केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेतलेल्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात पुण्याच्या रोहन पेठेने अखिल भारतीय स्तरावर ५ वा क्रमांक मिळवला असून त्याची भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेसाठी निवड झाली आहे. पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला असलेल्या या विद्यार्थ्याने तमाम पुणेकरांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. भारतीय हवाई दल अकादमीमध्ये जुलै 2022च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमास, अनुक्रमांक 212 F(P), रोहन प्रवेश घेणार आहे. हा सन्मान मिळवून रोहनने आपल्या शहराची आणि राज्याची मान उंचावली आहे. रोहन सशस्त्र दलात सहभागी होणारा त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील अधिकारी असेल. भारतशक्ती मराठीतर्फे रोहनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.