बांगलादेशमध्ये 5.7 तीव्रतेचा भूकंप; 3 जणांचा मृत्यू, भारतातही भूकंपाचे धक्के

0
5.7 तीव्रतेचा भूकंप

शुक्रवारी, बांग्लादेशमध्ये 5.7 तीव्रतेचा भूकंप आल्याचे वृत्त, जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने दिले. या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी (6 मैल) खोल होता. यामध्ये किमान 3 लोकांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हा राजधानी ढाकापासून सुमारे 40 किमी (25 मैल) पूर्वेकडील नरसिंगडी शहरात होता.

चांदपूर, निलफामारी, सीताकुंडा, सिराजगंज, नारायणगंज, पटुआखाली, बोगुरा, बारीसाल आणि मौलबिबाजार येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे वृत्त समोर आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात पश्चिम बंगाल आणि मिझोराम या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात अद्याप कोणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही. कोलकाता आणि शेजारच्या भागांमधील रहिवाशांनी भूकंपाचे धक्के जाणवताच, लोक घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले.

ढाका ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे की, भूकंपाच्या धक्क्यामुळे एका पाच मजली इमारतीची रेलिंग अचानक कोसळले, ज्यामुळे रस्त्यावरून चाललेल्या तीन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पीडितांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एकाचा मृत्यू मिफर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर झाला.

“आतापर्यंतचे सर्वात तीव्र कंपन”

बांग्लादेशी वृत्तपत्र ‘प्रोथोम आलो’ ने म्हटले आहे की, भूकंप तज्ज्ञ प्राध्यापक हुमायून अख्तर यांच्या मते, बांग्लादेशमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेले तीव्र कंपन, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे कंपन होते.

इमारती हादरू लागल्यामुळे आणि काही तात्पुरत्या बांधलेल्या इमारतींचे ढाचे कोसळू लागल्यामुळे, ढाकाच्या रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली, असे रॉयटर्सच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ढाका येथील एका खासगी कंपनीत काम करणारे सॅडमन साकिब म्हणाले की, “मी माझ्या आयुष्यात इतके तीव्र कंपन कधीही अनुभवले नाही. आम्ही कार्यालयात असताना फर्निचर हलू लागले. आम्ही धावत जिन्यांवरून खाली रस्त्यावर आलो आणि पाहिले की इतर लोकही आधीच रस्त्यावर आलेले होते.”

भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, लोक आपल्या मुलांना घेऊन जात असल्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असल्याचे काही फोटो, स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत 2035 च्या वचनपूर्तीसाठी सज्ज, मात्र COP30 बैठक निधीअभावी ठप्प
Next articleTejas Fighter Jet Crashes During Dubai Air Show, Pilot Dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here