आपण आपल्या महत्वाच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आता सर्वसामान्य झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वर्गीकृत गंभीर माहिती आतापर्यंत मोठ्या प्रमाणात संरक्षित स्ट्रॉंग रूममधे साठवलेली असायची. तीच माहिती आता क्लाऊडमध्ये साठवून ठेवली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसबरोबर केलेल्या 2 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या करारानुसार आपली सर्वोच्च गुप्त माहिती क्लाऊडवर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स यांनीच याची घोषणा केली. यामुळे संरक्षण दलाची अमेरिकेबरोबर काम करण्याची क्षमता (interoperability) वाढणार आहे.
ऑस्ट्रेलियन सिग्नल्स डायरेक्टोरेटचे महासंचालक राचेल नोबल म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा संस्था स्थलांतरित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए. आय.) वापर देखील करणार आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये तयार केलेली सर्वोच्च गुप्त माहिती केंद्रे दिसतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर हा गुप्तचर विभागातील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा गेम चेंजर आहे आणि आम्ही त्याचा नैतिकतेने, सुव्यवस्थितपणे आणि अधिक चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल यासाठी काम करत आहोत, त्यामुळे जेव्हा आपण आपल्या वातावरणात एआयशी संबंधित साधने आणतो तेव्हा ती कशी वापरली जात आहेत, माहितीचे ही साधने नेमके काय करत आहेत आणि त्यांना किती काळजीपूर्वक नियंत्रित करणे आवश्यक आहे हे आपल्याला समजेल,”असे नोबल यांनी गुरुवारी कॅनबेरा येथे सांगितले.
ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस AMZN.O द्वारे चालवल्या जाणाऱ्या क्लाउड सेवांमध्ये, वितरित, उद्देश-निर्मित सुविधांचा वापर करून, संरक्षण दलाला सामर्थ्य देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माहितीला अधिक लवचिकता मिळेल, असे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
“एखादा सर्व्हर जरी बंद पडला, तरीही तुम्ही काम करू शकता,” असे ते म्हणाले. “यामुळेच भविष्यात अमेरिकेच्या संरक्षण दलांसोबत आमच्यासाठी एक समान संगणकीय कार्यरत वातावरण निश्चित करता येईल.”
नॅशनल इंटेलिजेंसचे महासंचालक अँड्र्यू शियरर यांनी पत्रकारांना सांगितले की अमेरिकेसारख्या सुरक्षा भागीदारांबरोबर काम करणे ही आमची प्राथमिकता आहे.
ऑस्ट्रेलियन सिग्नल डिरेक्टोरेट (संचालनालय) आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस यांच्यातील भागीदारीमुळे राष्ट्रीय सुरक्षाविषयक क्षमतांमध्ये सुधारणा तर होईलच याशिवाय 2 हजार स्थानिक नोकऱ्याही निर्माण होतील, असे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे हे पाऊल अनेक देशांसाठी एक उदाहरण ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात आपल्याकडील वर्गीकृत माहिती उत्तम प्रकारे कशी साठवायची यावर चर्चा सुरू होणार आहे हे नक्की!
टीम भारतशक्ती