युद्धविरोधी निदर्शकांचा मेलबर्न पोलिसांवर हल्ला

0
युद्धविरोधी
11 सप्टेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे लँड फोर्सेस इंटरनॅशनल लँड डिफेन्स एक्सपोजिशन येथे दंगलखोर निदर्शक आणि पोलिस समोरासमोर आले. (रॉयटर्सच्या माध्यमातून एएपी/कॉन क्रॉनिस)

मेलबर्न येथे बुधवारी संरक्षणविषयक प्रदर्शनाबाहेर युद्धविरोधी निदर्शक आणि पोलिस यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी  आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पंज ग्रेनेड, फ्लॅश-बॅंग उपकरणे आणि उत्तेजक फवारणीचा वापर केला.
प्रदर्शनातील उपस्थितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांवर दगड, घोड्याची लीद आणि द्रव पदार्थांनी भरलेल्या बाटल्या फेकल्या आल्या. शिवाय काही पोलिसांना निदर्शकांनी मारहाणही केली.

व्हिक्टोरिया पोलिस आयुक्त शेन पॅटन यांनी मेलबर्न येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन डझन पोलिस अधिकारी या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
पोलिसांवर हल्ला करणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे किंवा त्यांना त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, जाळपोळ करणे आणि रास्ता रोको आंदोलन करणे यासाठी 39 जणांना अटक करण्यात आली आहे.
काही पोलिसांवर निदर्शक थुंकले असून इतर अधिकाऱ्यांवर द्रव भरलेल्या बाटल्या फेकण्यात आल्या. ज्यापैकी काही बाटल्यांमध्ये ॲसिड होते असे पॅटन यांनी सांगितले.
ते म्हणाले, “आमच्यावर हल्ला करण्याचा हेतू असलेल्या एका गटाकडून आज आपण पाहिलेली ही घृणास्पद वागणूक होती. जर तुम्हाला येऊन आंदोलन करायचे असेल तर ते शांतपणे करा. आम्ही गुन्हेगारी वर्तन सहन करणार नाही,” असा इशाराही पॅटन यांनी दिला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेलबर्न येथे आयोजित द्विवार्षिक लँड फोर्सेस इंटरनॅशनल लँड डिफेन्स एक्स्पोझिशनच्या बाहेर झालेल्या या निदर्शनात सुमारे 1,200 लोक सहभागी झाले होते.

त्यापैकी अनेकांनी लाऊड स्पीकर्सद्वारे पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा देत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावले, तर इतर निदर्शकांच्या हातात संघर्षाला कारणीभूत ठरणारी आणि संघर्षांच्या कारणांचे प्रतिनिधित्व करणारी विविध चिन्हे आणि झेंडे होते, असे व्हिडिओमध्ये बघायला मिळाले.

निदर्शकांनी कचरा गोळा करणारा एक ट्रक पोलीसांच्या दिशेने ढकलला तर एक निदर्शक ट्रॅफिक सिग्नलवर थांबवण्यात आलेल्या ट्रकवर चढला.

2000 साली ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराने जागतिक आर्थिक मंचाचे यजमानपद भूषवल्यानंतर मेलबर्नमध्ये झालेली ही सर्वात मोठी पोलिस कारवाई असल्याचे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सांगितले.

31 देशांतील सुमारे एक हजार प्रदर्शन संस्था शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियातील हे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या काही उपस्थितांवरही  निदर्शकांनी लाल रंगाचे द्रव्य फेकल्याचे एबीसी न्यूजने म्हटले आहे.

पंतप्रधान अँथनी अल्बनीज म्हणाले की, लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे परंतु ते त्यांनी शांततेच्या मार्गाने करावे.

“पोलिसांवर हल्ला करून तुम्ही संरक्षण उपकरणांना विरोध करता असे तुम्हाला म्हणता येणार नाही. त्यांनी मेहनतीने ही नोकरी मिळवली आहे आणि आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे,” असे अल्बनीज यांनी चॅनल सेव्हनला सांगितले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleDefence Minister Rajnath Singh To Inaugurate IDAX At Jodhpur, Top Indian Tech On Display
Next articleUpdate/ IAF’s Tarang Shakti Phase II: The Curtains Come Down Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here