एअर मार्शल अमर प्रीत सिंग बनणार नवे हवाई दल प्रमुख

0
एअर मार्शल
एअर मार्शल ए. पी. सिंग यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती

हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून सध्या कार्यरत असलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे 30 सप्टेंबर 2024 पासून हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. सरकारने आज या नव्या नियुक्तीची घोषणा केली. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे 30 सप्टेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत.
एअर मार्शल ए. पी. सिंग यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिक शाखेत त्यांची नियुक्ती करण्यात आली. सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी कमांड, स्टाफ, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्ती अशा विविध पदांवर काम केले आहे.

नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले सिंग हे क्वालिफाईड  फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट असून त्यांना विविध प्रकारच्या फिक्स्ड आणि रोटरी विंग विमानांचा 5 हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे, असे भारतीय हवाई दलाने सांगितले.

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले आहे. टेस्ट पायलट म्हणून, त्यांनी रशियामध्ये मॉस्को येथे MiG-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले. नॅशनल फ्लाइट टेस्ट सेंटरमध्ये ते प्रोजेक्ट डायरेक्टर (फ्लाइट टेस्ट) देखील होते आणि त्यांना लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसच्या फ्लाइट टेस्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी साउथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हवाई दलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleDRDO Transfers High-Altitude Sustenance Tech To PGCIL For Ladakh’s Energy Needs
Next articleQuad To Stay Says PM Modi, Expands Strategic Partnership With US

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here