इराणमध्ये संकटाचे वाढते सावट; स्थानिक भारतीय मायदेशी परतण्याच्या तयारीत

0
भारतीय
A closeup shot of the waving flag of Iran with interesting textures

तेहरानमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या नवीन सूचनेनंतर, इराणमधील भारतीय नागरिकांनी देश सोडण्याची तयारी सुरू केली आहे. इराणमध्ये सुरू असलेली तीव्र जनआंदोलने, सुरक्षा दलांची कडक कारवाई आणि अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या धमक्यांमुळे देशभरातील अनिश्चितता अधिक गडद झाली आहे.

स्थानिक परवानग्या आणि विमान उड्डाणांच्या उपलब्धतेनुसार, भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला गट शुक्रवारपासून मायदेशी परतण्यास सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे.

इराणमधील परिस्थिती सातत्याने बदलत असल्याने, 14 जानेवारी रोजी दूतावासाने जारी केलेल्या सूचनेमध्ये; विद्यार्थी, यात्रेकरू, कामगार, व्यावसायिक आणि पर्यटकांसह सर्व भारतीय नागरिकांनी, व्यावसायिक विमान उड्डाणांसह उपलब्ध सर्व वाहतूक पर्यायांचा वापर करून तातडीने इराण सोडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

इराणमधील भारतीयांचा आकडा

अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, सध्या इराणमध्ये सुमारे 9 ते 10 हजार भारतीय वास्तव्यास नागरिक आहेत. यामध्ये सुमारे 2,000 वैद्यकीय विद्यार्थी, अंदाजे 4,000 धार्मिक मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी, किनारपट्टी भागात राहणारे सुमारे 2,000 मच्छिमार आणि इतर छोटे व्यवसाय, सेवा क्षेत्रात काम करणारे किंवा अल्पमुदतीच्या भेटीवर आलेल्या लोकांचा समावेश आहे.

विद्यार्थी प्रामुख्याने तेहरान, शिराज, इसफाहान, कर्मन आणि कोम येथे आहेत, तर मच्छिमार मुख्यत: देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात आहेत.

विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे की, बाह्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे काही काळ बंद ठेवलेली इराणची हवाई हद्द पुन्हा उघडल्यानंतर प्रवास योजनांना वेग आला आहे.

जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक नासिर खुहामी यांनी सांगितले की, “जम्मू-काश्मीरमधील मर्यादित संख्येसह अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी विमानांचे बुकिंग केले असून, सुरक्षा मंजुरी आणि विमानतळाच्या परिस्थितीनुसार ते शुक्रवारपासून भारतात परतायला सुरुवात करण्याची शक्यता आहे.”

भारतीय दूतावासाने नागरिकांना आंदोलन स्थळांपासून दूर राहण्याचा, स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा आणि प्रवासाची कागदपत्रे तयार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीयांनी इराणचा सर्व प्रवास टाळावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा केले आहे.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी, आतापर्यंत सरकारने अधिकृतपणे कोणत्याही बचाव मोहिमेची घोषणा केलेली नाही.

सध्या, भारतीय नागरिक व्यावसायिक विमान सेवेवर अवलंबून आहेत. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या परतीमुळे, इराणमधील घडामोडींमुळे चिंतेत असलेल्या भारतीय कुटुंबांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleअमेरिकेपासून मायदेशापर्यंतः चीनवर उलटे पडले ‘किल-लाइन’चे फासे
Next articleचीन आणि कॅनडाचा सहकार्य वाढीवर भर, द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here