कार्बाइन करारासह लष्कर करणार पायदळाचे आधुनिकीकरण

0
लष्कराच्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असणाऱ्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये  एक महत्त्वाचा टप्पा गाठत, संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात भारत फोर्ज आणि पीएलआर सिस्टम्स (अदानी ग्रुप) या दोन भारतीय कंपन्यांसोबत 4.25 लाख क्लोज क्वार्टर बॅटल (सीक्यूबी) कार्बाइन खरेदीसाठी 2 हजार 770 कोटी रुपयांचे करार केले आहेत. या आधुनिक शस्त्रांचा समावेश 1940 च्या ब्रिटिश डिझाइनवर आधारित लष्कराच्या विंटेज 9 मिमी सब-मशीन गनची जागा घेईल, ज्यामुळे इन्फंट्रीची कमी पल्ल्याच्या फायरपॉवर आणि कामगिरीशी निगडीत प्रभावीपणामध्ये बदल होईल.

पायदळ दिनाच्या (27 ऑक्टोबर) आधी या बातमीची घोषणा करताना, इन्फंट्रीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार म्हणाले की, व्यापक मूल्यांकनानंतर करार अंतिम करण्यात आले आहेत ज्यामुळे “एक गंभीर आणि दीर्घकाळ प्रलंबित असणारी क्षमता तफावत भरून काढली जाईल.”

“सध्याच्या कार्बाइन स्टर्लिंग डिझाइनवर आधारित एक खूप जुनी शस्त्र प्रणाली आहे. आम्ही ज्यासाठी जात आहोत ते एक उत्कृष्ट धातूशास्त्र, अचूकता आणि गोळी झाडण्याला वेग असलेले लक्षणीयरीत्या सुधारित शस्त्र आहे,” असे लेफ्टनंट जनरल कुमार म्हणाले. “यामुळे आपल्या सैनिकांना जवळच्या  लढाईत निर्णायक आघाडी घेता येईल.”

दशकांच्या विलंबानंतर करारांना अंतिम स्वरूप

‘खरेदी (इंडियन)’ श्रेणी अंतर्गत देण्यात आलेल्या 2 हजार 770 कोटी रुपयांच्या ऑर्डरमध्ये भारत फोर्ज एकूण प्रमाणाच्या 60 टक्के पुरवठा करेल आणि अदानींची पीएलआर सिस्टम्स उर्वरित 40 टक्के पुरवठा करेल. उर्वरित हिस्सा अदानी डिफेन्सद्वारे इस्रायल वेपन इंडस्ट्रीजकडून (आयडब्ल्यूआय) परवाना घेऊन भारतात उत्पादित केला जाईल – जो गॅलिल एसीई सीक्यूबी प्लॅटफॉर्मला पुरवठा करतो- भारतात त्याची  ‘जीत’ या नावाने विक्री केली जाईल. याचा पुरवठा सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा असून त्यानंतर एका वर्षाच्या आत सैन्याची मागणी पूर्ण होईल.

या खरेदीमुळे वारंवार निविदा काढणे, त्या रद्द करणे आणि जलदगती प्रक्रियेच्या जवळजवळ 28 वर्षांच्या प्रतिक्षेचा अंत झाला जी कधीही प्रत्यक्षात उतरली नाही. 1990  दशकाच्या उत्तरार्धात पहिल्यांदाच लष्कराची CQB कार्बाइनची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ही  गरजपूर्ती झालीच नाही, ज्यामुळे सैन्याला 1950 च्या दशकात सेवेत दाखल झालेल्या ब्रिटिश L2A3 स्टर्लिंगच्या भारतीय रूपांतरित 9mm 1A1/2A1 सब-मशीन गनवर अवलंबून राहावे लागले.

“गेल्या काही वर्षांत, धातूशास्त्र आणि तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत. ही नवीन कार्बाइन त्या उत्क्रांतीचे प्रतीक आहे – ती भारतीय आहे, आधुनिक आहे आणि सध्याच्या काळात होणाऱ्या लढाईच्या वास्तविकतेसाठी तयार करण्यात आली आहे,” असे डीजी इन्फंट्री म्हणाले.

स्वदेशी रचना आणि गोळी झाडण्याची उच्च शक्ती

ही नवीन कार्बाइन DRDO च्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE), पुणे आणि भारत फोर्जची संरक्षण शाखा, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड (KSS) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. हे शस्त्र ५.५६×४५ मिमी नाटो राउंडसाठी चेंबर केलेले आहे, जे लेगसी ९ मिमी सिस्टीमपेक्षा जास्त अचूकता, कमी रिकोइल आणि उत्कृष्ट प्राणघातक शक्ती प्रदान करते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे कार्बाइन “खरेदी (इंडियन)” श्रेणी खरेदी मार्गाअंतर्गत अनिवार्य स्वदेशी सामग्रीच्या मर्यादेत पूर्णपणे बसते, कारण ते संपूर्णत: भारतात डिझाइन केलेले, विकसित केलेले आणि उत्पादित केलेले आहे. यामुळे आयएनएएसएएस रायफलनंतर स्थानिक पातळीवर सर्वात मोठी लघु-आर्म्सची ऑर्डर मिळालेले कार्बाइन बनले आहे.

“हा प्रकल्प संरक्षणात खऱ्या आत्मनिर्भरतेकडे सुरू असणारी आमची प्रगती दर्शवितो,” असे लेफ्टनंट जनरल कुमार म्हणाले. “डीआरडीओ-भारत फोर्ज कार्बाइन केवळ उपकरणे अपग्रेड करण्याचे नव्हे तर पायदळातील सैनिकांसाठी क्षमता परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते.”

स्पर्धात्मक बोली आणि खर्चाचा फायदा

या निविदेमुळे सात भारतीय कंपन्यांना आकर्षित केले आहे, जे देशांतर्गत संरक्षण उद्योगाच्या वाढत्या परिपक्वतेचे संकेत देतात. निविदेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये भारत फोर्ज, अदानी ग्रुपचे पीएलआर सिस्टम्स, जिंदाल डिफेन्स, आयसीओएमएम, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि कानपूर येथील स्मॉल आर्म्स फॅक्टरी यांचा समावेश होता. भारत फोर्जने पीएलआर सिस्टम्स (3 हजार 148 कोटी रुपये) आणि जिंदाल डिफेन्स (3 हजार 379 कोटी रुपये) यासह 2 हजार 770 कोटी रुपयांची बोली जिंकली.

संरक्षण मंत्रालयाने किंमत आणि स्वदेशी मूल्य या दोन्ही निकषांवर आलेल्या निविदांचे मूल्यांकन केले, ज्यामध्ये भारत फोर्ज आणि पीएलआर अनुक्रमे सर्वात कमी आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी बोली लावणारे म्हणून दिसून आले. 60:40 उत्पादन विभाजनामुळे पुरवठा साखळीत जलद वाढ आणि अतिरिक्तता सुनिश्चित होते.

पायदळाच्या व्यापक परिवर्तनाचा हिस्सा

लेफ्टनंट जनरल कुमार म्हणाले की, कार्बाइन करार हा लष्कराच्या सुरू असलेल्या व्यापक पायदळ आधुनिकीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो ऑपरेशन सिंदूरमधील प्रमुख धड्यांवर आधारलेला आहे. या संयुक्त लष्करी मोहिमेने मोठ्या प्रमाणात सामरिक प्राणघातकता, गतिशीलता आणि तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेची आवश्यकता अधोरेखित केली.

“ही खरेदी चपळ, प्राणघातक आणि नेटवर्क असलेल्या पायदळाच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे,” असे त्यांनी नमूद केले. “नवीन शस्त्रांसोबत, आम्ही आधुनिक युद्धभूमीसाठी आमच्या लढाऊ प्रोफाइलला आकार देण्यासाठी भैरव लाईट कमांडो बटालियन आणि अशनी ड्रोन प्लाटून तैनात करत आहोत.”

महासंचालकांनी अधोरेखित केले की पायदळ परिवर्तन सहा मुद्द्यांवर आधारीत आहे – प्राणघातकता, गतिशीलता, संप्रेषण, पारदर्शकता, जगण्याची क्षमता आणि प्रशिक्षण. नवीन 7.62 मिमी असॉल्ट रायफल्स, अँटी-टँक सिस्टम आणि लोइटरिंग दारूगोळा देखील समाविष्ट केला जात आहे, तर सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ (SDR) आणि वर्धित सैनिक संरक्षण किटची बटालियनमध्ये वाटणी केली जात आहे.

पुढील प्रवास

2026  मध्ये पुरवठा सुरू होत असल्याने, नवीन कार्बाइन शतकाच्या सुरुवातीपासून सैन्यात असलेली क्षमता तफावत भरून काढतील. लष्कराच्या आघाडीच्या पायदळ तुकड्यांसाठी -विशेषतः बंडखोरीविरोधी आणि सीमावर्ती कारवायांमध्ये तैनात असलेल्यांसाठी- हे नवीन शस्त्र एक रणनीतिक अपग्रेड आणि प्रतीकात्मक बदल दोन्ही दर्शवते –  हा वारसा आयातीवरील अवलंबित्वापासून ते भारतीय डिझाइन आणि उत्पादनावरील विश्वासापर्यंत झालेला प्रवासही दाखवून देते.

“हे केवळ एक बदल नाही,” लेफ्टनंट जनरल कुमार यांनी निष्कर्ष काढला. “आपले पायदळ भविष्यातील लढाईत कसे लढते आणि जिंकते यामध्ये होणाऱ्या पिढीजात बदलाची ही तर सुरुवात आहे.”

रवी शंकर

+ posts
Previous articleभारतीय सैन्यात ‘भैरव’ बटालियन, ‘अशनी’ ड्रोन तैनात
Next articleअमेरिकेन बनावटीच्या FGM-148 Javelin क्षेपणास्त्राच्या खरेदीला प्रारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here