्या क्षेत्रात. दोन्ही देशांच्या तांत्रिक पथकांनी तयारीच्या अनेक फेऱ्या आयोजित केल्या आहेत आणि लुला यांच्या 2026 मधील भारत भेटीदरम्यान, औपचारिकपणे सादर करता येतील किंवा पुढे नेता येतील, अशा ठोस प्रकल्पांना अंतिम रूप देण्यास दोन्ही सरकार उत्सुक आहेत.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारत-मलेशिया संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला राजस्थानमध्ये सुरुवात
Next articleहायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ते MIRV तंत्रज्ञान: DRDO च्या यशस्वी टप्प्यांचा आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here