एअर इंडिया अपघात: उड्डाणानंतर काही सेकंदात इंधन इंजिन बंद पडले

0
इंधन इंजिन
12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या घटनेनंतर कोसळलेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाची शेपूट एका इमारतीवर अडकलेली दिसते. (रॉयटर्स/अमित दवे/फाईल फोटो) 
गेल्या महिन्यात 260 लोकांचा बळी घेणाऱ्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानुसार उड्डाणानंतर केवळ तीन सेकंदात, विमानाचा इंजिन इंधन कटऑफ स्विच जवळजवळ एकाच वेळी ‘रन’ वरून ‘कटऑफ’ वर फिरला ज्यामुळे इंधन पुरवठा बंद झाल्याने इंजिनही बंद पडले. 

भारतीय विमानचालन अपघाताच्या तपासकर्त्यांनी शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, बोईंग 787 ड्रीमलाइनरचा उड्डाण वेग लगेच कमी होऊ लागला आणि ते खालीच्या दिशेने येऊ लागले.

एका पायलटने कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवर दुसऱ्याला इंधन का कापले असे विचारले असल्याचे ऐकू येते. “दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिले की त्याने तसे केले नाही”, असे अहवालात म्हटले आहे.

मे डे कॉल

विमानाच्या कॅप्टनने यावर कोणती टिप्पणी केली आणि प्रथम अधिकाऱ्याने कोणती, किंवा कोणत्या पायलटने अपघाताच्या अगदी आधी ‘मे डे, मे डे, मे डे’ अशी घोषणा प्रसारित केली हे त्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही.

भारतीय शहर अहमदाबादहून 12 जून रोजी लंडनला जाणाऱ्या विमानात स्विच कटऑफ स्थितीत कसा उलटला असेल हे देखील प्राथमिक अहवालात नमूद केलेले नाही.

अमेरिकन विमानचालन सुरक्षा तज्ज्ञ जॉन म्हणाले की, इंजिनांना इंधन पुरविणारे इंधन स्विच पायलट चुकून देखील हलवू शकणार नाही. “तुम्ही त्यांना सहजपणे हलवले आणि ते हलले असं होऊच शकत नाही,” असं ते म्हणाले.

इंधन पुरवठा करणारा स्विच कटऑफकडे फिरल्याने इंजिनाचा पुरवठा जवळजवळ लगेच कापला जातो. विमान त्याच्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर किंवा इंजिनला आग लागणे यासारख्या काही आपत्कालीन परिस्थितीत इंजिन बंद करण्यासाठी याचा वापर केला जातो.  मात्र कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत इंजिन बंद करण्याची आवश्यकता होती याचा खुलासा या अहवालात कुठेही करण्यात आलेला नाही.

बोईंगवर तात्काळ कारवाई नाही

भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने म्हटले आहे की, तपासाच्या या टप्प्यावर, बोईंग 787-8 आणि/किंवा जीई जीईएनएक्स-1बी इंजिन चालक आणि उत्पादकांवर कोणत्याही प्रकारच्या कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही.

एअर इंडिया, बोईंग आणि जी. ई. एव्हिएशनने प्रतिक्रिया द्यावी यासाठी करण्यात आलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील हे कार्यालय या दशकातील जगातील सर्वात प्राणघातक विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व करत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article‘ऑपरेशन सिंदूर’वरून NSA डोवाल यांची परदेशी माध्यमांवर टीका
Next articleSchool of Artillery: Training Gunners to Destroy Enemy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here