DRDO द्वारे नव्या मॅन-पोर्टेबल स्वयंचलित अंडरवॉटर वाहनांचे अनावरण

0

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO), भारतीय नौदलाच्या सुरुंग प्रतिबंधक मोहिमा अधिक मजबूत करण्यासाठी, नवीन पिढीची मानव-पोर्टेबल स्वयंचलित अंडरवॉटर व्हेईकल्स (MP-AUVs) विकसित केली आहेत. विशाखापट्टणम येथील नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी (NSTL) या संस्थेने या अत्याधुनिक वाहनांची निर्मिती केली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, MP-AUV प्रणालींमध्ये अनेक लहान पाणबुडी वाहनांचा समावेश असून, प्रत्येक वाहनात साईड-स्कॅन सोनार प्रणाली आणि पाण्याखाली काम करणारे कॅमेरे बसवलेले आहेत. सुरुंग किंवा खाणीसारख्या प्रदेशांचा वास्तविक वेळेत शोध घेणे आणि त्याचे वर्गीकरण करणे शक्य होते. ही वाहने डीप-लर्निंग आधारित लक्ष्य ओळखणारा अल्गोरिदम वापरतात, या तंत्रज्ञानामुळे ती स्वयंचलितरीत्या वर्गीकरण करू शकतात, परिणामी ऑपरेटर्सवरील ताण कमी होतो आणि सुरुंग शोध मोहिमेचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होतो. 

या AUVs प्रणालींमध्ये, स्वदेशी बनावटीची पाण्याखाली कार्य करण्यास सक्षम असलेली, ध्वनिक दळणवळण प्रणाली देखील बसवण्यात आली आहे. यामुळे मोहिमेदरम्यान वाहनांमध्ये डेटाची देवाणघेवाण करणे सुलभ होते. तसेच, यामुळे परिस्थितीची नेमकी जाणीव होते आणि समन्वयही सुधारतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, NSTL च्या बंदर सुविधांवर अलीकडेच घेण्यात आलेल्या क्षेत्रीय चाचण्यांमध्ये, प्रमुख कार्यक्षमता निर्देशक आणि मोहिमेच्या उद्दिष्टांची पडताळणी करण्यात आली. या चाचणी कार्यक्रमात अनेक उद्योग भागीदार सहभागी झाले होते, त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही प्रणाली उत्पादनासाठी तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

DRDO चे अध्यक्ष आणि संरक्षण R&D सचिव, समीर कामत यांनी, या यशाबद्दल NSTL टीमचे अभिनंदन केले आणि या विकासाचा ‘मोठा टप्पा’ गाठला गेल्याचे नमूद गेले. ही प्रणाली तैनात करण्यायोग्य, बुद्धिमान आणि नेटवर्कशी जोडलेली सुरुंग प्रतिबंधक उपाययोजना प्रदान करते. कामत म्हणाले की, “या प्रगत वाहनांमुळे नौदलाच्या सुरुंग-युद्ध मोहिमांसाठीची जलद प्रतिसाद क्षमता वाढेल, तसेच कार्यवाहीतील धोका आणि लॉजिस्टिकचा भार कमी होण्यास मदत होईल.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleलष्कराकडून कामेंग हिमालयात 16,000 फूट उंचीवर, मोनो-रेल प्रणाली तैनात
Next articleपुतिन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारासाठी एस. जयशंकर मॉस्कोला भेट देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here