हवाई दल प्रमुखांनी C-130J विमानातून उड्डाण करत केले न्योमा एअरफील्डचे उद्घाटन 

0
भारताच्या उंचावरील हवाई क्षमतेचे शक्तिशाली प्रदर्शन करताना, एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी काल पूर्व लडाखमध्ये नव्याने बांधलेल्या न्योमा एअरफील्डवर उतरण्यासाठी  C-130J सुपर हरक्युलिस ट्रान्सपोर्ट विमानातून उड्डाण केलेआणि या सुविधेचे औपचारिक उद्घाटन केले. हे उड्डाण जगातील सर्वात उंच प्रगत हवाई तळांपैकी एकाच्या ऑपरेशनल तयारीचे प्रतिनिधित्व करते, जे आता अधिकृतपणे आयएएफ स्टेशन मुध-न्योमा म्हणून ओळखले जाते.

 

चीन आणि भारतातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) फक्त 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा विमानतळ भारतीय हवाई दलासाठी (IAF) पुढील हवाई ऑपरेशन्स टिकवून ठेवण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल आहे. अत्यंत कठीण हवामान परिस्थितीत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनद्वारे (BRO) बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात जुन्या मातीच्या लँडिंग स्ट्रिपच्या जागी पूर्णपणे पक्की धावपट्टी बसवण्यात आली असून ती लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर हाताळण्यास सक्षम आहे.

 

13 हजार 700 फूट उंचीवरील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा तळ

13 हजार 700 फूट उंचीवर आणि लेहच्या आग्नेयेस सुमारे 180 किलोमीटर अंतरावर असलेले, न्योमा सिंधू नदीच्या काठावर वसलेले आहे. आता लेह, कारगिल आणि थोइस यांना  जोडणारा लडाखमधील चौथा कार्यरत IAF तळ बनला आहे. नवीन तळामुळे भारताची हवाई शक्ती प्रक्षेपित करण्याची आणि उत्तर तसेच पूर्व सीमेजवळ दीर्घकालीन ऑपरेशन्स टिकवून ठेवण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

न्योमा विमानतळामुळे आजूबाजूच्या बेसवरील सैन्याची जलद हालचाल, लॉजिस्टिक सपोर्ट आणि 24 तास ऑपरेशन्स या गोष्टी शक्य होतील.

मातीची धावपट्टी ते कॉम्बॅट-रेडी बेस

अलीकडे पर्यंत, न्योमा हे एका खडकाळ ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंडपेक्षा (ALG) थोडे अधिक महत्त्वाचे होते. तो चिखलाने भरलेला एक रस्ता होता जिथे फक्त लहान विमाने उतरू शकत होती. गेल्या वर्षभरात बांधण्यात आलेला ही नवीन धावपट्टी सर्व हवामान परिस्थितीत लढाऊ आणि वाहतूक विमानांच्या लँडिंग, टेक-ऑफ आणि देखभाल सुलभ करणारी ठरली आहे. याशिवाय इंधन भरणे, रडार ऑपरेशन्स आणि क्रूला तिथे राहण्याच्या दृष्टीने सुविधा देखील सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वर्षभर सातत्याने हवाई उड्डाणे सुनिश्चित होतील, अगदी शून्यापेक्षा कमी हिवाळ्यातील तापमानात देखील जे बहुतेकदा -20°C पेक्षा कमी होते त्यावेळीही विमानांचे उड्डाण शक्य होईल.

त्याच्या नवीन सुविधेसह न्योमा आता लढाऊ विमानांसाठी फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस म्हणून काम करू शकते, ज्यामुळे भारताला लडाख क्षेत्रातील कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्याची लवचिकता प्राप्त होईल.

भारताच्या पायाभूत हवाई सुविधांचा विस्तार

न्योमा एअरफील्ड हे हिमालयातील भारताच्या पायाभूत हवाई  सुविधांना बळकटी देण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. संरक्षण मंत्रालय एलएसीपासून फक्त 4 किमी अंतरावर असलेल्या चुशुल ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंडची डागडुजी करत आहे, ज्याने 1962 च्या भारत-चीन युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकदा अपग्रेड झाल्यानंतर, चुशुलमध्ये यूएव्ही, हेलिकॉप्टर आणि सी-295 आणि सी-130 जे सारखी विशेष ऑपरेशन विमाने हाताळण्याची अपेक्षा आहे.

न्योमा आणि चुशुल एकत्रितपणे पूर्व लडाखमध्ये भारताच्या स्थानांवर देखरेख, पुरवठा आणि टिकवून ठेवण्याच्या क्षमतेत नाटकीयरित्या वाढ दर्शवतात. शिवाय या प्रदेशात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) मोहिमांना देखील पाठिंबा देतील.

दृढनिश्चय आणि तयारी

पहिल्या उड्डाणाचे वैयक्तिक पातळीवर पायलट म्हणून उड्डाण करण्याचा हवाई दल प्रमुखांचा निर्णय हा भारताच्या संरक्षण तयारीवरील विश्वासाचा एक मजबूत संदेश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इतक्या उंचीवर जड विमाने चालविण्याची क्षमता उच्च-उंचीवरील युद्ध वातावरणात भारतीय हवाई दलाची वाढलेली लॉजिस्टिक आणि तांत्रिक क्षमता दर्शवते.

भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुध-न्योमा सुरू झाल्यामुळे, भारताकडे आता एक भक्कम  हवाई तळ आहे जो धोरणात्मक पोहोच आणि ऑपरेशनल लवचिकता यांचे मिश्रण आहे, हा विकास केवळ संरक्षण क्षमता मजबूत करत नाही तर सर्वात आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या सीमांचे रक्षण करण्याच्या भारताच्या संकल्पाला दुजोरा देतो.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleउदयोन्मुख तंत्रज्ञान आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत आहे: लष्करप्रमुख
Next articleत्रि-सेवा सराव ‘त्रिशूल 2025’ चा समारोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here