देशाच्या रक्षणासाठी सज्ज, स्वदेशी हवाई संरक्षण ढाल: ‘अनंत शस्त्र’

0

भारतीय लष्कराने, स्वदेशी बनवाटीच्या अनंत शस्त्र’ (Anant Shastra) या जलद प्रतिसाद देणाऱ्या, सरफेस-टू-एअर मिसाईल (QRSAM) प्रणालीचे संपादन वेगाने सुरू केले असून, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षणाला बळकटी देण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाच ते सहा रेजिमेंटच्या खरेदीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ला प्रस्ताव विनंती (RFP) जारी करण्यात आली आहे.

‘अनंत शस्त्र’ या क्षेपणासच्र प्रणालीचा विकास, DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) आणि BEL (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) यांच्या सहकार्याने झाला असून, मोबाईल युनिट्सचे (चलनात्मक तुकड्यांचे) ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स आणि मारक विमाने यासारख्या कमी उंचीच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी, या प्रणालीची रचना केली गेली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही अद्ययावत प्रणाली पारंपारिक OSA-AK प्लॅटफॉर्मची जागा घेईल. यामुळे भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवर कार्यरत असेल्या यांत्रिक तुकड्यांना, त्वरित आणि नेमक्या ठिकाणी संरक्षण मिळू शकेल.

एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहिनुसार, ‘0-10 किलोमीटरच्या हवाई संरक्षण क्षेत्रात, जिथे आधुनिक हवाई धोक्यांची तीव्रता अधिक असते, तिथे नियंत्रण ठेवण्यासाठी अनंत शस्त्र ही संरक्षण प्रणाली सक्षम आहे. त्याची गती आणि चलनात्मकता, चिलखती आणि तोफखाना युनिट्सना अधिक सुरक्षिततेसह लष्करी हालचाली करण्यास सहाय्य करेल.”

ऑपरेशन सिंदूरनंतरचा धोरणात्मक निर्णय

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, संरक्षण अधिग्रहण परिषदेने तात्काळ ‘अनंत शस्त्र’च्या खरेदीला मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे, चीन आणि तुर्कीच्या पारंपारिक संरक्षण प्रणालींसह, शत्रू वापरत असलेल्या ड्रोन्स आणि अन्य मार्गदर्शित युद्धसामग्रीची वाढती आव्हाने भरतासमोर उघड झाली.

या पार्श्वभूमीवर, ‘अनंत शस्त्र’ प्रणालीचा लष्करातील समावेश हवाई संरक्षण संरचेन महत्वाची भूमिका बजावतो, ज्यामध्ये याआधीच- आकाश, MRSAM, स्पायडर आणि S-400 या क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश झाला असून, त्या यशस्वीरित्या कार्यरत आहेत.

‘अनंत शस्त्र’च्या सिद्ध क्षमता आणि वैशिष्ट्ये:

या क्षेपणास्त्र प्रणालीच्या, विविध प्रदेशातील भूभागात, दिवसा आणि रात्री व्यापक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • व्याप्ती: 30-40 किलोमीटरचा अंतर्भाग, 10 किमीपर्यंतची उंची
  • चलनात्कता: ही प्रणाली 8×8 हाय-मोबिलिटी वाहनांवर बसवण्यात
    आली आहे, जी वाळवंटी प्रदेश, सपाट मैदानी भागात आणि अति-उंचीच्या ठिकाणी सहजपणे वापरली जाऊ शकते.
  • 360° (डिग्री) रडार कव्हरेज: यामध्ये टारगेट ट्रॅकिंग आणि लक्ष्यावर मारा करण्याच्या क्षमतेसह बहु-कार्यक्षम  रडार बसवलेले आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक युद्ध लवचिकता: प्रतिकूल विद्युत-चुंबकीय वातावरणात देखील कार्य करण्यास देखील ही प्रणाली सक्षम आहे.
  • आंतर-कार्यक्षमता: यामध्ये भारतीय लष्कराच्या ‘आकाशतीर’ कमांड आणि नियंत्रण प्रणालीसह, पूर्ण सज्जता देण्यात आली आहे.

अशाप्रकारच्या QRSAM प्रणालींमध्ये, उच्च-गती घन-इंधन प्रणोदन आणि प्री-फ्रॅगमेंटेड वॉरहेड्स चा वापर केला जातो, ज्यामुळे त्या ड्रोन, लोइटरिंग दारुगोळा, रॉकेट्स आणि शॉर्ट-रेंज क्षेपणास्त्रांना निष्क्रिय करण्यास सक्षम असतात.

स्वदेशीकरणाला गती

‘अनंत शस्त्र’ क्षेपणास्त्र प्रणाली विकास कार्यक्रम, ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील स्वदेशीकरणाला चालना देतो. आत्मनिर्भरतेसाठी भारताच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो. ही अद्ययावत प्रणाली, झोरावर लाईट टँकसारख्या आगामी मालमत्तेसह, परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाला अधोरिखित करते.

एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “अनंत शास्त्र प्रणाली, एकदा का भारतीय लष्करात समाविष्ट झाली की, ती भारताची युद्धभूमीवर एक चपळ, चलनात्मक आणि स्वदेशी ढाल बनेल.” 

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleअमेरिकेच्या H-1B फीवाढीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून नवीन K व्हिसाची घोषणा
Next articleचीनच्या “K” व्हिसामुळे सोशल मीडियावर वादळ, भारतावरही निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here