Tuesday, March 10, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi लष्करप्रमुखांची ऑस्ट्रेलिया भेट: इंडो-पॅसिफिक लष्करी संबंध मजबूत होणार

लष्करप्रमुखांची ऑस्ट्रेलिया भेट: इंडो-पॅसिफिक लष्करी संबंध मजबूत होणार

0

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज म्हणजेच सोमवारपासून  चार दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत‌. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे आणि सैन्य-ते-सैन्य संबंध वाढवणे आहे हा या भेटीमागचा उद्देश आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात इंडो-पॅसिफिकमध्ये वाढत्या धोरणात्मक अभिसरणाच्या दरम्यान ही भेट होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की चर्चेदरम्यान प्रशिक्षण देवाणघेवाण, संयुक्त सराव आणि व्यावसायिक लष्करी संवाद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

कॅनबेरा येथे, जनरल द्विवेदी ऑस्ट्रेलियन लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही जनरल दीर्घकालीन व्यावसायिक संबंध सामायिक करतात. दोघेही यूएस आर्मी वॉर कॉलेजच्या “क्लास ऑफ 2015” चे माजी विद्यार्थी आहेत.

चर्चांमध्ये ऑपरेशनल सहकार्य, सैन्य आधुनिकीकरण आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. द्विपक्षीय बैठकीनंतर ऑस्ट्रेलियन संरक्षण दल मुख्यालयात एक व्यापक गोलमेज बैठक होईल. यात दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी भाग घेतील.

जनरल द्विवेदी ऑस्ट्रेलियन कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये अधिकाऱ्यांना संबोधित करतील, जिथे ते प्रादेशिक सुरक्षा गतिशीलता आणि लष्करी परिवर्तन याबाबत भारताच्या दृष्टिकोनावर भाषण देतील अशी अपेक्षा आहे.

कॅनबेराहून, लष्करप्रमुख सिडनीला जातील. तेथे ते ऑस्ट्रेलियाच्या फोर्सेस कमांड (FORCOMD) आणि स्पेशल ऑपरेशन्स कमांडच्या (SOCOMD) वरिष्ठ नेतृत्वाला भेटतील.

संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की ही भेट दोन्ही देशांचे संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी संयुक्तपणे योगदान देण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIran–US Showdown: Strategic Aims, Hidden Objectives and Possible Endgame
Next articleमिलान 2026 सराव: भारत जागतिक नौदल कूटनीतिच्या केंद्रस्थानी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here