चीन आणि कॅनडाचा सहकार्य वाढीवर भर, द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा

0
चीन

चीन कॅनडासोबतचे सहकार्य दृढ करण्यावर सध्या भर देत असून, त्यासोबतच परस्पर ‘हस्तक्षेप’ दूर करण्यासही तयार आहे, असे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत आपल्या कॅनडियन समकक्षांना सांगितले.

पंतप्रधान मार्क कार्नी, यांचे चार दिवसांच्या अधिकृत राजकीय दौऱ्यासाठी चीनच्या राजधानीत आगमन झाल्यानंतर, हे भाष्य केले गेले. जवळपास एका दशकानंतर कॅनेडियन सरकारप्रमुखांचा हा पहिलाच चीन दौरा आहे.

कार्नी गुरुवारी उशिरा प्रीमियर ली कियांग यांची, तर शुक्रवारी अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील.

“चीन कॅनडासोबतचा संवाद वाढवण्यास, विश्वास अधिक दृढ करण्यास, तसेच हस्तक्षेपाचा अडथळा दूर करण्यास आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्यास इच्छुक आहे,” असे चीनचे सर्वोच्च मुत्सद्दी वांग यांनी, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांना सांगितले, ज्या कार्नी यांच्या शिष्टमंडळाचा भाग होत्या.

यामुळे दोन्ही देशांमधील संबंध स्थिर, आशयपूर्ण आणि मजबूत राहतील, असे वांग यांनी आनंद यांना सांगितल्याचे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले.

“आम्ही हे सुनिश्चित करू की, दोन्ही देशांतील लोकांच्या फायद्यासाठी अल्प आणि दीर्घ कालावधीसाठी एकत्रित प्रगती साधली जात आहे” असे आनंद यांनी वांग यांना सांगितले.

संबंध पुनर्स्थापनेची समान इच्छा

ऑक्टोबरमध्ये, दक्षिण कोरियात कार्नी आणि जिनपिंग यांच्यातील सकारात्मक भेटीनंतर, 2017 पासून द्विपक्षीय संबंधांमध्ये असलेल्या तणावाच्या कालखंडानंतर दोन्ही देशांनी जुने मतभेद विसरून, संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची समान इच्छा दर्शविली आहे.

माजी पंतप्रधान जॅस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने, 2024 मध्ये अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर चिनी इलेक्ट्रिक वाहनांवर टॅरिफ लागू केले होते, ही दोन्ही संबंधांमधील तणावाची सर्वात अलीकडची घटना होती.

चीनने गेल्या मार्चमध्ये, कॅनडाच्या 2.6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या कृषी आणि अन्न उत्पादनांवर (जसे की कॅनोला तेल आणि पीठ) शुल्क लावून त्यांना प्रत्युत्तर दिले होते, ज्यामुळे 2025 मध्ये कॅनेडियन वस्तूंच्या चिनी आयातीत 10.4% घसरण झाली, असे बुधवारी सीमा शुल्क आकडेवारीवरून समोर आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कॅनडावर शुल्क लादले आणि दीर्घकाळापासून अमेरिकेचा मित्रदेश असलेला कॅनडा अमेरिकेचे 51वे राज्य होऊ शकते असा उल्लेख केला, ज्यानंतर बाजारपेठांचे विविधीकरण करण्याच्या प्रयत्नांमुळे चीनसोबतचा संवाद नव्याने वाढवण्यास चालना मिळाली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleइराणमध्ये संकटाचे वाढते सावट; स्थानिक भारतीय मायदेशी परतण्याच्या तयारीत
Next articleOperation Sindoor Razed Pakistan-Based LeT HQ, Admits Top Commander

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here