अंदमान निकोबार मधील 30 विद्यार्थ्यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

0
अंदमान
अंदमान आणि निकोबार बेटांवरील आदिवासी विद्यार्थ्यांची संरक्षणमंत्र्यांनी घेतली भेट 
अंदमान आणि निकोबार बेटांवरील आदिवासी समुदायातील 30 गुणवान उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची आज साऊथ ब्लॉक येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच उत्तम चारित्र्य निर्माण व्हावे यालाही समान महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अंदमान आणि निकोबार कमांडने (ANC) आयोजित केलेल्या ‘आरोहनः दीप टू दिल्ली “या सात दिवसांच्या राष्ट्रीय एकात्मता दौऱ्याचा एक भाग म्हणून हे विद्यार्थी राजधानी दिल्लीत आहेत. मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी, मुख्यालय दिल्ली क्षेत्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या नागरी प्रशासनाच्या पाठिंब्याने हा कार्यक्रम दुर्गम बेट समुदायातील तरुणांना भारताचा सांस्कृतिक वारसा, आधुनिक पायाभूत सुविधा तसेच शैक्षणिक संधींशी परिचित करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हे विद्यार्थी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यालाही उपस्थित रहाणार आहेत.

या भेटीदरम्यान, सिंह यांनी मानवी मूल्ये मजबूत चारित्र्याचा पाया कसा बनतात यावर भर दिला आणि विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करत असताना ही मूल्ये आपल्यात रुजावीत यासाठी प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले. आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि एक शक्तिशाली तसेच समृद्ध राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात योगदान देण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

संरक्षणमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत तोंड गोड करून केले. याशिवाय बेटांवरील आदिवासी कारागिरांनी बनवलेल्या हस्तकलेच्या स्मृतीचिन्हांचे कौतुक केले. या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित उपस्थित होते.

आरोहनच्या या प्रवासात हे विद्यार्थी लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि ताजमहाल यासारख्या प्रतिष्ठित स्थळांना तसेच दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय विज्ञान केंद्रासारख्या प्रमुख संस्थांना भेट देणार आहेत. हा उपक्रम राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी आणि बेटांवरील भावी नेत्यांना सक्षम बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleतालिबानने जबरदस्तीने आंतरराष्ट्रीय मदत वळवली: अमेरिकेचा अहवाल
Next articleउष्णतेची लाट आणि जोरदार वाऱ्यांमुळे, दक्षिण युरोपात वणव्याचा हाहाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here