उत्तर कोरियाचे अतिरिक्त सैन्य रशियात दाखल – सेऊल गुप्तहेर संस्था

0
उत्तर कोरियाचे

उत्तर कोरियाने रशियात परत एकदा अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. परंतु किती तुकड्या तिथे गेल्या आहेत त्यांची नेमकी संख्या त्वरित कळू शकलेली नाही, असे दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी गुरुवारी देशाच्या गुप्तचर संस्थेचा हवाला देत वृत्त दिले. रशिया-युक्रेनच्या युद्धात उत्तर कोरियाचे अधिकाधिक सैन्य सहभागी होत आहे.

अतिरिक्त सैन्य रशियाच्या कुर्स्क प्रदेशातील युद्धभूमीवर पाठवण्यात आले आहे, असे वृत्तात म्हटले आहे. युक्रेनचे जे सैनिक सीमा ओलांडून पश्चिम रशियाच्या प्रदेशात घुसत आहेत त्यांच्याशी रशियन सैन्याची लढाई सुरू आहे.

राष्ट्रीय गुप्तचर सेवेच्या (एनआयएस) प्रवक्त्या कार्यालयाने रॉयटरच्या प्रतिक्रिया मागणाऱ्या दूरध्वनीला कोणतेही उत्तर दिले नाही.

उत्तर कोरियाने युक्रेनच्या युद्धात लढण्यासाठी रशियात 11 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत, असे एनआयएसने यापूर्वीच म्हटले आहे. युक्रेन आणि पाश्चिमात्य तज्ज्ञांच्या मते रशियन सैन्याने उत्तर कोरियाच्या शस्त्रांचाही वापर केला आहे.

उत्तर कोरियाने युक्रेनच्या युद्धात रशियाला दिलेल्या लष्करी पाठिंब्याची अद्याप औपचारिक कबुली दिलेली नाही.

कुर्स्क येथे, युक्रेनला एक धोरणात्मक यश साध्य करता आले आणि तुलनेत कमी रशियन सैन्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदेश काबीज करण्यात यश आले.  मात्र, रशियन सैन्याला डोनेट्स्क प्रदेशातील त्यांच्या हल्ल्यांपासून मोठ्या प्रमाणात दूर ठेवण्यासाठी हे यश पुरेसे नव्हते. या टप्प्यावर उत्तर कोरियाचे अंदाजे 10 हजार सैनिक रशियामध्ये पोहोचले होते. उत्तर कोरियाच्या कामगिरीवर विश्लेषकांनी संशय व्यक्त केला असला  तरी युक्रेनचे सैन्य स्वतःच्या प्रगतीची गती कायम ठेवू शकले नाहीत.

कुर्स्क हे एक जुने युद्धक्षेत्र आहे आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या मोठ्या लढाईचे साक्षीदार आहे. खरं तर, कुर्स्कची लढाई हा दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

कुर्स्कमध्ये युक्रेनच्या प्रगतीमुळे कदाचित त्याच्या सामरिक साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या युक्रेनच्या पश्चिमेकडील प्रांतांमधील लढाई हळूहळू रशियाच्या बाजूने जात आहे. प्रत्यक्षात, हे एक जीवघेणे युद्ध आहे जिथे रशियन प्रचंड जीवितहानी करत आहेत आणि ज्या मंद गतीने ते पुढे सरकत आहेत ते प्रचंड वेदनादायी आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)

+ posts
Previous articleलष्करप्रमुखांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान, Airbus H125 हेलिकॉप्टर मुद्द्यावर भर
Next articleकिम जोंग उनने आण्विक हल्ल्याच्या तयारीचे दिले आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here