🚨HAPPENING NOW: Melbourne’s notorious “peace protesters” have taken our city hostage (again!) in true Hamas fashion today
The event hasn’t even started, and they’ve already turned violent pic.twitter.com/vpZJiihTyT
— Avi Yemini (@OzraeliAvi) September 10, 2024
ते म्हणाले, “आमच्यावर हल्ला करण्याचा हेतू असलेल्या एका गटाकडून आज आपण पाहिलेली ही घृणास्पद वागणूक होती. जर तुम्हाला येऊन आंदोलन करायचे असेल तर ते शांतपणे करा. आम्ही गुन्हेगारी वर्तन सहन करणार नाही,” असा इशाराही पॅटन यांनी दिला.
If this is what the Melbourne protests are like on a weekday, they’re going to be terrifying on Saturday and Sunday
pic.twitter.com/FzgxJnt5Al— Brad Stephenson (@Shuttlecock) September 11, 2024
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेलबर्न येथे आयोजित द्विवार्षिक लँड फोर्सेस इंटरनॅशनल लँड डिफेन्स एक्स्पोझिशनच्या बाहेर झालेल्या या निदर्शनात सुमारे 1,200 लोक सहभागी झाले होते.
त्यापैकी अनेकांनी लाऊड स्पीकर्सद्वारे पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा देत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावले, तर इतर निदर्शकांच्या हातात संघर्षाला कारणीभूत ठरणारी आणि संघर्षांच्या कारणांचे प्रतिनिधित्व करणारी विविध चिन्हे आणि झेंडे होते, असे व्हिडिओमध्ये बघायला मिळाले.
निदर्शकांनी कचरा गोळा करणारा एक ट्रक पोलीसांच्या दिशेने ढकलला तर एक निदर्शक ट्रॅफिक सिग्नलवर थांबवण्यात आलेल्या ट्रकवर चढला.
2000 साली ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराने जागतिक आर्थिक मंचाचे यजमानपद भूषवल्यानंतर मेलबर्नमध्ये झालेली ही सर्वात मोठी पोलिस कारवाई असल्याचे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सांगितले.
31 देशांतील सुमारे एक हजार प्रदर्शन संस्था शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियातील हे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या काही उपस्थितांवरही निदर्शकांनी लाल रंगाचे द्रव्य फेकल्याचे एबीसी न्यूजने म्हटले आहे.
पंतप्रधान अँथनी अल्बनीज म्हणाले की, लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे परंतु ते त्यांनी शांततेच्या मार्गाने करावे.
“पोलिसांवर हल्ला करून तुम्ही संरक्षण उपकरणांना विरोध करता असे तुम्हाला म्हणता येणार नाही. त्यांनी मेहनतीने ही नोकरी मिळवली आहे आणि आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे,” असे अल्बनीज यांनी चॅनल सेव्हनला सांगितले.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)