भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने अलीकडेच आपली लढाईची तयारी, जलद तैनाती आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता प्रमाणित करण्यासाठी तयार केलेल्या Live Fire Drillsद्वारे त्याच्या परिचालनातील उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले. सिक्कीमच्या उंच पर्वतांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सरावात, आव्हानात्मक भूप्रदेश आणि वैविध्यपूर्ण परिचालन परिस्थितीशी सैन्याची जुळवून घेण्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली.
एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, “समन्वित firepower आणि अचूक सहभागाद्वारे, तुकड्यांनी अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी असणारी त्यांची तयारी दर्शविली, ज्या उंचीवरील युद्धासाठी अद्वितीय आहेत.”
निवेदनात म्हटले आहे की, “हा सराव कठीण प्रदेश आणि भौगोलिक मर्यादा विचारात न घेता उच्च दर्जाची कार्यक्षमता, चपळता आणि मोहिमेची तयारी राखण्यासाठी भारतीय लष्कराची अतूट वचनबद्धता अधोरेखित करतो. हे कठोर प्रशिक्षण विविध भूप्रदेशांमध्ये उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली क्षमता विकसित करण्यावर लष्कराचे लक्ष प्रतिबिंबित करते.”
पूर्व कमांडचा भाग असलेल्या आणि पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे मुख्यालय असलेल्या त्रिशक्ती कॉर्प्सनेही या वर्षाच्या सुरुवातीला 16 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या उच्च-तीव्रतेच्या संयुक्त मोहिमेत ‘Exercise Devil Strike’ आयोजित केले होते. अखंड एकात्मता आणि संयुक्त परिचालन उत्कृष्टतेवर भर देत, या गतिशील सरावाने भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या उत्कृष्ट हवाई सैनिकांना एकत्र आणले.
डेव्हिल स्ट्राइक या सरावाने, शत्रूच्या प्रदेशात सैन्य आणि लष्करी साधने अचूकपणे घुसवण्यासह, जटिल हवाई मोहिमांचे प्रमाणीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक प्रशिक्षण क्षेत्रे आणि गोळीबार श्रेणीमध्ये आयोजित केलेल्या, दीर्घकालीन परिचालन परिणामकारकतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रसद आणि निर्वाह धोरणांचे सफाईदारपणे संचलन करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याच्या सैन्याच्या क्षमतेची चाचणी घेतली.
हे सराव एकत्रितपणे राष्ट्रीय संरक्षणाचा आधारस्तंभ म्हणून आपली भूमिका बळकट करत, विकसित होत असलेल्या सुरक्षा आव्हानांचा जलद आणि प्रभावीपणे सामना करण्याची भारतीय लष्कराची तयारी अधोरेखित करतात.
टीम भारतशक्ती