अफगाणिस्तानने केले पाकिस्तानसोबतचे व्यापारी मार्ग बंद

0
अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापारी मार्ग बंद केले आहेत. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील वाढत चाललेला संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा निर्णय आहे. तालिबान सरकारचे आर्थिक व्यवहार विभागाचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी काबूलमधील उद्योगपती आणि व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला.

बरादर यांनी अफगाण व्यापाऱ्यांना “तात्काळ पर्यायी व्यापारी मार्ग शोधण्याचे” आवाहन केले असून इशारा दिला आहे की जे लोक पाकिस्तानमधून वस्तू आयात किंवा निर्यात करत राहतील आणि परिणामी उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देतील त्यांना अफगाणिस्तानची इस्लामिक अमिरात कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही.

टोलोन्यूजने वृत्त दिलेले त्यांचे हे वक्तव्य दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या काळात आले आहे. अनेकदा झालेला प्राणघातक सीमापार संघर्ष आणि त्यामुळे झालेला राजनैतिक बिघाड बघायला मिळत आहे.

बरादर यांनी पाकिस्तानी औषधांच्या निकृष्ट दर्जावरही टीका केली आणि अफगाण आयातदारांना त्यांचे खाते बंद करण्यासाठी आणि पाकिस्तानी पुरवठादारांशी व्यवसाय व्यवहार संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत जाहीर केली आहे. “अफगाणिस्तानची इस्लामिक अमिरात प्रादेशिक आणि जागतिक कनेक्टिव्हिटीसाठी नवीन पर्यायी मार्ग स्थापन करण्यासाठी आणि तांत्रिक तसेच पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून विद्यमान मार्ग अधिक योग्य आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सतत काम करत आहे,” असे ते म्हणाले.

द संडे गार्डियनमधील एका वृत्तानुसार, बरादर यांचे वक्तव्य काबुलने पाकिस्तानवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्याचा आणि प्रादेशिक भागीदारांशी संबंध मजबूत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे संकेत देणारे आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी देशाच्या भौगोलिक परिस्थितीचे वर्णन – दक्षिण, मध्य आणि पश्चिम आशियाला जोडणारा असे केले असून त्यामागे असुरक्षिततेपेक्षा धोरणात्मक फायदा हे मुख्य कारण आहे.

इराणच्या चाबहार आणि बंदर अब्बास बंदरांमधून व्यापार मार्ग विकसित करण्यासाठी तसेच उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानशी भूभागावरील संबंध विकसित करण्याच्या दृष्टीने नवीन गुंतवणूक केली जात असल्याचे वृत्त आहे. मध्य आशियाशी अधिक जवळून एकात्मता निर्माण करण्याचा आणि जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश वाढवण्याचा काबुलचा हेतू या बदलातून दिसून येतो.

गेल्या महिन्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध झपाट्याने बिघडले आहेत. 9 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत कथित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) छावण्यांना लक्ष्य करून सीमापार हवाई हल्ले सुरू केल्यानंतर तणाव वाढला. 2021 पासून शेकडो पाकिस्तानी सैनिकांना मारणाऱ्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या टीटीपी दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप इस्लामाबादने बराच काळ तालिबानवर केला आहे.

चर्चेद्वारे या संकटावर मात करण्याचे प्रयत्न आतापर्यंत तरी अपयशी ठरले आहेत. अफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री आणि इस्लामाबादसोबतच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेचे प्रमुख रहमतुल्लाह नजीब यांनी द संडे गार्डियनला सांगितले की, पाकिस्तानने तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांच्याकडून टीटीपीविरुद्ध धार्मिक आदेश किंवा फतवा मागितला तेव्हाच या वाटाघाटी संपुष्टात आल्या

नजीब यांनी ही मागणी “अशक्य आणि अयोग्य” असल्याचे म्हटले. “पाकिस्तानला फतवा हवा होता, ठराव नाही,” असेही ते म्हणाले. “ते आम्हाला ज्यांना ते स्वतः दहशतवादी म्हणून संबोधतात त्यांना आश्रय देण्यास सांगतात. ही राजनैतिकता नाही – हा एक मोठा गोंधळ आहे.”

ऐश्वर्या पारीख

+ posts
Previous articleदक्षिण कोरिया: भरधाव ट्रक बाजारात घुसला, अपघातात दोघांचा मृत्यू
Next articleEU मधील व्यापार तणावांदरम्यान, जिनपिंग यांची स्पेनला भागीदारीची ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here