मॅकडोनाल्ड्सचे बर्गर ते डाएट कोक; ट्रम्प यांची ‘अनियंत्रित’ जीवनशैली चर्चेत

0
ट्रम्प जीवनशैली

वादग्रस्त विधाने आणि बेधडक निर्णय यामुळे नेहमीच चर्चेत असलेले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘जीवनशैली’ देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवासादरम्यान ट्रम्प मॅकडोनाल्ड्ससह फास्ट फूडला डोनाल्ड देत असलेले प्राधान्य, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, आरोग्य सचिव रॉबर्ट केनेडी ज्युनियर यांनी राष्ट्राध्यक्षांच्या खाण्याच्या सवयींचे वर्णन ‘अनियंत्रीत’ असे केले आहे. ‘ट्रम्प बऱ्याचदा अपायकारक अन्न खातात’ असे त्यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले.

“ट्रम्प दिवसभर स्वतःच्या शरीरात विष भरत असतात” असे सांगत, केनेडी यांनी मॅकडोनाल्ड्सचे बर्गर आणि फ्राईजपासून ते डाएट कोक आणि कँडीचे सेवन करण्याच्या त्यांच्या सवयींचा उल्लेख केला. मात्र, जेव्हा राष्ट्राध्यक्ष फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लागो या रिसॉर्टवर येतात, तेव्हा ते तिथे सकस आहार घेतात, असेही त्यांनी सांगितले.

प्रवासादरम्यान ट्रम्प यांच्या आजारी पडण्याच्या भीतीमुळे त्यांच्या जीवनशैलीचा विषय चर्चेत आला आहे. केनेडी यांनी सांगितले की, “जेव्हा ट्रम्प प्रवासात असतात, तेव्हा ते ज्या अन्नावर त्यांचा विश्वास आहे तेच अन्न खातात, ज्यात प्रामुख्याने मॅकडोनाल्ड्स हानिकारक तळलेले पदार्थ असतात, ज्याला ट्रम्प त्यालाच पसंती देतात.

ट्रम्प यांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होतो? या प्रश्नावर केनेडी म्हणाले की, “राष्ट्राध्यक्षांची प्रकृती ‘दैवी किंवा चमत्कारिक’ आहे, ज्याचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यांनी स्वतः एका अहवालात असा इशारा दिला आहे की, फास्ट फूड अमेरिकन मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवत आहे. हे संकट दशकांपासून चालत आलेल्या अशा धोरणांचा परिणाम आहे, ज्यांनी अन्न व्यवस्था कमकुवत केली असून, आमच्या मुलांपर्यंत अपायकारक अन्न पोहोचवणे सुरू ठेवले आहे.”

त्यांनी पुढे खुलासा केला की, ट्रम्प यांचे ‘सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सर्व्हिसेस’चे प्रशासक डॉ. मेहमेट ओझ यांनी, राष्ट्राध्यक्षांच्या वैद्यकीय नोंदी पाहिल्या आणि सांगितले की, ट्रम्प यांची टेस्टोस्टेरॉन पातळी “70 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीमध्ये त्यांनी पाहिलेली सर्वोच्च पातळी” आहे.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी ‘डेली बीस्ट’ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सचिव केनेडी यांचे म्हणणे बरोबर आहे; त्यांच्या गोल्फ चॅम्पियनशिप आणि निर्दोष शारीरिक अहवालांवरून दिसून येते की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची शरीरयष्टी आणि उर्जेची पातळी अशी आहे, ज्याचे बहुतांशी तरुण केवळ स्वप्न पाहू शकतात.”

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleCIJWS Vairengte Warriors Episode 2 Documentary: Reflex Firing to Slithering Operations
Next articleभारत-चीन संबंध: अविश्वासू प्रतिस्पर्ध्याशी कसे जुळवून घ्यावे, हा यक्ष प्रश्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here