भारतीय तरुणांना तिन्ही संरक्षण दलांमध्ये दाखल होता यावे, यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवार, दि. 14 जून 2022 रोजी अग्निपथ या आकर्षक भरती योजनेची घोषणा केली. देशभक्तीने प्रेरित या युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील होता होईल आणि हे युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. सशस्त्र दलात इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी अशी त्यांची रँक असेल. सध्या भारतीय लष्कराचे सरासरी आयुर्मान 32 वर्षे आहे. या नव्या योजनेद्वारे हे सरासरी आयुर्मान 26 वर्षांवर आणण्याचा मानस संरक्षण मंत्रालयाचा आहे. अशा प्रकारे भारतीय सैन्याचा तरुण चेहरा पाहायला मिळणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती पुढील वेबसाइटवर उपलब्ध आहे.
https://indianairforce.nic.in/agniveer/
या अग्निपथ योजनेसाठी ‘ऑल इंडिया ऑल क्लास’ आधारावर नावनोंदणी केली जाईल आणि पात्रतेसाठी वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असेल. (मंगळवारी पत्रकार परिषदेत ही वयोमर्यादा 21 वर्षे असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता ती वाढवून 23 इतकी केली आहे.) यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर त्यांना अंदाजे रु. 11.71 लाखांचा सेवा निधी मिळेल. ज्यांची कामगिरी उल्लेखनीय राहील, अशा 25 टक्के तरुणांना विविध चाचण्या उत्तीर्ण केल्यानंतर भारतीय लष्करात 15 वर्षे सेवा करता येईल. तर, इतर तरुणांना चार वर्षांच्या कालावधीनंतर स्वत:चा रोजगार सुरू करता येईल किंवा विविध नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळेल. ही योजना कधीपासून लागू होईल? तरुणींना यामध्ये किती संधी आहे? शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि या नव्या अग्निपथ योजनेत नेमका काय फरक आहे? याविषयीच्या अधिक माहितीसाठी पाहा भारतशक्ती मराठीच्या ‘रणनीती’चा हा भाग –
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCPZPza3BQr6nt1Tp8EntiGg