अफगाणिस्तानात पुन्हा तीव्र भूकंप , 20 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

0
सोमवारी पहाटे उत्तर अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहराजवळ 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी झाले. शहरातील ऐतिहासिक निळ्या मशिदीचे यात नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सुमारे 5 लाख 23 हजार लोकसंख्या असलेल्या मजार-ए-शरीफजवळ 28 किमी (17.4 मैल) खोल भूकंप झाला.

 

आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शरफत जमान यांनी सांगितले की, या भूकंपात किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 320 जण जखमी झाले, परंतु बचाव पथके बल्ख आणि समंगन या सर्वाधिक प्रभावित प्रांतातील दुर्गम गावांमध्ये पोहोचल्यानंतर मृतांची संख्या वाढू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये आपत्कालीन मदत करणारे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचविताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये बचावकर्ते कोसळलेल्या इमारतींमधून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. रॉयटर्स या बचाव प्रयत्नांच्या फुटेजची त्वरित पडताळणी करू शकले नाहीत.

“आमची बचाव आणि आरोग्य पथके परिसरात पोहोचली आहेत आणि जखमींवर उपचार करण्यासाठी सरकारने जवळपासची सर्व रुग्णालये सज्ज ठेवली आहेत,” असे जमान म्हणाले.

पवित्र तीर्थक्षेत्राचे नुकसान

भूकंपामुळे मजार-ए-शरीफमधील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या निळ्या मशिदीच्या काही भागाचे नुकसान झाले, असे बल्ख प्रांताचे प्रवक्ते हाजी झैद यांनी सांगितले.

ही मशिद अफगाणिस्तानातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असल्याचे मानले जाते. प्रेषित मोहम्मद यांचे चुलत भाऊ आणि जावई यांचे दफनस्थान असल्याचे मानले जाते. सध्याची रचना 15 व्या शतकात बांधण्यात आली होती.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या आणि रॉयटर्सने खरेपणा तपासलेल्या फुटेजमध्ये मशिदीच्या अंगणात तुटलेले दगडी बांधकाम आणि फरशा पडल्याचे दिसून आले आहे. अर्थात मुख्य रचनेला कोणतीही हानी पोहोचलेली नाही.

ही आपत्ती युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनासाठी आणखी एक नवे आव्हान आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू, परदेशी मदतीत मोठी घट आणि शेजारील देशांकडून अफगाण निर्वासितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार करणे यासारख्या संकटांचा अफगाण तालिबान सामना करत आहे.

भूकंपामुळे राजधानी काबूलसह देशभरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे राष्ट्रीय वीज पुरवठादार दा अफगाणिस्तान ब्रेश्ना कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

यूएसजीएसने म्हटले आहे की “मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि आपत्तीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे”.

भूगर्भातील सक्रिय हालचाली (Active Faults)

अफगाणिस्तानात वारंवार भूकंप होण्यामागची कारणे म्हणजे ते सतत भूगर्भातील दोन सक्रिय हालचालींवर वसले आहे, ज्यात स्फोट होण्याची आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवण्याची क्षमता आहे.

ऑगस्टच्या अखेरीस या युद्धग्रस्त इस्लामिक देशाच्या आग्नेय भागात भूकंप आणि जोरदार धक्क्यांमुळे 2 हजार 200 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले.

या सतर्कतेच्या घटनेसोबत मागील घटनांसाठी प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिसादाची आवश्यकता आहे, असे प्रणालीकडून जारी करण्यात आलेल्या सतर्कतेमध्ये म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह) 

+ posts
Previous articleपरदेशी हेरांचे लक्ष आता कृषी क्षेत्रातील माहितीवर, चीनने सुरक्षा वाढवली
Next articleपाकिस्तान आण्विक चाचणी घेत असल्याचा ट्रम्प यांचा दावा, भारत सतर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here