APEC परिषदेत जिनपिंग यांनी जागतिक AI नियमनासाठी प्रस्ताव मांडला

0
जिनपिंग

शनिवारी झालेल्या ‘एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC)’ बैठकीत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) नियंत्रित करण्यासाठी जागतिक संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला, तसेच व्यापार सहकार्यासंदर्भात चीनला अमेरिकेचा पर्याय म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आंतरराष्ट्रीय मंडळ स्थापन करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला असला तरी, या वर्षाच्या सुरुवातीला बीजिंगने उघड केलेल्या उपक्रमावर जिनपिंग यांची ही पहिली सार्वजनिक टिप्पणी आहे.

जिनपिंग म्हणाले की, ‘वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ शासकीय नियम निश्चीत करू शकते आणि सहकार्याला चालना देऊ शकते, ज्यामुळे AI ही संपूर्ण जगासाठी सार्वजनिक हिताची ठरू शकेल.

अधिकृत वृत्तसंस्था Xinhua ने प्रकाशित केलेल्या विधानांमध्ये जिनपिंग म्हणतात की, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यातील विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते सर्व देश आणि प्रदेशांतील लोकांच्या फायद्यासाठी तयार केले जाणे आवश्यक आहे.”

चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, “या संस्थेचे मुख्यालय चीनचे व्यावसायिक केंद्र असलेल्या शांघाय येथे स्थापन केले जाऊ शकते.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दक्षिण कोरियातील APEC नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ते थेट वॉशिंग्टनला परतले.

दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तणाव निर्माण करणारे व्यापार आणि तंत्रज्ञान नियंत्रण अंशतः मागे घेण्यासंदर्भात एक वर्षाचा करार झाला.

चीनचा पुढाकार

विश्लेषकांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत, जिनपिंग APEC परिषदेत चीनला बहुपक्षीय सहकार्यातील एक सक्षम नेता म्हणून सादर करतील, विशेषत: व्यापार आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात.

कॅलिफोर्नियास्थित Nvidia कंपनीच्या प्रगत चिप्स, सध्याच्या AI च्या वाढत्या क्षेत्रात केंद्रस्थानी असल्या, तरी चीनमधील DeepSeek ने, तुलनेने कमी खर्चिक मॉडेल्स विकसित केली आहेत आणि बीजिंगने या मॉडेल्सना स्विकारून “अल्गोरिदमिक सार्वभौमत्व”च्या त्यांच्या दृष्टिकोनाला चालना दिली आहे.

शी जिनपिंग यांनी, APEC सदस्यांना हरित तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाहाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले, ज्यामध्ये बॅटरीपासून ते सौर पॅनेलपर्यंतच्या व्यवसायांचा समावेश आहे आणि ज्यावर चीनचे वर्चस्व आहे.

APEC बैठकीतील सदस्यांनी, यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि वृद्ध होत चाललेली लोकसंख्येच्या आव्हानांबाबत संयुक्त घोषणापत्र आणि करारांना मान्यता दिली.

चीन 2026 मध्ये, शेन्झेन येथे APEC शिखर परिषद आयोजित करणार आहे. हे शहर रोबोटिक्सपासून ते इलेक्ट्रिक कार उत्पादनापर्यंतच्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.

जिनपिंग यांनी सांगितले की, “जवळपास 1.8 कोटी लोकसंख्या असलेले शेन्झेन हे शहर, 1980 च्या दशकात चीनच्या पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्रांपैकी एक म्हणून विकसित झाले, त्याआधी ते फक्त एक लहान मासेमारीवर चालणारे गाव होते.”

APEC हा 21 देशांचा सल्लागार मंच आहे, जो जगातील एकूण व्यापाराच्या सुमारे अर्ध्या भागाचे प्रतिनिधित्व करतो.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleRajnath Singh Calls for Collective Security to Keep Indo-Pacific Free from Coercion at ASEAN Defence Meet
Next articleArmy Tests Drone Warfare Tactics in Desert Exercise ‘Vayu Samanvay-II’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here