Aero India 2025: प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीसह MBDA भारताची मान उंचावणार

0
Aero
MBDA निर्मित Meteor क्षेपणास्त्र

एंग्लो-फ्रेंच क्षेपणास्त्र निर्माता MBDA, ‘Aero India 2025‘ मध्ये Meteor, MICA, Exocet AM39 आणि SCALP यासारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रदर्शन करून, भारताची मजबूत छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय वायुसेना (IAF) आणि नौदलाच्या (IN) लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारताच्या स्वदेशी संरक्षण कार्यक्रमांना चालना देण्यासाठी सहकार्य करेल.

Meteor: हवाई लढाईसाठी एक गेम-चेंजर

Meteor हे व्हिज्युअल रेंजच्या पलीकडील एक प्रभावशाली हवाई क्षेपणास्त्र (BVRAAM) आहे, जे हवाई लढाईतील (Air Combat मधील) एक क्रांतिकारी शस्त्र म्हणून ओळखले जाते. हे मिसाईल MBDA च्या शक्ती प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरेल. भारतीय वायुसेना दलाच्या (IAF) ‘डसॉल्ट राफाल’ या लढाऊ विमानांना सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेले, Meteor क्षेपणास्त्र अत्यंत लांब अंतरावरील लक्ष्य साधण्याच्या बाबतीत अपूर्व क्षमता प्रदान करतो, ज्यामुळे IAF (इंडियन एअरफोर्स) ला आधुनिक युद्धात मोठे सहकार्य मिळते.

नेव्हल एव्हिएशनसाठी- Exocet AM39

MBDA, एरो इंडिया 2025 मध्ये, प्रसिद्ध Exocet कुटुंबातील AM39 एअर-लाँच हे जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रदर्शित करेल. हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाच्या चालू लढाऊ खरेदी कार्यक्रमातील स्पर्धक असलेल्या, Dassault च्या Rafael M विमानाशी एकीकरणासाठी प्रस्तावित आहे. कंपनीला आशा आहे की AM39 ला भारतातील स्वदेशी ट्विन इंजिन डेक-बेस्ड फायटर (TEDBF) मध्ये देखील मान्यता मिळेल, जे सध्या DRDO द्वारे विकसित केले जात आहे.

SCALP आणि MICA: हवाई हल्ल्यांची क्षमता वाढवणे

भारतीय राफाल्समध्ये आधीच SCALP डीप-स्ट्राइक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे शत्रूच्या प्रदेशात खोलवर तटबंदी असलेल्या तळांना नष्ट करण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, राफेलमध्ये एमआयसीए एअर कॉम्बॅट क्षेपणास्त्र आहे, जे अत्यंत शक्तीशाली असून, अद्ययावत मिराज 2000 फ्लीटमध्ये एकीकरण करून IAF ला ते आधीपासूनच परिचित आहे.

‘मेक इन इंडिया’च्या समर्थनार्थ- Exocet MM40 आणि अन्य

भारताच्या आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टांसाठी आपली वचनबद्धता पुनरुज्जीवित करत, MBDA ने लार्सन & टुब्रो (L&T) सोबत भागीदारी केली असून, L&T MBDA मिसाईल सिस्टिम्स लि. (LTMMSL) नामक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. हा संयुक्त उपक्रम भारतात Exocet MM40 ब्लॉक 3 या जहाजावर आधारित, सरफेस-टू-सरफेस मारा करण्यास सक्षम असे क्षेपणास्त्र तयार करत आहे.

“आज, L&T MBDA मिसाईल सिस्टिम्स लि., MBDA चा लार्सन & टुब्रो सोबतचा संयुक्त उपक्रम, Aero India 2025 मध्ये सहभागी होऊन ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांमध्ये आपल्या योगदानाचे प्रदर्शन करत आहे. भारतीय सशस्त्र दलांसाठी आत्मनिर्भर भारताला समर्थन देण्याची ही योग्य संधी आहे,” असे या कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

LTMMSL नवीन स्वदेशी प्रकल्पांची देखील शिफारस करत आहे, ज्यामध्ये भारतीय नौदलासाठी शॉर्ट-रेंज सरफेस-टू-एयर मिसाईल सिस्टिम्स आणि भारतीय लष्करासाठी नव्या जनरेशनचे ATGM5 एंटी-टँक गाइडेड मिसाईल्स यांचा समावेश आहे.

भारतीय प्लॅटफॉर्मसाठी प्रगत प्रणाली

MBDA भारतीय सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रसामग्रीने सुसज्ज करत आहे:

ASRAAM: हे दृश्य-श्रेणीतील हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, IAF च्या जग्वार ताफ्याला लक्षणीय चालना देते आणि लवकरच ते तेजस LCA Mk1A च्या क्षमतेत वाढ करेल.

Mistral ATAM: अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ALH) आणि लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) मध्ये यशस्वीपणे एकत्रित केलेली, Mistral ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, भारताच्या रोटरी-विंग लढाईच्या क्षमतांना आणखी विस्तारीत करते.

कटिंग-एज सोल्यूशन्स प्रदान करण्याचा आणि स्थानिक भागीदारीला चालना देण्याचा, ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या MBDA चा Aero India 2025 मध्ये सहभाग, भारताच्या संरक्षण प्रणालीच्या विकास आणि ऑपरेशनल तत्परतेसाठी त्यांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो.

 


Spread the love
Previous articleUkraine Removes Eastern Front Commander As Russia Advances
Next articleDenmark To Spend $2 Billion To Strengthen Defences In Greenland

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here