भारतशक्ती: विश्वासार्हता, दृढनिश्चय आणि वचनबद्धतेचे दशक

0
भारतशक्ती
भारताच्या संरक्षण चर्चासत्राला आकार देणारी दहा वर्षे साजरी करताना 
25 नोव्हेंबर 2015  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, BharatShakti.in ची सुरूवात झाली. संरक्षण आणि धोरणात्मक बाबींवरील भारतातील सर्वात विश्वासार्ह आवाजांपैकी एक बनण्याची ती एक शांत पण दृढनिश्चयी सुरुवात होती.

ज्येष्ठ पत्रकार नितीन ए. गोखले यांच्या कल्पनेतून साकार झालेली आणि ब्रिगेडियर एस.के. चॅटर्जी (निवृत्त) आणि नीलांजना बॅनर्जी यांच्यासह प्रत्यक्षात उतरलेली भारतशक्तीची स्थापना एका साध्या पण शक्तिशाली कल्पनेवर झाली ती म्हणजे भारतीय संरक्षण उद्योगाला स्वत: बोलण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

“जेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा उद्योग क्षेत्राला सहभागी होण्यासाठी, त्यांचे मुद्दे शेअर करण्यासाठी किंवा विश्वसनीय माहिती शोधण्यासाठी कोणतेही एक व्यासपीठ नव्हते,” अशी आठवण गोखले सांगतात. “आम्हाला भारतशक्तीच्या माध्यमातून तो आवाज बनायचा होता ज्यात विश्लेषण, धोरण आणि उद्योग सहभागासाठी एक जागा असेल.”

मोजून तीनजणांच्या समावेशातून आणि संरक्षण क्षेत्रातील भारताच्या स्वावलंबन क्षमतेवर असलेल्या विश्वासातून निर्माण झालेली ही संस्था लवकरच एक पूर्ण माध्यम आणि विश्लेषण समूह बनली. गेल्या काही वर्षांत, BharatShakti.in म्हणजे विश्वासार्ह पत्रकारिता, क्षेत्रीय अंतर्दृष्टी आणि भारताच्या संरक्षण परिसंस्थेवरील माहितीपूर्ण भाष्य यांचे समानार्थी शब्द बनले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाचकांमध्ये धोरणकर्ते, सेवेत असलेले आणि निवृत्त लष्करी अधिकारी, उद्योग नेते आणि खरेदी तसेच धोरणनिर्मितीमध्ये गुंतलेले व्यावसायिक यांचा समावेश आहे.

त्याच्या प्रगतीचा विचार करताना, गोखले म्हणतात: “आमचे सर्वात मोठे यश म्हणजे आम्ही विश्वासार्हता राखली आहे – आम्ही कधीही तथ्ये किंवा अखंडतेशी तडजोड केली नाही.”

या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढीत भारताच्या स्वदेशीकरणाच्या मार्गाचे प्रतिबिंब पडले आहे, जे 2015 मध्ये सुरू झालेल्या सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाशी नैसर्गिकरित्या जुळते. 2016 मध्ये झालेल्या पहिल्या conclave पासून – ज्याचे उद्घाटन तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले होते – सशस्त्र सेना, उद्योग आणि परदेशी संरक्षण संलग्नकांना एकत्र आणणाऱ्या वार्षिक कार्यक्रमांपर्यंत, भारतशक्तीचे हे वार्षिक संमेलन या  परिसंस्थेसाठी अनिवार्य मंच बनले आहेत.

आता 11 व्या वर्षात प्रवेश करत असताना, भारतशक्ती पुढील टप्प्याची तयारी करत आहे. यात उद्योग-केंद्रित सामग्रीमध्ये सुधारणा करण्याची योजना आहे, हिंदी स्पष्टीकरणकर्ते आणि माहितीपट-शैलीतील फील्ड फिल्म्सद्वारे YouTube चॅनेलची पोहोच वाढवणे आणि प्रमुख लष्करी संस्थांमधील महिला अधिकाऱ्यांवर ‘वुमन इन डिफेन्स अँड ट्रेनिंग इंडियाज बेस्ट’ सारख्या नवीन मालिका सुरू करणे.

तरुण प्रेक्षकांशी जोडण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत – केवळ डिजिटल स्टोरीटेलिंगद्वारेच नव्हे तर विविध उपक्रमांद्वारे देखील. “आम्ही टियर-II शहरांमध्ये भारतशक्ती क्लब आणि कोइम्बतूर, लखनऊ, कानपूर आणि पुणे सारख्या संरक्षण कॉरिडॉरकडे पाहत आहोत,” असे गोखले म्हणतात. “भारताच्या संरक्षण क्षेत्राचे भविष्य दर्शविणारे MSME, विद्यार्थी आणि तरुण अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची वेळ आली आहे.”

भारतशक्ती 11 व्या वर्षात प्रवेश करत असताना, आज हा फ्लॅटफॉर्म त्याच्या स्थापनेच्या वेळी स्वीकारलेल्या तत्वज्ञानात रुजलेला आहे – धोरण, उद्योग आणि लोकांमधील दरी भरून काढणारा एक विश्वासार्ह, अंतर्दृष्टीपूर्ण आणि दूरदर्शी व्यासपीठ बनणे. “आम्ही लहान सुरुवात केली असेल,” ब्रिगेडियर चॅटर्जी म्हणतात, “पण आम्ही नेहमीच उच्च ध्येय ठेवले आहे – विश्वासार्हता, वर्ग आणि दृढनिश्चय”

दहा वर्षांनंतरही, तोच उत्साह अजूनही कायम आहे. 25 नोव्हेंबर 2015 च्या मध्यरात्री उजळून निघालेला तोच शांत निर्धार आता पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वीपणे चमकत आहे, जो भारतशक्तीला भारताच्या संरक्षण आणि धोरणात्मक समुदायाच्या सेवेच्या पुढील दशकातही मार्गदर्शन करत राहिलं.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleFuture Warfare: Building India’s Tech-Enabled Armed Forces
Next articleभारताचा इंडो-पॅसिफिक भागीदारी मजबूत करण्यावर भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here