बांगलादेश: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतविरोधी भावनांमध्ये वाढ

0
बांगलादेश

“या सरकारच्या स्थापनेपासून आजपर्यंत भारतासोबतचा तणाव कायम आहे.”

ढाका आणि दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांना थेट समन्स बजावण्यात आल्याच्या घटनेनंतर बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद हुसेन यांनी हे विधान केले. त्यांनी यावर जोर दिला की, संबंध पुढे नेण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

फेब्रुवारीत लागणाऱ्या निवडणूक निकालांची वाट पाहत असताना भारताने ढाकाशी संवादाची दारे खुली ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, शेख हसीना यांच्या विरोधात ऑगस्टमध्ये झालेल्या उठावात सहभागी झालेल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘जुलै ओइक्या’ या गटाने-ज्यात काही भारतविरोधी घटकही सामील आहेत- बुधवारी भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करण्याची धमकी दिली.

त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे आणि बांगलादेशच्या निवडणूक प्रक्रियेत ‘प्रॉक्सी’ घुसखोरी केल्याबद्दल भारताला दोष दिला आहे. तणाव वाढल्याने, ढाका येथील उच्चायुक्तालयाने बुधवारी व्हिसा कार्यालय लवकर बंद केले, मात्र गुरुवारी ते पुन्हा सुरू करण्यात आले.

प्रथम आलोने वृत्त दिले आहे की, ऑगस्टच्या उठावातील सदस्य आणि ढाका मतदारसंघातील संभाव्य निवडणूक उमेदवार शरीफ उस्मान हादी यांच्यावरील हल्ल्यासाठी जबाबदार असलेले लोक भारतात पळून गेले आहेत. ढाकाने मागणी केली आहे की, जर ते भारतात आढळले, तर त्यांना अटक करून बांगलादेशच्या ताब्यात द्यावे.

ही बाब भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनाही कळवण्यात आली आहे. वर्मा यांना गेल्या रविवारी परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले होते. त्यांना असेही सांगण्यात आले की, शेख हसीना यांच्या भारतातील “बांगलादेशविरोधी कारवायांना” परवानगी दिली जाऊ नये.

शेख हसीना यांचे अमेरिकेत राहणारे पुत्र साजीब वाजेद जॉय यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमुळे बांगलादेश आणखीनच नाराज होण्याची शक्यता आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, फेब्रुवारीमधील निवडणुकांमधील निकाल हे आधीत ठरलेले आहेत, कारण त्यांच्या आईचा पक्ष, अवामी लीग, निवडणूक लढवू शकत नाही.

“युनूस सरकारने जमात-ए-इस्लामी आणि इतर इस्लामी पक्षांना देशात मोकळीक दिली आहे. बांगलादेशमध्ये, इस्लामवाद्यांना कधीही पाच टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत. बांगलादेशातील सर्व पुरोगामी, उदारमतवादी पक्षांवर बंदी घालून, अवैध पद्धतीने निवडणूक घेऊन, युनूस सरकार इस्लामवाद्यांना सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करत आहे,” असे वाजेद यांनी एका ईमेल मुलाखतीत म्हटले आहे.

बांगलादेशमध्ये आधीच दहशतवादी प्रशिक्षण कॅम्प उभे राहिले आहेत. अल-कायदाचे ज्ञात हस्तक तिथे सक्रिय आहेत आणि पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर्सनी तिथल्या कार्यक्रमांमध्ये जाहीर भाषणे केली आहेत. त्यामुळे भारताला असलेला धोका जवळचा आणि अत्यंत वास्तविक आहे.

बांगलादेशमधील घडामोडींपासून दूर राहण्याची भारताची इच्छा असली तरी, निवडणुकीची तारीख जवळ येत असताना आणि राजकारण अधिक गलिच्छ होत असताना, भारत त्यात ओढला जाणार आहे, हे अधिकाधिक स्पष्ट होत आहे.

ऐश्वर्या पारीख  

+ posts
Previous articleIndia, Netherlands Agree to Defence Industrial Roadmap to Boost Co-production
Next articleश्वेतवर्णीय निर्वासितांना ट्रम्प चरित्राच्या वाटपाचा प्रस्ताव?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here