निकी हॅले यांना अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत आपण उपराष्ट्रपती म्हणून मानतच नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर करताना एक्सियोस या संकेतस्थळाचे वृत्त फेटाळून लावले.
“निकी हॅले यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी विचाराधीन नाही, पण मी तिला शुभेच्छा देतो!” असे ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले.
सद्य परिस्थितीचा अंदाज असलेल्या लोकांचा हवाला देत, एक्सियोसने बातमी दिली होती की ट्रम्प हॅली यांची निवड करू शकतात. त्यांना अशी खात्री आहे की ती त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यास मदत करू शकते, संभाव्य तुरुंगवास टाळू शकते आणि जरी ते हरले तर कोट्यवधीची कायदेशीर बिले भरू शकते, अशी बातमी एक्सियोसने दिली होती.
दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत असलेल्या निकी हॅली यांनी मार्चमध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदासाठी असणारे उमेदवार ट्रम्प यांना दिलेले आव्हान संपले असल्याचे मान्य केले होते.
यावरील प्रतिक्रियेसाठी हॅली यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वारंवार आपली उमेदवारी कमी लेखणारे ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील हे मान्य केले असले तरी हॅली यांनी ट्रम्प यांचे समर्थन केलेले नाही.
उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवारांची एक मोठी यादी तयार करण्यात आली असून त्यात नॉर्थ डकोटाचे गव्हर्नर डग बर्गम, साउथ डकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम, अमेरिकन सिनेटर्स मार्को रुबिओ, टिम स्कॉट आणि जे. डी. व्हान्स आणि अमेरिकन प्रतिनिधी एलिस स्टेफानिक यांचा समावेश आहे.
2024च्या रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर होण्याआधी बर्गम आणि स्कॉट यांच्या नावांची ट्रम्प यांच्याविरुद्ध चर्चा होती. नंतर मात्र त्यांनी यातून माघार घेतली. आपले न ऐकल्याबद्दल 14 महिन्यांच्या एका कुत्र्याला गोळ्या घातल्याचे नोएम यांनी आत्मचरित्रात उघड केल्यानंतर त्या वादात अडकल्या आहे.
अभ्यासकांच्या मते, ट्रम्प यांना उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार निवडण्याची कोणतीही घाई नाही. जुलैमध्ये मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनापर्यंत ट्रम्प यांना औपचारिकपणे नामांकित केले जाणार नाही. 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ट्रम्प यांचा सामना डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी होणार आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्स)